आज मी एकटी एक सिनेमा बघायला
गेले. ‘मजबुरी’ म्हणून नाही तर बघायचा होता म्हणून! माझी एकटे जाऊन सिनेमा बघायची खूप
वर्षे इच्छा होती, पण कधी तशी वेळ आली नाही. या वेळेस सुद्धा आली नसती, परंतु
संधीची चाहूल लागताच मी ठरवलं कि यावेळेस नक्की! सिनेमा संपल्यावर समोरच्या क्यानी
मध्ये मी एका अनोळखी मुलीसोबत table share केले. हा अनुभवदेखील
पहिलाच! मी माझा सुलेमनी चहा पिता पिता तिच्याशी बऱ्याच गप्पा मारल्या. असे अनुभव खऱ्या
अर्थाने माणसाला समृध्द करतात!
सिनेमा ह्या गोष्टीकडे नेहमीच एक social गोष्ट म्हणून पहिले
जाते. त्यात तत्थ्य असले
तरी सिनेमा हा एक वैयक्तिक अनुभव असायला हवा. निदान माझ्यासाठी तरी आहे!
For
me, cinema is all about what it makes you feel. Cinema is a piece of art. We
should pay attention to its craft. There a quote by Rainbow Rowell from a
brilliant book called ‘Eleanor and Park’. It says, “Eleanor was right. She
never looked nice. She looked like art, and art wasn’t supposed to look nice;
it was supposed to make you feel.” So I try to measure everything that I see against
that unit. How much does it make me feel? Feelings can be either happy or sad,
either easy or uneasy. Sometimes both!
And
‘Tamasha’ is such experience!
सिनेमाची
झलक बघितल्यापासून हा सिनेमा बघायची उत्सुकता निर्माण झालेली! अशा गुंतागुंतीच्या
संहितांबद्दल मला नेहमीच उत्सुकता असते. माणसाच्या आत नक्की काय सुरु असते याचा
माग घेता घेता खूप साऱ्या नवीन गोष्टी सापडतात. मनुष्याच्या भावनिक विश्वाचे
कंगोरे उलगडणे हे एक प्रकारचे वेड आहे. अशा एखाद्या वेडाचा अनुभव घेतल्यानंतर
तुम्ही अनाहूतपणे जगाकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहता. सिनेमागृहातून परत
येतेवेळेस मी ती जादू सगळीकडे पाहत होते. लग्नाच्या मंडपाची सजावट करणाऱ्या मजूराच्या
त्या मलमली कापडाच्या सारख्या मापाच्या घड्या घालून खिले ठोकण्यात किंवा टाकीवर आपल्या
छोट्या मुलीला बसवून बाईकवरून वेगाने माझ्या समोरून गेलेल्या त्या जोडप्यात! हीच
खरी मजा आहे!
Being high on life,
सात्मन्
Comments