तर माझी आणि लंप्या ची ओळख काही फार जुनी नाही. नुकतीच पंधरा दिवसांपूर्वीची आहे. एका मैत्रिणीने माझी त्याच्याशी ओळख करून दिली. तसा तो आहे माझ्यापेक्षा लहान पण त्याच्यावर लगेच जीव जडला. तो आवडण्याची तशी खूप सारी कारणे आहेत, त्यातली काही आज तुम्हाला सांगायाचीयेत, बाकीची 'टॉप सिक्रेट'!
१. त्याची ओब्झर्वेशंस : त्याला खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टींत जग दिसतं. प्रत्येक पाहिलेल्या किंवा ऐकलेल्या गोष्टींवर विचार हा त्याला करायलाच हवा. त्यातून, स्वत:चे असे, काही 'मॅड'सारखे अंदाज बांधायचे आणि मग बाकी संपूर्ण जग कसं 'मॅड' आहे, हे ठरवायचं.
२. त्याचं आपल्या लोकांवर असणारं प्रेम : तो खरंतर राहतो आजी-आजोबांकडे, म्हणजे आई-बाबा, भाऊ-बहिणी यांच्यापासून दूर. त्याला नेहमी त्याच्या घरच्यांची आठवण सतावत असते. मधेच त्याला आपण त्या सगळ्यांपासून, विशेषत: आईपासून दूर जात आहोत अशी भीती देखील वाटत असते. मग तो त्यांच्या आठवणी जागवायला सुरुवात करतो आणि नकळत एक अदृश्य बंध दाखवतो, ज्याने तो घरच्यांशी बांधला गेलेला आहे. आणि आपल्याला अशी पक्की खात्री करून देतो कि तो कधीच त्यांच्यापासून तुटणार नाही.
३. त्याची शाळा : लंप्या त्याच्या गावातल्या एका छोट्याशा शाळेत जातो. त्याची आई देखील त्याच शाळेत होती. त्यामुळे कदाचित त्याला शाळा खूप जवळची वाटते! त्याला गायनात आणि चित्रकलेत विशेष रस आहे. त्याची शाळा त्याला या दोन्ही बाबतीत खूप प्रोत्साहन देते. प्लस त्याचे शाळेतले मित्र! जे अगदी त्याच्यासारखेच 'मॅड' आहेत.
४. त्याची व्यक्त होण्याची पद्धत : विशेषत: बोलण्याची ढब! त्याचा बोलण्यात एवढी निरागसता आहे कि काय सांगू. तो त्याच्या आजूबाजूच्या प्रत्येक विचित्र गोष्टीला 'मॅड' मानतो. मग ती त्याची भातुकलीत खोटा खोटा चहा बनवून देणारी बहीण असो वा काही सुचत नसताना खोलीत येरझाऱ्या मारणारे आजोबा असोत, त्याला हे सर्वच 'मॅड' वाटतात! अगदी निर्जीव वस्तूसुद्धा! आणि तो नेहमी 'एकोणवीसशे' वेळा विचार करतो बरं का!
५. त्याची मैत्रीण सुमी : या सुमीची आठवण जरी आली, तरी त्याच्या पोटात काहीतरी गडबड होते. ही सुमी त्याच्याशी कधी कधी खूप चांगली वागते, तर कधी कधी उगाचच त्याच्यावर रागवत असते. त्यामुळे त्याच्या दृष्टीने तर ती अगदीच 'मॅड' आहे!
तर असा हा 'मॅड' लंप्या आणि त्याचा म्हणजे अगदी त्याचाच 'मॅडनेस'!!!
सौजन्य : बुकगंगा |
ता.क. : तर बऱ्याच जणांना आतापर्यंत कळले असेल कि हे लंप्या काय प्रकरण आहे, परंतु कदाचित अशाही काही व्यक्ती असतील ज्या अजून लम्प्याला ओळखत नसतील, त्यांच्यासाठी :
लंप्या हा 'प्रकाश नारायण संत' यांच्या 'वनवास' या कथासंग्रहाचा 'मॅड'सा हिरो आहे, जो त्याच्या विचारांची असंख्य आंदोलने आपल्याला सहज तितक्या सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतोय. या सर्व प्रक्रियेला आपण एक प्रकारचा 'मॅडनेस' म्हटलंत तरी चालेल!!!
तर मला 'लंप्या' आवडण्याची ही काही कारणं आहेत, तुम्हालाही तो आवडेल अशी आशा! तरी तुम्हाला त्याच्याबद्दल नक्की काय आवडतं, हे प्रतिक्रियांद्वारे जरूर कळवा!
ता. ता. क. : पुस्तकाच्या मुखपृष्टाचा शोध घेता घेता लंप्या बद्दल अजून मॅड पोस्ट सापडली, जरूर वाचा : http://mansvi.blogspot.com/2011/03/blog-post.html
- मनाली
Comments
ह्याच पठडीतले अजून एक पुस्तक म्हणजे मिलिंद बोकीलांचे "शाळा"...
लंपन महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातली मराठी बोलत असतो ती ऐकायला/वाचायला फार गोड वाटते ..
आणि ब्रेक वगेरे घेऊच नको धडाधड वाचून काढ ...
@Manali: पुस्तकाची नोंद घेतलेय...आज बघतो वाचनालयात आहे का... नसेल तर Majestic जिंदाबाद :D
पण मनाली खूप खूप आभार्स ! :) .. लंपनची ओळख करून दिल्याबद्दल !
हा लेख वाचला नसता तर माहीत नाही लंपनची भेट कधी झाली असती... मी त्या साठी सदैव आभारी असेन.... !:)
मीही त्या व्यक्तीची खूप खूप आभारी आहे, जिने मला हे पुस्तक वाचायला सांगितलं...!
ani about Lampan.. lai goad porga ahe.. mazapan favorite ahe to.. tula toh awadala asel tar "Paddy Clarke ha ha ha" navacha Roddy Doylecha pustak ahe.. te vach.. tepan awdel khup
आणि हो, मी तू सांगितलेलं पुस्तक नक्कीच वाचेन...
धन्यवाद! आणि मला खूप आनंद आहे कि तुला माझा ब्लॉग आवडलाय! :) :) :)
Thanks for introducing Lapan to Deven n then to us via Deven...hi post wachyachi rahili hoti...
aata Lampan kadhi wachen mahit naahi pan list war nakki aahe...:)