काल घडलेल्या सर्व घटनांमध्ये "कहर" कोणता असेल तर तो म्हणजे, "कसाबचा वाढदिवस"!!! आणि या वरूनच कळतं, आपण किती "सजग" आहोत. सगळ्यांना सांगत सुटतो कि अफवांवर विश्वास ठेवू नका आणि पसरवू नका. आणि शेवटी तेच करतो. हे असं कसाब-कसाब करून त्याचं महत्त्व आपणच वाढवायचं आणि म्हणायचं कि सरकार त्याला महत्त्व देतंय. एवढ्या साऱ्या लोकांनी त्याचा वाढदिवस "साजरा" केल्याने त्यालाही त्याचा वाढदिवस नक्की कधी असतो याची शंका येईल. ह्यालाच काय ती "irony" म्हणत असावेत. आणि त्याला प्रोत्साहन देणारे हे 'सोशल नेटवर्किंग'! खरच मी स्वत:ला आज सुदैवी समजते कि काल काही अन्य कारणांमुळे मी त्या वेळेला ऑनलाइन आले नाही. नाहीतर माझ्याही हातून (via status & tweet) एक अफवा पसरवली गेली असती. आणि त्यामुळे अजून कित्येक जणांनी त्यावर विश्वास ठेवून त्याला पसरवलं असतं. सजगता माणसाने नक्की कुठे दाखवावी यावर आता विचार करायची गरज आहे.
ता. क. : आता वीकिपीडीया वर किती विश्वास ठेवायचा यावर मी विचार करतेय. वृत्तपत्रानुसार एका चेन्नई स्थित बँक अधिकाऱ्याने ते प्रताप केले होते. त्याची जबाबदारी आता कोणावर ढकलणार???
ता. क. : आता वीकिपीडीया वर किती विश्वास ठेवायचा यावर मी विचार करतेय. वृत्तपत्रानुसार एका चेन्नई स्थित बँक अधिकाऱ्याने ते प्रताप केले होते. त्याची जबाबदारी आता कोणावर ढकलणार???
Comments