Skip to main content

Posts

Showing posts from September, 2010

"स्वच्छंदी"ची गोष्ट.....

संपूर्ण नाव : स्वच्छंदी   (आडनावाने एखाद्या व्यक्तीकडे पाहायचे संदर्भ बदलतात, त्यामुळे आडनावाचा उल्लेख टाळते आहे.....) हे माझं नाव मला खूप प्रिय आहे. असं नाव या जगात क्वचितच कोणाचं असेल आणि या नावाचा अर्थही मला प्रचंड आवडतो..... " स्वत:च्या छंदाने, स्वत:च्या आवडी-निवडीनुसार वागणारी ती स्वच्छंदी " स्वत:चे "स्व"त्त्व (मी पण नव्हे) जपायला मला खूप आवडतं. मी सगळ्यांपेक्षा वेगळी आहे आणि खूप special आहे..... तसं पाहिलं तर प्रत्येक व्यक्ती ही दुसऱ्यापेक्षा वेगळीच असते. कदाचित प्रत्येकाला आपले ओळख जपता येत नसावी. यासाठी खूप कारणं असतात आणि खूप कारणं देताही येतात.... पण अंतत: स्वत:शी प्रामाणिक राहणं महत्त्वाचं.....! मला खुपदा (नेहमी नाही) माहित असतं कि मी एखादी गोष्ट का करतेय..... त्यातून मला काय मिळणार आहे आणि समोरच्याला काय मिळणार आहे..... अशा काही गोष्टी नक्कीच असतात, ज्या त्या क्षणी का घडतात किंवा त्या क्षणी आपण त्या का करतो, याची आपल्याला काहीच कल्पना नसते.... त्या नकळत घडून जातात.....!!! अशावेळी मी स्वत:ला फक्त एवढंच सांगते..... " Everything has its own