Skip to main content

Posts

Showing posts from June, 2013

दुनियादारी

"ये महलो, ये तख्तो, ये ताजो की दुनिया,                ये इंसान के दुश्मन समाजो की दुनिया,     ये दौलत के भूखे रवाजो की दुनिया,                ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या हैं?"            "दुनियादारी" वाचून झालं नुकतंच… मी हललेय पार आतून! म्हणजे हे असंच असतं का? कोणीच चूक आणि कोणीच बरोबर नसतं बहुतेक. शेवटी सगळं परिस्थितीच्या मनात असतं तसंच घडतं. मग ही स्वत:ची ओढाताण कशासाठी? आज इथे जिंकून मिळवायचं ते काय आणि हरायचं ते काय??? परिस्थिती आपल्याला सर्व या अशा मार्गाने का शिकवत असते? आज या क्षणी माझी जी काही स्वप्नं आहेत, ती जर उद्या पूर्ण झाली नाहीत तरी मी चालतंच राहणारेय. खरंतर, मला चालतच राहावं लागणार आहे. आज जर मला मध्ये काही सोडावं लागलं, तर ते पाठी ठेऊन मी पुढे जाणारेय… आजचे क्षण या उद्याच्या आठवणी आहेत. ज्या क्षणांना मी आज जपत नाही, त्या उद्या नाहीशा होणारेत. हा सिद्धांत आहे आणि या सिद्धांतावर माणूस निर्माण झाला आहे.  पण मग या आयुष्यात येणाऱ्या छोट्या छोट्या पर्वांचे काय? ती अशीच निघून जाणार वाटतं, भूतकाळात जमा होणार. हा आठवणींचा buffer-ove