Skip to main content

Posts

Showing posts from October, 2010

तुझी आठवण.........

नाही येत मला आजकाल रोज-रोज तुझी आठवण, तू बनून गेलायस माझ्या हृदयातील एक साठवण..... पूर्वी दर मिनिटाला यायची तुझी आठवण उगाच, आणि उडवून जायची बोजवारा कामाचा सगळाच.... आज विचार केल्यावर वाटतं किती वेडे झालेले मी, जणू काही कृष्णाच्या प्रेमात आकंठ बुडालेली मीरा मी.... तू दूर गेल्यावरही एवढी शांत राहेन मी वाटले नव्हते कधीच, खरे सांगायचे तर तू एवढा दूर जाशील वाटले नव्हते कधीच.... तू दूर गेल्यावरही आज रिकामे वाटत नाहीये मला, तुझ्यासोबत जुळलेल्या सुखद आठवणींनी जणू भरून टाकलंय मला.... या आठवणींचा गंध असाच दरवळत हवाय मला आयुष्यभर, आणि त्यासाठीच आणखी थोड्या आठवणींचे अत्तर हवेय मला ओंजळभर.... आठवण नाही येत म्हणता-म्हणता चटकन एक ठिणगी पेटते, आणि तुझ्या आठवणींचा वणवा माझ्या मनाच्या वनभर पसरवते.... त्याक्षणी वाटते आज तू हवा होतास इथे माझ्याजवळ माझ्यासोबत, आयुष्य माझे पूर्ण झाले असते कदाचित राहून तुझ्यासोबत.... माझ्या आतल्या तुला मग मी शोधात राहते वणवण, तरी सांगते सगळ्यांना, "नाही येत आजकाल मला रोज-रोज तुझी आठवण........."