Skip to main content

Posts

Showing posts from May, 2011

माझ्यासारखाच....!

तूही असशील का माझ्यासारखाच, "आपल्या" अशा कोणाच्यातरी आठवणींत रमणारा.... त्या आठवणींतल्या दोन क्षणांत, भविष्य सांधणारा.... तूही असशील का माझ्यासारखाच, त्या डोळ्यांत "आपल्या"अशा कोणाचं तरी प्रतिबिंब पाहणारा.... आणि निव्वळ त्या प्रतिबिंबापायी, डोळ्यांत पुन्हा पुन्हा हरवणारा... तूही असशील का माझ्यासारखाच, "आपल्या"अशा कोणालातरी शोधणारा... आणि शोधता शोधता स्वत:च, स्वत:चं भान हरपून घेणारा.... तूही असशील का माझ्यासारखाच, "आपल्या"अशा कोणाचीतरी वाट बघणारा.... आणि वाट बघातानांच स्वत:च्या, भावनांची शाश्वता जपणारा.... तूही असशील का माझ्यासारखाच, शब्दांना वाट करून देण्याचा प्रयत्न करणारा.... आणि त्या प्रयत्नांतच कुठेतरी, मी तुझ्यासारखी आहे हि जाणीव करून देणारा.....