Skip to main content

Posts

गेली १० वर्षे: ब्लॉगच्या अनुषंगाने माझा प्रवास

मी हा ब्लॉग २०१० मध्ये सुरू केला. तेव्हा त्याचं नाव स्वच्छंदी असं होतं. आणि मग २०१५ मध्ये याचं नाव सात्मन् असं बदललं. ह्या ब्लॉग वर शेवटची पोस्ट २०१६ मध्ये लिहिली आहे. आणि आज आपण २०१९ मध्ये आहोत. ह्या १० वर्षांच्या कालावधीत काय काय झाले ह्याचा हा धांडोळा! [Read this post in English: My journey through my blog ] २०१० मध्ये मला "व्यक्त" व्हायचे होते. त्यासाठी मी हा ब्लॉग स्वच्छंदी या नावाने सुरु केला. काही वर्षांनी माझ्या असं लक्षात आलं की मी काही स्वच्छंदी वगैरे नाहीये. स्वच्छंदी ही फारच युटोपियन संकल्पना आहे. स्वच्छंदी आयुष्य हे फक्त 'ठरलं आणि झालं' असं मिळवता येत नाही. जून २०१० मध्ये मी माझ्या अभियांत्रिकी कॉलेजच्या प्रवेशाची वाट बघत होते. मी बारावीमध्ये जास्त काही अभ्यास केला नाही. तेव्हा मी थोडेफार यमक जुळवून "कविता" लिहायचे. लोकं कॉमेंट्स वगैरे करायचे. त्यामुळेच कदाचित २०१०-११ मध्ये सगळ्यात जास्त पोस्ट्स लिहिले गेले.  २०१० मध्ये माझं इंजिनिअरिंगचं कॉलेज सुरू झालं खारघरला! वाढलेला प्रवास, नवीन वातावरण आणि नवीन मित्र-मैत्रिणी ह्...

तू कोई और है

आज मी एकटी एक सिनेमा बघायला गेले. ‘मजबुरी’ म्हणून नाही तर बघायचा होता म्हणून! माझी एकटे जाऊन सिनेमा बघायची खूप वर्षे इच्छा होती, पण कधी तशी वेळ आली नाही. या वेळेस सुद्धा आली नसती, परंतु संधीची चाहूल लागताच मी ठरवलं कि यावेळेस नक्की! सिनेमा संपल्यावर समोरच्या क्यानी मध्ये मी एका अनोळखी मुलीसोबत table share केले. हा अनुभवदेखील पहिलाच! मी माझा सुलेमनी चहा पिता पिता तिच्याशी बऱ्याच गप्पा मारल्या. असे अनुभव खऱ्या अर्थाने माणसाला समृध्द करतात! सिनेमा ह्या गोष्टीकडे नेहमीच एक social गोष्ट म्हणून पहिले जाते. त्यात तत्थ्य असले तरी सिनेमा हा एक वैयक्तिक अनुभव असायला हवा. निदान माझ्यासाठी तरी आहे! For me, cinema is all about what it makes you feel. Cinema is a piece of art. We should pay attention to its craft. There a quote by Rainbow Rowell from a brilliant book called ‘Eleanor and Park’. It says, “Eleanor was right. She never looked nice. She looked like art, and art wasn’t supposed to look nice; it was supposed to make you feel.” So I try to measure everything that I see against tha...

स्वच्छंदी ते सात्मन्

सध्या प्रश्न हा आहे की मी पुन्हा इथे का आलेय? मी २०१० मध्ये बारावीची परीक्षा झाल्यानंतर हा ब्लॉग लिहायला सुरु केलेला. आणि तेव्हाची कारणं ही खूप वेगळी होती. तेव्हा आतली घुसमट कुठेतरी व्यक्त व्हावी ही इच्छा होती. ( VERSION - 2010 ) परंतु आता विचार केल्यावर असं जाणवतंय की बरंच काही बदललंय आणि रोजच्या रोज बदलतंय. ह्या बदलांची कुठेतरी नोंद करून ठेवायला हवीये. जर तुम्ही या आधी इथे कधी आला असाल तर तुमच्या लक्षात येईल की ह्या ब्लॉगचे नाव आता ‘सात्मन्’ असे झाले आहे. पूर्वी ते ‘स्वच्छंदी’ असे होते! आणि ह्या ब्लॉग चा address meemanali.blogspot.in असा होता! आणि आता मला त्या गोष्टीची लाज वाटत होती. म्हणजे स्वतःचं नाव त्या ब्लॉग address मध्ये ठेवण्यासाठी मी (mee) केलेला अट्टाहास आता मला नकोसा वाटत होता. आता नाहीये मी तशी! मी स्वच्छंदी देखील नाहीये. होय, हे खरं आहे. आणि मला त्याचा स्वीकार करणं हे शिकायलाचं हवं. मी स्वच्छंदी विचार करत असेन, परंतु मी स्वच्छंदी वागत नाही. त्याला बरीच कारणे आहेत. स्वच्छंदी हा एक प्रकारचा escape होता बहुतेक! त्या वेळेस मी जशी आहे त्याबाबत comfortable नसल्याने स्वत:...

2013

मी  २०११ मधील आठवणी लिहिल्या होत्या. २०१२ मध्ये आळशीपणा केला. पण या वर्षी ठरवलंय मी, उशीर झाला तरी चालेल पण लिहायचं. खरं सांगायचं तर सगळं किती बदलल्या सारखं वाटतं. म्हणजे दोन वर्षांपूर्वी लिहिलेल्या गोष्टी वाचून तर मी खूप दूर आल्यासारखं वाटतं मला. आणि मला माहितेय ही चांगली गोष्ट आहे, कारण माझा प्रवासावर खूप विश्वास आहे. ३६५ दिवसांत जर तारखेशिवाय काही बदललं नसेल, तर ते दिवस वाया गेल्या सारखे आहेत. नाही का? आता मी सांगेन त्या आठवणी ह्या घटनाक्रमानुसार (order-of-occurence :P) आहेत, त्यात आवड-नावड असं काही नाही. :D १.       Canvas 2 गेल्या वर्षी जानेवारी मध्ये मला माझा पहिला वहिला smartphone मिळाला. देसी कंपनी चा स्वस्त आणि मस्त फोन! जेव्हा मी ठरवलं कि हा फोन घ्यायचा तेव्हा अर्थात बरयाच लोकांनी नाकं मुरडली. पण खरं सांगते, it’s been really good! J कॅमेरा पेक्षा फोटोग्राफर महत्त्वाचा तसेच फोन वापरणारा कितपत फोन चा वापर करतो हे महत्त्वाचं ! मी नेहमी फोन ला चिकटून असते हि एक बाब सोडली तर, सगळं किती सोपं वाटतं ह्या फोन्स मुळे. ह्या फोन मुळे अजून एक अगदी...

दुनियादारी

"ये महलो, ये तख्तो, ये ताजो की दुनिया,                ये इंसान के दुश्मन समाजो की दुनिया,     ये दौलत के भूखे रवाजो की दुनिया,                ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या हैं?"            "दुनियादारी" वाचून झालं नुकतंच… मी हललेय पार आतून! म्हणजे हे असंच असतं का? कोणीच चूक आणि कोणीच बरोबर नसतं बहुतेक. शेवटी सगळं परिस्थितीच्या मनात असतं तसंच घडतं. मग ही स्वत:ची ओढाताण कशासाठी? आज इथे जिंकून मिळवायचं ते काय आणि हरायचं ते काय??? परिस्थिती आपल्याला सर्व या अशा मार्गाने का शिकवत असते? आज या क्षणी माझी जी काही स्वप्नं आहेत, ती जर उद्या पूर्ण झाली नाहीत तरी मी चालतंच राहणारेय. खरंतर, मला चालतच राहावं लागणार आहे. आज जर मला मध्ये काही सोडावं लागलं, तर ते पाठी ठेऊन मी पुढे जाणारेय… आजचे क्षण या उद्याच्या आठवणी आहेत. ज्या क्षणांना मी आज जपत नाही, त्या उद्या नाहीशा होणारेत. हा सिद्धांत आहे आणि या सिद्धांतावर माणूस निर्माण झाला आहे.  पण मग या आयुष्यात ये...

आयुष्यात पुढे जायचं असतं...!

आज लिहावंसं वाटतंय... किंवा कदाचित कॉम्प्युटर रडत-खडत चालतोय म्हणून  असेल...  हे लिहिणं आता जमेनासं झाल्यासारखं भासतंय... स्वत:बद्दल बरंच काही बदलल्यासारखं जाणवतंय, सभोवतालचं जग देखील बदलल्यासारखं वाटतंय... असं वाटतंय की या सगळ्या बदलांत आपण कुठेच नव्हतो आणि आज अचानक यात पडलोय, एखाद्या अनभिज्ञासारखे! सगळं नवीन! पण जुन्या जगाची आठवण करून देणारं ... तिथे परत जाण्याची आस निर्माण करणारं... कुठेतरी किंवा कधीतरी ते जग परत येईल अशी आशा निर्माण करणारं... वेगळं! पुन्हा नव्याने सुरुवात कर, असं सांगायचं असेल त्याला... पण ना काही पूर्वसूचना, ना मार्गदर्शक इशारा... विशाल महासागरात हरवलेल्या बोटीच्या खलाश्यासम... एकटं, स्वबळावर! पण त्या खलाश्याच्या मनातील विजीगिषु वृत्ती आपण कशी जागवणार... त्याला वेड असतं... तो त्याचे स्वप्न पूर्ण करायच्या इच्छेपोटी वेडा होऊन जातो... स्वत:ला हरवून बसतो! त्या नाविन्याच्या शोधात असं स्वत: हरवून जाण्यात ते सुख तरी काय असतं? स्वत:ला शोधण्यात वेळ व शक्ती दोन्ही खर्च होतेच, पण मग हे काम युक्तीने चालवावं तरी कसं! युक्तीने संपूर्ण जग खरंच चालू शकतं का? आणि...

जग एक कोवळा भास...

भीती दाटली आज मनी , कसा सावरू सारा डाव , सरल्या आठवणी जणू , पाडूनी हृदयावर घाव ... वाटे भेटावे आज तिला , द्यावे नात्यास नवे नाव , समुद्री उफाळल्या लाटा , सावरावी बुडती नाव ... स्वप्न सानुले पाहिले जे , पूर्णत्त्व आहे देणे त्यास , वादळात अडकुनी या , नासे जगण्याची आस ... आरशात पाहुनी मज , मी सोडला एक नि : श्वास , लख्ख दिसले त्या डोळ्यांत , जग एक कोवळा भास ... - सात्मन   ( १९ - ०५ - २०१२ )  

शाळा = निरागसता !

" त्यादिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत , बाकं आहेत , पोरं-पोरी आहेत , सर आहेत , गणित आहे , भूगोल आहे , नागरिकशास्त्र सुध्दा ; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणार्‍या पांढर्‍या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत. त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते. खास एकट्याचीच. त्या शाळेत वर्ग नाहीत , भिंती नाहीत , फळा नाही , शिक्षक नाहीत ; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे..." :) शाळा चित्रपटाने मला काय दिलं??? तर बऱ्याच दिवसांनी काहीतरी गोड, निरागस आणि तरल गोष्ट ऐकल्याचा, पाहिल्याचा आनंद! :) आणि शाळा कादंबरीने मला काय दिलं होतं, तीच गोष्ट वाचल्याचा आनंद...! शाळा कादंबरी ही बहुतेकांच्या आवडत्या पुस्तकांतील एक आहे, अर्थात माझ्याही!!! ते पुस्तक वाचून आता दीड वर्षं झाली, पण सगळं कसं अगदी मनावर कोरलं गेल्याप्रमाणे लख्ख! क्षणात वेड लावलं कादंबरीने... आणि मग कुठेतरी ऐकिवात आलं की शाळा कादंबरीवर सिनेमा येणारेय... एवढा आनंद झाला म्हणून सांगू! म्हणजे जी पात्र, ज्या जागा आणि ज्या भावनांची आपण निव्वळ एक कल्पना केली होती, ते विश्व दृ...

2011 तील बेस्ट आठवणी

तर आज २०११ सालचा शेवटचा दिवस आहे. २०११ माझ्यासाठी तरी बरंच झक्कास वर्ष होतं. खूप साऱ्या निरनिराळ्या आठवणी आहेत या वर्षाच्या. त्यातल्या ५ मनाच्या सर्वात जवळ असलेल्या आठवणी शेअर करतेय. खरंतर यांच्या क्रमावर जाऊ नका. आठवणींमध्ये कसली आलीये तुलना! त्या गोड तर गोड, नाहीतर वाईट तर वाईट! सोयीसाठी या घटना ज्या क्रमाने घडल्यात त्या क्रमाने सांगते. तर.... "वर्ल्डकप" :  मार्च महिना तर वर्ल्डकप च्या नशेतच गेला आणि एप्रिल मध्ये वर्ल्डकप आपल्या घरी आला. हो, "आपल्या"च! म्हणजे निदान मला तरी तो माझ्याच घरी आला आहे असं वाटतं होतं. मला खात्री आहे तुम्हालाही तसंच काहीसं वाटलं असेल! तो निव्वळ वर्ल्डकप न राहता एक उत्सव, जल्लोष होता. जसा आपण एखादा सण आपल्या कुटुंब आणि दोस्त मंडळींसोबत साजरा करतो तसा वर्ल्डकप सगळ्यांनी साजरा केला. प्रत्येक  मॅचची एक वेगळी आठवण! आणि फायनल तर कळस होता! म्हणजे धोनी ने मारलेला तो सिक्स आणि त्या क्षणी पूर्ण झालेली करोडो लोकांची स्वप्नं... :)   नऊ दिवसांचे "मौन" : या वर्षी मी एक खूप महत्त्वाची शिकलेली गोष्ट म्हणजे विपश्यना ! आणि त्यासाठीच मी जव...

Love is in Me!

I'm not in Love, but Love is in Me! कसली भारी कन्सेप्ट आहे बघा ना... म्हणजे तुम्ही प्रेमात नाही आहे, तर प्रेम तुमच्यात आहे!!! प्रत्येकाची सुप्त ईच्छा असतेच की त्याने आयुष्यात एकदातरी कोणाच्यातरी प्रेमात पडावं. पण जर खुद्द प्रेम तुमच्यात असेल, तर प्रेमात पडायची गरजच काय!!! ते ऑलरेडी तुमच्यात पडलंय... (आय नो दिस सौंड्स सिली , बट यु गेट द पोईंट, डोन्ट यु???) म्हणजे जसं आपण इंग्लिश मध्ये म्हणू शकू, Love is 'in' You! जर असं असेल तर प्रेम शोधायची काय गरज, ते तुमच्यात आहे. ज्या गोष्टी आपल्याला अगदी मनापासून आवडतात, त्या गोष्टींच्या आपण प्रेमात आहोत असं आपण म्हणतो. "मी आज अमक्या पुस्तकाच्या प्रेमात पडलेय..." "मी निसर्गावर अगदी मनापासून प्रेम करते..." "आय लव माय फ्रेंड्स..." "आय'म सो इन लव विथ हिम...", वगैरे वगैरे गोष्टी आपण नेहमी बोलत असतो... पण हे 'प्रेमात आहोत' म्हणजे नक्की काय??? आणि हे 'प्रेमात असणे ' आणि 'प्रेम करणे' म्हणजे सेमच आहे की वेगवेगळ??? Twilight Saga मधली नायिका तिच्या बेस्ट फ्रेंडला ...

थोडसं 'सेव' केलेलं...!

मुली, तू खूप त्रास करून घेतेयेस. जरी तुला वाटतं की तू ठीक आहेस, सोर्टेड आहेस, तरी तसं नाहीये आणि हे तुलादेखील माहितीये. तुझ्या आत खूप साऱ्या गोष्टी आहेत, ज्या तू धड सांगत नाहीस कोणाला. I know it must be hard to accept everything, पण ते शेवटी करावंच लागतं ना. त्याला काही ऑप्शन नसतो. 'काही प्रश्न सोडून दिले कि सुटतात' हे पटतं मला. एवढं सगळं करूनही जर मनाप्रमाणे घडत नसेल, तर तू काहीच करू शकत नाहीस. अशा वेळी त्यातल्या त्यात योग्य डिसिजन घेऊन सोडून द्यावं असं आपलं माझं मत आहे. काळ जातो तशी उत्तरं सापडतात. तू खरंच खूप strong आहेस. हे पश्चात्ताप किंवा दुख: करून काहीच मिळत नाही. बोलायला खूप सोपं आहे माहितेय मला, पण accept करणं अशक्यही नाहीये. बस्स, थोडा वेळ दे. शेवटी 'लिहिणा ऱ्या चा'ही विचार करावा थोडा माणसाने... :) ता. क.: वाचून विचारात पडलेल्यांसाठी - हा खरंतर भला-मोठा SMS आहे एका मैत्रिणीला पाठवलेला... सेंट आयटम्स डिलीट करतेवेळी का माहित नाही सेव करावासा वाटला!

मला 'लंप्या' का आवडतो...

तर माझी आणि लंप्या ची ओळख काही फार जुनी नाही. नुकतीच पंधरा दिवसांपूर्वीची आहे. एका मैत्रिणीने माझी त्याच्याशी ओळख करून दिली. तसा तो आहे माझ्यापेक्षा लहान पण त्याच्यावर लगेच जीव जडला. तो आवडण्याची तशी खूप सारी कारणे आहेत, त्यातली काही आज तुम्हाला सांगायाचीयेत, बाकीची 'टॉप सिक्रेट'! १.  त्याची ओब्झर्वेशंस  : त्याला खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टींत जग दिसतं. प्रत्येक पाहिलेल्या किंवा ऐकलेल्या गोष्टींवर विचार हा त्याला करायलाच हवा. त्यातून, स्वत:चे असे, काही 'मॅड'सारखे अंदाज बांधायचे आणि मग बाकी संपूर्ण जग कसं 'मॅड' आहे, हे ठरवायचं. २.  त्याचं आपल्या लोकांवर असणारं प्रेम  : तो खरंतर राहतो आजी-आजोबांकडे, म्हणजे आई-बाबा, भाऊ-बहिणी यांच्यापासून दूर. त्याला नेहमी त्याच्या घरच्यांची आठवण सतावत असते. मधेच त्याला आपण त्या सगळ्यांपासून, विशेषत: आईपासून दूर जात आहोत अशी भीती देखील वाटत असते. मग तो त्यांच्या आठवणी जागवायला सुरुवात करतो आणि नकळत एक अदृश्य बंध दाखवतो, ज्याने तो घरच्यांशी बांधला गेलेला आहे. आणि आपल्याला अशी पक्की खात्री करून देतो कि तो कधीच त्यांच्या...

मैत्रीचे ठसे

काही नाती खरंच परिपूर्ण असतात, सर्वदूर असूनही जवळ भासतात, दररोज न बोलताही आठवण काढतात, रक्ताची नसूनही एकमेकांचं जग बनून जातात... क्वचितच भेटतात, पण भेटल्यावर धमाल उडवून देतात, जुन्या आठवणी उगाळून खिदळत बसतात, आणि पुढील भेटीसाठी आस लाऊन धरतात... एकमेकांची उणीदुणी काढतात, एकमेकांच्या जयावर पुन्हा टाळ्या पिटतात, पूर्वी ओढावलेल्या पराजयावर जरा अश्रू ढाळतात, आणि जुने बंध पुन्हा एकदा घट्ट करतात... एकमेकांकडे थोड्याश्या आश्चर्यानेच बघतात, काहीजण कसे बदलले याचा लेखाजोगा मांडतात, तर काहीजण अजूनही कसे अगदी तसेच आहेत हे ताडतात, आणि आपणच आपल्या नात्याचा तोल सांभाळतात... एकमेकांच्या आठवणीत कायम झुरत असतात, पण जेव्हा एकमेकांसोबत असतात तेव्हा एकमेकांचीच बनून जातात, खरंच काही नाती किती परिपूर्ण असतात, आणि हीच नाती परिपूर्ण मैत्रीचे ठसे पावलोपावली उमटवत असतात.... - मनाली साटम     ( ८ ऑगस्ट, २०११ )    

भिगी ज़ुल्फे आणि पुरुष मंडळी!

"झटककर जुल्फ जब तुम, तौलीये से बारीशे आझाद करती हो,  अच्छा लगता हैं...." सध्या ह्या ओळी खुपदा कानांवर पडतात. या ओळींची रचना मला जाम आवडते. प्रसून जोशी ला त्या साठी सलाम! पण मला एका वेगळ्याच गोष्टीचं आश्चर्य वाटतं, ते म्हणजे समस्त पुरुष वर्गाला मुलींच्या या (केस सुकवण्याच्या), rather किचकट गोष्टीबद्दल एवढं आकर्षण का असतं??? म्हणजे हे मला मान्य आहे कि नुकतीच आंघोळ करून आलेली बाला (ऐकायला जरा विचित्र वाटत ना?) खूप फ्रेश दिसते. तसे तर पुरुष हि फ्रेश दिसतात. मग मुलीन्बाबतीतच  असं का? खरं सांगायचं तर, अजून तरी हा प्रश्न मी माझ्या समस्त "मित्र" वर्गाला विचारलेला नाहीये. त्यामुळे मला खरच माहित नाहीये, कि नॉर्मल (म्हणजे कवी आणि ही सिनेमा वाली मंडळी सोडून) मुलांना अशा केस पुसत बाल्कनी किंवा दारात उभ्या मुलींकडे बघून काही होत असावं.  Self Confession : मी गेली कित्येक वर्षे (जेंव्हापासून स्वत:चे केस स्वत: पुसायला लागले तेव्हापासून) बाल्कनीत उभी राहूनच केस पुसते. आणि अगदी सिनेमात दाखवतात तसे. म्हणजे काही ठरवून वगैरे नाही, पण तीच केस सुकवण्याची साधारणत: पद्धत असते. ...

विपश्यना : एक चिंतन

विपश्यनेचा दहा दिवसांचा कोर्स करून आज पाच दिवस झालेत. याबद्दल लिहायचं हे नक्की होतं, पण गेले काही दिवस काय लिहू हे समजतच नव्हत. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा वेगळा असतो कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. म्हणूनच मला सर्वसमावेशक असं काहीतरी लिहायच होतं. आता बसलेय लिहायला... सर्वात आधी, विपश्यना म्हणजे काय?

कसाबचा so called वाढदिवस!!!

काल घडलेल्या सर्व घटनांमध्ये " कहर " कोणता असेल तर तो म्हणजे, " कसाबचा वाढदिवस "!!! आणि या वरूनच   कळतं, आपण किती " सजग " आहोत. सगळ्यांना सांगत सुटतो कि अफवांवर विश्वास ठेवू नका आणि पसरवू नका. आणि शेवटी तेच करतो. हे असं कसाब-कसाब करून त्याचं महत्त्व आपणच वाढवायचं आणि म्हणायचं कि सरकार त्याला महत्त्व देतंय. एवढ्या साऱ्या लोकांनी त्याचा वाढदिवस " साजरा " केल्याने त्यालाही त्याचा वाढदिवस नक्की कधी असतो याची शंका येईल. ह्यालाच काय ती " irony " म्हणत असावेत. आणि त्याला प्रोत्साहन देणारे हे ' सोशल नेटवर्किंग '! खरच मी स्वत:ला आज सुदैवी समजते कि काल काही अन्य कारणांमुळे मी त्या वेळेला ऑनलाइन आले नाही. नाहीतर माझ्याही हातून (via status & tweet) एक अफवा पसरवली गेली असती. आणि त्यामुळे अजून कित्येक जणांनी त्यावर विश्वास ठेवून त्याला पसरवलं असतं. सजगता माणसाने नक्की कुठे दाखवावी यावर आता विचार करायची गरज आहे. ता. क. : आता वीकिपीडीया वर किती विश्वास ठेवायचा यावर मी विचार करतेय. वृत्तपत्रानुसार एका चेन्नई स्थित बँक अधिकाऱ्याने ते प्रताप...

ना राहिले आज...

ना राहिली पवित्र आज ती गंगा, अन ना राहिला सुंदर तो ताज, परंतु आहे पवित्र आजही प्रेम तिचे, अन आहे सुंदर तिच्या शृंगारातील साज... ना सुगंधी आहे आज हा श्वास, अन ना राहिले आज जग ते धुंद, परंतु आहे सुगंधी आजही हि ओलेती माती, अन करतो मुग्ध आजही ह्या मोगऱ्याचा गंध.... - मनाली ( ता. क. : नवीन पोस्ट्सबद्दल अपडेटेड राहण्यासाठी फेसबुक वरील या ब्लॉगचे पेज जरूर "Like" करा.... :) )

माझ्यासारखाच....!

तूही असशील का माझ्यासारखाच, "आपल्या" अशा कोणाच्यातरी आठवणींत रमणारा.... त्या आठवणींतल्या दोन क्षणांत, भविष्य सांधणारा.... तूही असशील का माझ्यासारखाच, त्या डोळ्यांत "आपल्या"अशा कोणाचं तरी प्रतिबिंब पाहणारा.... आणि निव्वळ त्या प्रतिबिंबापायी, डोळ्यांत पुन्हा पुन्हा हरवणारा... तूही असशील का माझ्यासारखाच, "आपल्या"अशा कोणालातरी शोधणारा... आणि शोधता शोधता स्वत:च, स्वत:चं भान हरपून घेणारा.... तूही असशील का माझ्यासारखाच, "आपल्या"अशा कोणाचीतरी वाट बघणारा.... आणि वाट बघातानांच स्वत:च्या, भावनांची शाश्वता जपणारा.... तूही असशील का माझ्यासारखाच, शब्दांना वाट करून देण्याचा प्रयत्न करणारा.... आणि त्या प्रयत्नांतच कुठेतरी, मी तुझ्यासारखी आहे हि जाणीव करून देणारा.....

चंद्र-गूज...!

या अंधाऱ्या राती, तिच्या आठवणीने व्याकुळ तो, टक लावून बघतोय चंद्राकडे, डोळ्यांतूनच व्यक्त सर्वकाही.... तीही स्वप्नाळू डोळ्यांनी, निरखतेय त्या चंद्राला, तिच्या  डोळ्यातही तेच, जे त्याच्या डोळ्यांत.... नक्कीच त्यांचं बोलणं चालुये, उगाच  नाही त्याला, स्वप्नात  ती दिसतेय, अन् तिला तो.....

मिजास

खुपदा असं होतं की आपण आपल्याच धुंदीत जगत असतो.... स्वत:च्या जगाचे राजे असतो आणि अचानक असा दिवस येतो की काही लोक आपल्या आयुष्यात येतात. आपले मित्र बनतात. आपल्या आयुष्यातील खूप जिव्हाळ्याचा भाग बनून जातात. ज्यांना तोडणं आपल्याला कधीच शक्य होणार नाही असे. पण ही मंडळी सतत काही ना काही कारण काढून आपल्यावर हसतात, आपल्याला कमी दाखवायचा प्रयत्न करतात, अर्थात सर्व मैत्रीच्या नात्याने, एक प्रकारची मजा म्हणून.... जी साधारणत: मित्र-मैत्रिणींमध्ये होताच असते. पण का माहित नाही ती आपल्याला टोचू लागते. उगाच राग देऊन जाते. मग ती आपल्याला म्हणतात की, “ एवढं काय त्यात, मजा-मस्तीत चालत सगळं..... ” . आपल्यालाही त्यांचा म्हणणं पटून जातं. खरंच काय चुकीच बोलत असतात ते, आपण एवढा अधिकार त्यांना दिलेला असतो. सगळेच जण आपल्या मित्र-मैत्रिणींना एवढं हक्क देतात, मग आपल्यालाच का लागते ही गोष्ट??? का उगाच अपमानित झाल्यासारखा वाटतं...??? वाटतं की हे कोण आले आपल्याला असं बोलणारे??? त्यांची लायकी तरी आहे का??? मग प्रकरण जेंव्हा “ लायकी ” या शब्दावर येऊन पोहोचतं तेंव्हा वाटतं खरंच या गोष्टीचा  आता गांभीर्याने...