Skip to main content

Posts

Showing posts from August, 2011

थोडसं 'सेव' केलेलं...!

मुली, तू खूप त्रास करून घेतेयेस. जरी तुला वाटतं की तू ठीक आहेस, सोर्टेड आहेस, तरी तसं नाहीये आणि हे तुलादेखील माहितीये. तुझ्या आत खूप साऱ्या गोष्टी आहेत, ज्या तू धड सांगत नाहीस कोणाला. I know it must be hard to accept everything, पण ते शेवटी करावंच लागतं ना. त्याला काही ऑप्शन नसतो. 'काही प्रश्न सोडून दिले कि सुटतात' हे पटतं मला. एवढं सगळं करूनही जर मनाप्रमाणे घडत नसेल, तर तू काहीच करू शकत नाहीस. अशा वेळी त्यातल्या त्यात योग्य डिसिजन घेऊन सोडून द्यावं असं आपलं माझं मत आहे. काळ जातो तशी उत्तरं सापडतात. तू खरंच खूप strong आहेस. हे पश्चात्ताप किंवा दुख: करून काहीच मिळत नाही. बोलायला खूप सोपं आहे माहितेय मला, पण accept करणं अशक्यही नाहीये. बस्स, थोडा वेळ दे. शेवटी 'लिहिणा ऱ्या चा'ही विचार करावा थोडा माणसाने... :) ता. क.: वाचून विचारात पडलेल्यांसाठी - हा खरंतर भला-मोठा SMS आहे एका मैत्रिणीला पाठवलेला... सेंट आयटम्स डिलीट करतेवेळी का माहित नाही सेव करावासा वाटला!

मला 'लंप्या' का आवडतो...

तर माझी आणि लंप्या ची ओळख काही फार जुनी नाही. नुकतीच पंधरा दिवसांपूर्वीची आहे. एका मैत्रिणीने माझी त्याच्याशी ओळख करून दिली. तसा तो आहे माझ्यापेक्षा लहान पण त्याच्यावर लगेच जीव जडला. तो आवडण्याची तशी खूप सारी कारणे आहेत, त्यातली काही आज तुम्हाला सांगायाचीयेत, बाकीची 'टॉप सिक्रेट'! १.  त्याची ओब्झर्वेशंस  : त्याला खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टींत जग दिसतं. प्रत्येक पाहिलेल्या किंवा ऐकलेल्या गोष्टींवर विचार हा त्याला करायलाच हवा. त्यातून, स्वत:चे असे, काही 'मॅड'सारखे अंदाज बांधायचे आणि मग बाकी संपूर्ण जग कसं 'मॅड' आहे, हे ठरवायचं. २.  त्याचं आपल्या लोकांवर असणारं प्रेम  : तो खरंतर राहतो आजी-आजोबांकडे, म्हणजे आई-बाबा, भाऊ-बहिणी यांच्यापासून दूर. त्याला नेहमी त्याच्या घरच्यांची आठवण सतावत असते. मधेच त्याला आपण त्या सगळ्यांपासून, विशेषत: आईपासून दूर जात आहोत अशी भीती देखील वाटत असते. मग तो त्यांच्या आठवणी जागवायला सुरुवात करतो आणि नकळत एक अदृश्य बंध दाखवतो, ज्याने तो घरच्यांशी बांधला गेलेला आहे. आणि आपल्याला अशी पक्की खात्री करून देतो कि तो कधीच त्यांच्या

मैत्रीचे ठसे

काही नाती खरंच परिपूर्ण असतात, सर्वदूर असूनही जवळ भासतात, दररोज न बोलताही आठवण काढतात, रक्ताची नसूनही एकमेकांचं जग बनून जातात... क्वचितच भेटतात, पण भेटल्यावर धमाल उडवून देतात, जुन्या आठवणी उगाळून खिदळत बसतात, आणि पुढील भेटीसाठी आस लाऊन धरतात... एकमेकांची उणीदुणी काढतात, एकमेकांच्या जयावर पुन्हा टाळ्या पिटतात, पूर्वी ओढावलेल्या पराजयावर जरा अश्रू ढाळतात, आणि जुने बंध पुन्हा एकदा घट्ट करतात... एकमेकांकडे थोड्याश्या आश्चर्यानेच बघतात, काहीजण कसे बदलले याचा लेखाजोगा मांडतात, तर काहीजण अजूनही कसे अगदी तसेच आहेत हे ताडतात, आणि आपणच आपल्या नात्याचा तोल सांभाळतात... एकमेकांच्या आठवणीत कायम झुरत असतात, पण जेव्हा एकमेकांसोबत असतात तेव्हा एकमेकांचीच बनून जातात, खरंच काही नाती किती परिपूर्ण असतात, आणि हीच नाती परिपूर्ण मैत्रीचे ठसे पावलोपावली उमटवत असतात.... - मनाली साटम     ( ८ ऑगस्ट, २०११ )