Skip to main content

Posts

Showing posts from July, 2010

Edward Cullen

"If i could dream at all, it would be about you, and i'm not ashamed of it." - Edward Cullen खरंच हे नाव ऐकल्यावर मनात जी काही भावना येते ती जगातील कोणतीही शक्ती आणू शकणार नाही , हे मी खात्रीने सांगू शकते.... त्याच्याभोवती तयार झालेलं वलय हीच जणू त्याची शक्ती आहे... त्याची प्रत्येक कृती आपल्याला काही ना काही शिकवून जाते आणि नकळत आपल्याला त्याच्या प्रेमात पाडते..... स्वत: एक vampire असूनही त्याचं एका मुलीच्या प्रेमात पडणं , हे जेवढं रोमांचकारी आहे , त्याच्यापेक्षा त्या मुलीसाठी आपल्या प्राथमिक इच्छेवर ( तिचं रक्त  चाखण्याच्या  ) त्याने मिळवलेला विजय जास्त भावतो.... तो परिपूर्ण आहे , त्याच्याकडे ते सर्व काही आहे ज्याची एखादी मुलगी एका मुलाकडून अपेक्षा ठेवेल.... सर्वात महत्त्वाची गोष्ट , तो खूप handsome आहे.... तो एखाद्या देवतेच्या पुतळ्या सारखा आहे.... त्याचं स्वत:वर असलेलं नियंत्रण , त्याची प्रेम करण्याची कला वेड लावणारी आहे..... त्याने त्याच्या bella साठी केलेली प्रत्येक गोष्ट , त्याचं तिच्यावर असलेल प्रेम प्रतीत करते. तो तिच्या रक्षणासाठी सारखा झटत असतो , कारण त्य

का कळेना....

कधी कधी खरंच कळत नाही, काय होतंय ते.... पुढेही जाता येत नाही आणि आयुष्य   थांबूही   शकत नाही..... मग सुरु होतो या दोघांमधला एक खेळ.... विचार करून थकलो तरी थांबत नाहीत, असे विचार यायला सुरुवात होते.... कुठेतरी आपण दिशाहीनतेच्या दिशेने पाऊल टाकतोय असे वाटायला लागते आणि मग स्वत:ला आवरायची धडपड सुरु होते..... काही करून या मायाजालातून बाहेर पडायचे असा पक्का निश्चय केलेला असला तरी समोर मार्ग काहीच दिसत नाही..... मग मार्ग शोधायची धडपड सुरु होते.....या धडपडीत स्वत:चेही भान राहत नाही..... कुठे लागले का, हे बघायचीही फुरसत राहत नाही..... जखमा राहून जातात तश्याच.... एका अत्युच्च क्षणी थांबावेसे वाटते, जरा वळून मागे बघावेसे वाटते.... थोडाफार लेखाजोगा मांडायची इच्छा होते....... पण शेवटी येते ती निराशा, कारण आपण पाहतो स्वत:ला निव्वळ आणि निव्वळ काही थेंब ओंजळीत सामावून घेण्याच्या धडपडीत...... आणि मनात येते, " का कळेना....."  

मला तुझा वेळ हवाय....

आजपर्यंत मी कधीच तुझी मदत मागितली नाही , तू मात्र करत राहिलास तुझे आशीर्वाद देत राहिलास... सुदैव काय असते हे मला पाहून लोकांना   कळले , त्यांच्या नकळत ते प्रत्येक क्षणी माझ्यावर जळले... मला नेहमी   वाटत   की मला तुझी   गरज नाही , परन्तु तुझ्याशिवाय जग चालते   असा माझा   गैरसमजही   नाही... मी  फक्त कुठेतरी माझ्या   पायांवर उभा रहायचा प्रयत्न करत असते , तू नेहमी हात   पकडतोस   म्हणूनच   पडण्यापासून   वाचत असते... मी नेहमी ठरवते की तू दिलेल्या या कर्जाचे   ऋण   मी   फेडणार , तू माझ्यासाठी   केलेली प्रत्येक गोष्ट तुझ्या   मदतीशिवाय मी पार पाडणार... पण अजुन   काही   ते मला जमले नाही , मी अशी कशी वागू शकते हेच मला   कळले   नाही... पण आज   कुठेतरी   अपराधीपणाची   भावना मनात रुजू   लागलिये , तिच्या नकळत   ती   माझं   मन पोखरु लागलिये... जमेल का मला कधी तुझे   हे   ऋण   फेडणे ? की मरतानाही राहिल द्यायचे   तुझे   हे   देणे  ? तुला हवे तसे मी वागत   नाही   म्हणून तू माझ्यावर रागावाशील का ? माझ्या   या आयुष्याच्या वाटेवर माझी   साथ सोडून जाशील   का ? आज खरी मला तुझ्या   मदतीची गरज आह