Skip to main content

Posts

Showing posts from November, 2019

गेली १० वर्षे: ब्लॉगच्या अनुषंगाने माझा प्रवास

मी हा ब्लॉग २०१० मध्ये सुरू केला. तेव्हा त्याचं नाव स्वच्छंदी असं होतं. आणि मग २०१५ मध्ये याचं नाव सात्मन् असं बदललं. ह्या ब्लॉग वर शेवटची पोस्ट २०१६ मध्ये लिहिली आहे. आणि आज आपण २०१९ मध्ये आहोत. ह्या १० वर्षांच्या कालावधीत काय काय झाले ह्याचा हा धांडोळा! [Read this post in English: My journey through my blog ] २०१० मध्ये मला "व्यक्त" व्हायचे होते. त्यासाठी मी हा ब्लॉग स्वच्छंदी या नावाने सुरु केला. काही वर्षांनी माझ्या असं लक्षात आलं की मी काही स्वच्छंदी वगैरे नाहीये. स्वच्छंदी ही फारच युटोपियन संकल्पना आहे. स्वच्छंदी आयुष्य हे फक्त 'ठरलं आणि झालं' असं मिळवता येत नाही. जून २०१० मध्ये मी माझ्या अभियांत्रिकी कॉलेजच्या प्रवेशाची वाट बघत होते. मी बारावीमध्ये जास्त काही अभ्यास केला नाही. तेव्हा मी थोडेफार यमक जुळवून "कविता" लिहायचे. लोकं कॉमेंट्स वगैरे करायचे. त्यामुळेच कदाचित २०१०-११ मध्ये सगळ्यात जास्त पोस्ट्स लिहिले गेले.  २०१० मध्ये माझं इंजिनिअरिंगचं कॉलेज सुरू झालं खारघरला! वाढलेला प्रवास, नवीन वातावरण आणि नवीन मित्र-मैत्रिणी ह्