विपश्यनेचा दहा दिवसांचा कोर्स करून आज पाच दिवस झालेत. याबद्दल लिहायचं हे नक्की होतं, पण गेले काही दिवस काय लिहू हे समजतच नव्हत. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा वेगळा असतो कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. म्हणूनच मला सर्वसमावेशक असं काहीतरी लिहायच होतं. आता बसलेय लिहायला...
सर्वात आधी, विपश्यना म्हणजे काय?
विपश्यना ही गौतम बुद्धांनी शिकवलेली स्व-शुद्धीकरण साधना आहे, जिचे अंतिम ध्येय हे "मुक्ती" आहे.
मला माहितीये कि हे ऐकायला जरा जड जातं. परंतु मुळात हे तेव्हढ कठीण नाहीये. मला याबद्दल माझ्या एका भावाकडून कळलं. तुमच्यापैकी majority लोकांनी याबद्दल ऐकला असेल. काही जण विपश्यना करत असतील, काही जण अजून विचारात असतील, तर काही जणांचा संबंधही नसेल. मी तिसरया गटात मोडणारी होते. माझा काही संबंधही नव्हता. माझ्या भावाने, दहा दिवसाचं शिबीर करून आल्यानंतर, मला त्याचा अनुभव ऐकवता-ऐकवताच माझा फोर्म भरून टाकला. आणि म्हणाला,"नंतर मन बदललं, तर त्यांना नाही म्हणून सांग....". म्हटलं,"बरं....". कोर्सच्या "कोड ऑफ डिसिप्लीन" आणि वेळापत्रक या दोन गोष्टी सोडून मला त्याबातात ओ का ठो माहित नव्हतं. अशा प्रकारे "एक कोरी पाटी" घेऊन मी निघाले घरातून... दहा दिवस सगळ्या जगापासून दूर... काहितरी नवीन शिकायला.... स्व:तासाठी थोडा वेळ द्यायला....
बरं जायच्या आधी मी थोडक्यात लिहून ठेवलं होतं कि मी का जातेय, ते असं....

" उद्या मी विपासनेसाठी जातेय आळंदीला... एका प्रकारची उत्सुकता आहे, तर दुसऱ्या बाजूला एक प्रकारे दडपणही आलंय. म्हणतात कठीण असतं खूप, पण फायदाही होतो. खरंच आता थोडा बदल हवाय आयुष्यात, म्हणजे मी दु:खी वगैरे झालेय असं अजिबात नाहीये. पण एक बदल हवाच ना आयुष्यात. म्हणजे काही चौकटी बनवल्यानंतर, त्या न तोडता त्यात मावण्यासाठी जी धडपड चालू असते, ती धडपड थोडी सोपी व्हावी हि आशा आहे. सगळ्यांनी नेहमी हसत-खेळत रहावी ही प्रत्येकाचीच ईच्छा असते. मग त्या हसण्या-खेळण्याच्या नादात स्वत:कडे जाम दुर्लक्ष होतं. आणि बाहेरून हसत-खेळताना आतून कुठेतरी जखडत जातो आपण. अगदी नकळत... पुसटशी कल्पनाही येत नाही आपल्याला. मग उगाच रितं-रितं वाटायला लागतं. म्हणायला सर्वांसोबत असलो तरी स्वत:सोबत कमी रहायला लागतो. दूर पळायला लागतो. पण हे त्या आजूबाजूच्या जगाला कधीच कळत नाही. जाणीव हि त्या व्यक्तीलाच होते. कदाचित ती मला आता होतेय. गोष्टींकडे पाहायचा नजरिया आता बदलायची गरज आहे. गोष्टी त्याच असणारेत पुढेही, पण त्या वेगळ्या भावनेने अनुभवायच्या आहेत... आणि त्यासाठीच हे दहा दिवस.अजून एक कारण आहे, विपासना ही खूप कठीण टेक्निक आहे असं ऐकलंय. स्वत:ला थोडं challenge करावं म्हणतेय. खरं सांगायचं तर गेल्या अठरा वर्षात काही खास आउट ऑफ द बॉक्स केलय असं मला तरी वाटत नाहीये.... "
आणि त्या दहा दिवसांनंतर खरंच मला काहीतरी वेगळं केल्याचं आणि त्यातून खूप काही शिकल्याचं समाधान लाभलं! मी तिथे जायच्या आधी नेटवर लोकांचे अनुभव वाचले होते, त्यात जवळ जवळ सगळ्यांनी लिहिलं होतं कि "they feel lighter, calmer and happier". मग मी विचार केला की एव्हढं जरी मिळालं तरी खूप आहे...
मी अगदी गुणी मुलीसारखी सुरुवात केली आणि मग मला जेव्हढ शक्य होतं तेव्हढ देण्याचा प्रयत्न केला. कधी कधी ध्यान नीट व्हायचं, तर कधी अजिबातच नाही. मन थोड्या वेळासाठी केंद्रित व्हायचं आणि मग पुन्हा भटकायला सुरुवात करायचं. खूप गोष्टी या निमित्ताने आठवल्या गेल्या, आणि त्यांच्या कडे स्थितप्रद्न्य नजरेने बघायचा एक प्रामाणिक प्रयत्न केला गेला. या दहा दिवसात तुम्ही स्थितप्रज्ञ राहणं अपेक्षित असतं. ते नेहमी सांगतात,
"Observe and Accept THE Reality As It Is, Not As You Would Like It To Be And Maintain Total Equanimity."
गौतम बुद्ध यांना पंचवीस शतकांपूर्वी झालेला साक्षात्कार हा खरंच मानवाला त्याच्या विकारांपासून (Miseries) दूर करू शकतो, हे मनाला पटून जाते. आपल्याकडे एवढी प्रगल्भ संस्कृती असताना, आपण ती न "जगता"च दुखात का मरावे, हाही प्रश्न पडतो....

वरती म्हटल्याप्रमाणे आज परत येऊन मला पाच दिवस झालेत. मला त्या दहा दिवसांमध्ये जे काही कमावलंय त्याचा प्रत्यय येतोय. आणि मला खात्री आहे कि तो येत राहणारेय. मला खूप हलकं वाटायला लागलंय, आत्मविश्वासही वाढल्याची जाणीव होतेय. आपल्यातली एक दुर्लक्षित बाजू, आपल्या मनाची शक्ती, प्रकाशात आल्याने तिचा वापर स्व:बदलासाठी कसा करता येईल याचा विचार आपसूकच होऊ लागलाय... पहिल्या प्रयत्नात या सर्व गोष्टींची जाणीव होणे, हेही नसे थोडके! :)
एस. एन. गोयंका यांनी घेतलेला हा लोककल्याणाचा वसा अत्यंत स्तुत्य आहे. आणि आपण त्याचा उपभोग घ्यायला हवा. "धम्म" दान हे सर्वोत्कृष दान मानले जाते, कारण ते काही काळापुरते मर्यादित नसते. ते चिरंतन असते. तर मी तुम्हा सगळ्यांना हे सर्व एकदा अनुभवण्याचा सल्ला जरूर देईन. खूप वेगळं वाटत स्वत:ला या "आपल्या so called जगा"पासून दूर केल्यावर... आणि मी या जगाला सो कॉल्ड का म्हणतेय हे तुम्हाला तिथे गेल्याशिवाय नक्कीच कळणार नाही. म्हटलं तर कठीण आहे, पण त्यानंतर मिळणारं समाधान ही परिपूर्ण आहे.... जरूर जा आणि स्वत:ला लोभ तसेच तिरस्कार या विकारांपासून दूर करण्याची साधना स्वत: अनुभवा...
विपश्यना कोर्स साठी वेबसाईट : http://www.dhamma.org/
Comments
चांगली माहिती आहे . धन्यवाद
इगतपुरी ला कोर्स मध्ये जागा मिळणे मुश्कील आहे.
तेव्हा आळंदी ला प्रयत्न करणे ओघाने आले. वेब साईट चाळतो,
जर्मनी वरून कधी येणे होते ते पहायचे.