मी २०११ मधील आठवणी लिहिल्या
होत्या. २०१२ मध्ये आळशीपणा केला. पण या वर्षी ठरवलंय मी, उशीर झाला तरी चालेल पण
लिहायचं. खरं सांगायचं तर सगळं किती बदलल्या सारखं वाटतं. म्हणजे दोन वर्षांपूर्वी
लिहिलेल्या गोष्टी वाचून तर मी खूप दूर आल्यासारखं वाटतं मला. आणि मला माहितेय ही
चांगली गोष्ट आहे, कारण माझा प्रवासावर खूप विश्वास आहे. ३६५ दिवसांत जर
तारखेशिवाय काही बदललं नसेल, तर ते दिवस वाया गेल्या सारखे आहेत. नाही का?
आता मी सांगेन त्या आठवणी ह्या घटनाक्रमानुसार (order-of-occurence
:P) आहेत, त्यात आवड-नावड असं काही नाही. :D
१.
Canvas
2
गेल्या वर्षी जानेवारी मध्ये मला माझा पहिला
वहिला smartphone मिळाला. देसी कंपनी चा स्वस्त आणि मस्त फोन! जेव्हा मी ठरवलं कि
हा फोन घ्यायचा तेव्हा अर्थात बरयाच लोकांनी नाकं मुरडली. पण खरं सांगते, it’s
been really good! J कॅमेरा पेक्षा फोटोग्राफर महत्त्वाचा तसेच फोन वापरणारा
कितपत फोन चा वापर करतो हे महत्त्वाचं ! मी नेहमी फोन ला चिकटून असते हि एक बाब
सोडली तर, सगळं किती सोपं वाटतं ह्या फोन्स मुळे.
ह्या फोन मुळे अजून एक अगदी सहज शक्य झालेली गोष्ट म्हणजे फोटोज काढून share करणे. ह्याला एकच उत्तर आहे Instagram! सध्या मी एक प्रोजेक्ट पण हाती घेतलाय, #Project365. मजा येतेय मला!
ह्या फोन मुळे अजून एक अगदी सहज शक्य झालेली गोष्ट म्हणजे फोटोज काढून share करणे. ह्याला एकच उत्तर आहे Instagram! सध्या मी एक प्रोजेक्ट पण हाती घेतलाय, #Project365. मजा येतेय मला!
२.
Hair-cut
गेल्या वर्षीच्या मार्च मध्ये मी आणि माझ्या बहिणीने केस अगदी कमी ठेवायचे असं ठरवलं. म्हणजे अगदी सहज, खास असं काहीच कारण नाही. एक प्रयोग म्हणून. खरंतर माझे केस हे माझं best feature आहे. मी जर थोडीफार सुंदर किंवा छान दिसत असेन, तर त्याचा संपूर्ण श्रेय त्या लांब केसांना जातं. आणि त्यांना असं अचानक (कोणालाही धड न सांगता) कापून टाकणं, हा माझ्या आयुष्यात (कदाचित) झालेला सगळ्यात मोठा बदल असेल.
(मी उगाच issue करतेय असं काही जणांना वाटू शकेल (esp. पुरुषमंडळी), पण मला आशा आहे की काही female-जात मला समजून घेतील.)

सगळ्यात मजा ही लोकांचा प्रतिसाद बघून आली!
म्हणजे जी कालपर्यंत व्यवस्थित होती तिने असा दीड-फूट केस कापून टाकण्याचा वेडेपणा
का केला, हे त्यांना कळत नव्हतं. समजू शकते मी त्यांना! पण i guess वेडेपणा होता म्हणूनच
मी तो केला! :D
३.
F.R.I.E.N.D.S
(hahaa i can already see some of you smiling J )
(hahaa i can already see some of you smiling J )
तर ह्या वर्षी मी Friends बघायला सुरुवात केली. सध्या
मी सातव्या सिझन वर आहे. त्यांचं आयुष्य बघताना खरंच खूप मजा येते. त्यांचे स्वभावगुण
आणि एकमेकांसाठी नेहमी ‘असणं’ तुम्हाला खुश करून जातं. एखाद्क्षणी तुम्हाला कंटाळा
आल्यासारखा वाचत असताना, फक्त Friends ची २५ मिनिटं तुम्हाला पुन्हा वरती आणू
शकतात ह्या वर मी काही हरेन. अशा सोप्या गोष्टी बनवणं आणि दहा वर्षे त्याच्याशी
खरं राहणं हे खरंच खूप कठीण आहे. म्हणूनच कदाचित ही मालिका अजूनही एवढी लोकप्रिय आहे.
४.
One
Direction
(ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी : One
Direction हा ५ मुलांचा Pop Band आहे.)
सो, ही पाच मुलं माझ्याच वयाची आहेत. ते अतिजास्त
लोकप्रिय आहेत. जगभरातून कोटी कोटी चाहते आहेत त्यांचे. एरवी क्षणभंगुर वाटणाऱ्या
या आयुष्यात त्यांनी या वयात मिळवलेलं यश हे खूपच मोठं आहे. ते त्यांच्या
स्वप्नातील आयुष्य जगताहेत.
ही मुलं माझ्याच वयाची असल्याने कदाचित, पण मी त्यांना
follow करते. त्याने कुठेतरी मला जाणीव होते कि अजून किती काही मिळवायचं आहे
आयुष्यात. आणि मी स्वप्न बघायला लागते.
५.
shifting
गेल्या वर्षी आम्ही आमच्याच कॉलनीमध्ये मोठ्या
घरात शिफ्ट झालो. (1BHK to 2BHK)
त्यामुळे मग मला आणि माझ्या बहिणीला आमची अशी एक
स्वतंत्र खोली मिळाली. आमची रूम आम्ही स्वत: सजवली आहे. अगदी आम्हाला हवी तशी.
स्वत:च घर स्वत: सजवण्यात एक वेगळीच मजा आहे. अजूनही आम्ही काही ना काही नवीन करतच
असतो रूम मध्ये! स्वत: ची रूम असल्याने ‘मैत्रिणीं’सोबत stay-over पण सोपे झालेत.
;) :D
(BTW नवीन रूम सोबतच मला नवीन laptop पण मिळालाय!
ह्या laptop वरून type करताना उगाच professional वगैरे झाल्यासारखं वाटतं. :P)
ता. क.: माझं लिहिणं खूप बदललंय असं वाटतंय मला, कारण मला लिहिताना
देखील थोडं कठीण वाटत होतं.
ता. ता. क.: २०१२ मधल्या दोन खूप मोठ्या आठवणी इथे लिहिल्यावाचून आता
राहवत नाहीये. सो प्लीज समजून घ्या.
२०१२ मध्ये मी राज ठाकरे ला भेटले. तेही त्यांच्या घराच्या बाहेर.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी २०१२ मध्ये शिट्टी मारायला शिकले. बोटांनी
मारतात ती वाली. एकदम भारी वाटतं. :D
Comments