मुली, तू खूप त्रास करून घेतेयेस. जरी तुला वाटतं की तू ठीक आहेस, सोर्टेड आहेस, तरी तसं नाहीये आणि हे तुलादेखील माहितीये. तुझ्या आत खूप साऱ्या गोष्टी आहेत, ज्या तू धड सांगत नाहीस कोणाला. I know it must be hard to accept everything, पण ते शेवटी करावंच लागतं ना. त्याला काही ऑप्शन नसतो. 'काही प्रश्न सोडून दिले कि सुटतात' हे पटतं मला. एवढं सगळं करूनही जर मनाप्रमाणे घडत नसेल, तर तू काहीच करू शकत नाहीस. अशा वेळी त्यातल्या त्यात योग्य डिसिजन घेऊन सोडून द्यावं असं आपलं माझं मत आहे. काळ जातो तशी उत्तरं सापडतात. तू खरंच खूप strong आहेस. हे पश्चात्ताप किंवा दुख: करून काहीच मिळत नाही. बोलायला खूप सोपं आहे माहितेय मला, पण accept करणं अशक्यही नाहीये. बस्स, थोडा वेळ दे. शेवटी 'लिहिणाऱ्याचा'ही विचार करावा थोडा माणसाने... :)
ता. क.: वाचून विचारात पडलेल्यांसाठी - हा खरंतर भला-मोठा SMS आहे एका मैत्रिणीला पाठवलेला... सेंट आयटम्स डिलीट करतेवेळी का माहित नाही सेव करावासा वाटला!
Comments