Skip to main content

Posts

Showing posts from July, 2011

भिगी ज़ुल्फे आणि पुरुष मंडळी!

"झटककर जुल्फ जब तुम, तौलीये से बारीशे आझाद करती हो,  अच्छा लगता हैं...." सध्या ह्या ओळी खुपदा कानांवर पडतात. या ओळींची रचना मला जाम आवडते. प्रसून जोशी ला त्या साठी सलाम! पण मला एका वेगळ्याच गोष्टीचं आश्चर्य वाटतं, ते म्हणजे समस्त पुरुष वर्गाला मुलींच्या या (केस सुकवण्याच्या), rather किचकट गोष्टीबद्दल एवढं आकर्षण का असतं??? म्हणजे हे मला मान्य आहे कि नुकतीच आंघोळ करून आलेली बाला (ऐकायला जरा विचित्र वाटत ना?) खूप फ्रेश दिसते. तसे तर पुरुष हि फ्रेश दिसतात. मग मुलीन्बाबतीतच  असं का? खरं सांगायचं तर, अजून तरी हा प्रश्न मी माझ्या समस्त "मित्र" वर्गाला विचारलेला नाहीये. त्यामुळे मला खरच माहित नाहीये, कि नॉर्मल (म्हणजे कवी आणि ही सिनेमा वाली मंडळी सोडून) मुलांना अशा केस पुसत बाल्कनी किंवा दारात उभ्या मुलींकडे बघून काही होत असावं.  Self Confession : मी गेली कित्येक वर्षे (जेंव्हापासून स्वत:चे केस स्वत: पुसायला लागले तेव्हापासून) बाल्कनीत उभी राहूनच केस पुसते. आणि अगदी सिनेमात दाखवतात तसे. म्हणजे काही ठरवून वगैरे नाही, पण तीच केस सुकवण्याची साधारणत: पद्धत असते.

विपश्यना : एक चिंतन

विपश्यनेचा दहा दिवसांचा कोर्स करून आज पाच दिवस झालेत. याबद्दल लिहायचं हे नक्की होतं, पण गेले काही दिवस काय लिहू हे समजतच नव्हत. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा वेगळा असतो कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. म्हणूनच मला सर्वसमावेशक असं काहीतरी लिहायच होतं. आता बसलेय लिहायला... सर्वात आधी, विपश्यना म्हणजे काय?

कसाबचा so called वाढदिवस!!!

काल घडलेल्या सर्व घटनांमध्ये " कहर " कोणता असेल तर तो म्हणजे, " कसाबचा वाढदिवस "!!! आणि या वरूनच   कळतं, आपण किती " सजग " आहोत. सगळ्यांना सांगत सुटतो कि अफवांवर विश्वास ठेवू नका आणि पसरवू नका. आणि शेवटी तेच करतो. हे असं कसाब-कसाब करून त्याचं महत्त्व आपणच वाढवायचं आणि म्हणायचं कि सरकार त्याला महत्त्व देतंय. एवढ्या साऱ्या लोकांनी त्याचा वाढदिवस " साजरा " केल्याने त्यालाही त्याचा वाढदिवस नक्की कधी असतो याची शंका येईल. ह्यालाच काय ती " irony " म्हणत असावेत. आणि त्याला प्रोत्साहन देणारे हे ' सोशल नेटवर्किंग '! खरच मी स्वत:ला आज सुदैवी समजते कि काल काही अन्य कारणांमुळे मी त्या वेळेला ऑनलाइन आले नाही. नाहीतर माझ्याही हातून (via status & tweet) एक अफवा पसरवली गेली असती. आणि त्यामुळे अजून कित्येक जणांनी त्यावर विश्वास ठेवून त्याला पसरवलं असतं. सजगता माणसाने नक्की कुठे दाखवावी यावर आता विचार करायची गरज आहे. ता. क. : आता वीकिपीडीया वर किती विश्वास ठेवायचा यावर मी विचार करतेय. वृत्तपत्रानुसार एका चेन्नई स्थित बँक अधिकाऱ्याने ते प्रताप