Skip to main content

स्वच्छंदी ते सात्मन्

सध्या प्रश्न हा आहे की मी पुन्हा इथे का आलेय?

मी २०१० मध्ये बारावीची परीक्षा झाल्यानंतर हा ब्लॉग लिहायला सुरु केलेला. आणि तेव्हाची कारणं ही खूप वेगळी होती. तेव्हा आतली घुसमट कुठेतरी व्यक्त व्हावी ही इच्छा होती. (VERSION - 2010)

परंतु आता विचार केल्यावर असं जाणवतंय की बरंच काही बदललंय आणि रोजच्या रोज बदलतंय. ह्या बदलांची कुठेतरी नोंद करून ठेवायला हवीये.

जर तुम्ही या आधी इथे कधी आला असाल तर तुमच्या लक्षात येईल की ह्या ब्लॉगचे नाव आता ‘सात्मन्’ असे झाले आहे. पूर्वी ते ‘स्वच्छंदी’ असे होते! आणि ह्या ब्लॉग चा address meemanali.blogspot.in असा होता! आणि आता मला त्या गोष्टीची लाज वाटत होती. म्हणजे स्वतःचं नाव त्या ब्लॉग address मध्ये ठेवण्यासाठी मी (mee) केलेला अट्टाहास आता मला नकोसा वाटत होता. आता नाहीये मी तशी! मी स्वच्छंदी देखील नाहीये. होय, हे खरं आहे. आणि मला त्याचा स्वीकार करणं हे शिकायलाचं हवं. मी स्वच्छंदी विचार करत असेन, परंतु मी स्वच्छंदी वागत नाही. त्याला बरीच कारणे आहेत. स्वच्छंदी हा एक प्रकारचा escape होता बहुतेक! त्या वेळेस मी जशी आहे त्याबाबत comfortable नसल्याने स्वत:च निर्माण केलेला एक आभास होता तो. आता देखील मी जशी आहे त्याबाबत मला चिक्कार तक्रारी आहे. पण ठीक्ये, मी दुसरी बाजू देखील आता आत्मसात करू शकते. मला पळ काढायची काही एक गरज वाटत नाही. And it’s such a good feeling!

मी पुन्हा ब्लॉग लिहायला सुरु करायचा विचार केल्यानंतर (आणि redesign केल्यानंतर) जुने posts वाचले. मला खरंच एखादा self-roast सादर करायची इच्छा होतेय. I mean I get it, की तेव्हाच्या काळासाठी ते योग्य होतं वगैरे! पण आता मला निव्वळ हास्यास्पद वाटतात काही posts. डोक्यात त्या delete करायचा विचार देखील आला एकदा. परंतु ते थोडं भ्याड वगैरे होईल, म्हणून तो विचार सोडून दिला. #embrace दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आता कविता करत नाही. मला माहीत नाही की मला कसं जमायचं. पण आता नाही जमत. किंवा मी लिहायचा प्रयत्न करत नाही. जे काही असेल ते, मुद्दा हा आहे की इथे कविता वाचायला मिळायची आशा असल्यास भ्रमनिरास होईल.

मी माझ्या diary (नोंदवही?) मध्ये लिहित असते अधेमध्ये. तेच आता जरा elaborately लिहायचा विचार आहे. स्वत:ला थोडी शिस्त लावायचा हा प्रयत्न आहे. कोणाशीतरी संवाद साधण्यासाठी दिलेली ही हाक आहे. आणि स्वत:ला समजून घ्यायचा हा अट्टाहास आहे.

- सात्मन्

ता. क.: मी ह्या ब्लॉगसाठी खास नवीन facebook page बनवले आहे. ‘स्वच्छंदी’चे अर्थात delete केलेय. Updates साठी ते Like करा. (link : ह्या ब्लॉगच्या नैऋत्य कोपऱ्यात :P )

Comments

Popular posts from this blog

विपश्यना : एक चिंतन

विपश्यनेचा दहा दिवसांचा कोर्स करून आज पाच दिवस झालेत. याबद्दल लिहायचं हे नक्की होतं, पण गेले काही दिवस काय लिहू हे समजतच नव्हत. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा वेगळा असतो कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. म्हणूनच मला सर्वसमावेशक असं काहीतरी लिहायच होतं. आता बसलेय लिहायला... सर्वात आधी, विपश्यना म्हणजे काय?

आयुष्यात पुढे जायचं असतं...!

आज लिहावंसं वाटतंय... किंवा कदाचित कॉम्प्युटर रडत-खडत चालतोय म्हणून  असेल...  हे लिहिणं आता जमेनासं झाल्यासारखं भासतंय... स्वत:बद्दल बरंच काही बदलल्यासारखं जाणवतंय, सभोवतालचं जग देखील बदलल्यासारखं वाटतंय... असं वाटतंय की या सगळ्या बदलांत आपण कुठेच नव्हतो आणि आज अचानक यात पडलोय, एखाद्या अनभिज्ञासारखे! सगळं नवीन! पण जुन्या जगाची आठवण करून देणारं ... तिथे परत जाण्याची आस निर्माण करणारं... कुठेतरी किंवा कधीतरी ते जग परत येईल अशी आशा निर्माण करणारं... वेगळं! पुन्हा नव्याने सुरुवात कर, असं सांगायचं असेल त्याला... पण ना काही पूर्वसूचना, ना मार्गदर्शक इशारा... विशाल महासागरात हरवलेल्या बोटीच्या खलाश्यासम... एकटं, स्वबळावर! पण त्या खलाश्याच्या मनातील विजीगिषु वृत्ती आपण कशी जागवणार... त्याला वेड असतं... तो त्याचे स्वप्न पूर्ण करायच्या इच्छेपोटी वेडा होऊन जातो... स्वत:ला हरवून बसतो! त्या नाविन्याच्या शोधात असं स्वत: हरवून जाण्यात ते सुख तरी काय असतं? स्वत:ला शोधण्यात वेळ व शक्ती दोन्ही खर्च होतेच, पण मग हे काम युक्तीने चालवावं तरी कसं! युक्तीने संपूर्ण जग खरंच चालू शकतं का? आणि...

शाळा = निरागसता !

" त्यादिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत , बाकं आहेत , पोरं-पोरी आहेत , सर आहेत , गणित आहे , भूगोल आहे , नागरिकशास्त्र सुध्दा ; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणार्‍या पांढर्‍या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत. त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते. खास एकट्याचीच. त्या शाळेत वर्ग नाहीत , भिंती नाहीत , फळा नाही , शिक्षक नाहीत ; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे..." :) शाळा चित्रपटाने मला काय दिलं??? तर बऱ्याच दिवसांनी काहीतरी गोड, निरागस आणि तरल गोष्ट ऐकल्याचा, पाहिल्याचा आनंद! :) आणि शाळा कादंबरीने मला काय दिलं होतं, तीच गोष्ट वाचल्याचा आनंद...! शाळा कादंबरी ही बहुतेकांच्या आवडत्या पुस्तकांतील एक आहे, अर्थात माझ्याही!!! ते पुस्तक वाचून आता दीड वर्षं झाली, पण सगळं कसं अगदी मनावर कोरलं गेल्याप्रमाणे लख्ख! क्षणात वेड लावलं कादंबरीने... आणि मग कुठेतरी ऐकिवात आलं की शाळा कादंबरीवर सिनेमा येणारेय... एवढा आनंद झाला म्हणून सांगू! म्हणजे जी पात्र, ज्या जागा आणि ज्या भावनांची आपण निव्वळ एक कल्पना केली होती, ते विश्व दृ...