Skip to main content

Posts

Showing posts from October, 2015

स्वच्छंदी ते सात्मन्

सध्या प्रश्न हा आहे की मी पुन्हा इथे का आलेय? मी २०१० मध्ये बारावीची परीक्षा झाल्यानंतर हा ब्लॉग लिहायला सुरु केलेला. आणि तेव्हाची कारणं ही खूप वेगळी होती. तेव्हा आतली घुसमट कुठेतरी व्यक्त व्हावी ही इच्छा होती. ( VERSION - 2010 ) परंतु आता विचार केल्यावर असं जाणवतंय की बरंच काही बदललंय आणि रोजच्या रोज बदलतंय. ह्या बदलांची कुठेतरी नोंद करून ठेवायला हवीये. जर तुम्ही या आधी इथे कधी आला असाल तर तुमच्या लक्षात येईल की ह्या ब्लॉगचे नाव आता ‘सात्मन्’ असे झाले आहे. पूर्वी ते ‘स्वच्छंदी’ असे होते! आणि ह्या ब्लॉग चा address meemanali.blogspot.in असा होता! आणि आता मला त्या गोष्टीची लाज वाटत होती. म्हणजे स्वतःचं नाव त्या ब्लॉग address मध्ये ठेवण्यासाठी मी (mee) केलेला अट्टाहास आता मला नकोसा वाटत होता. आता नाहीये मी तशी! मी स्वच्छंदी देखील नाहीये. होय, हे खरं आहे. आणि मला त्याचा स्वीकार करणं हे शिकायलाचं हवं. मी स्वच्छंदी विचार करत असेन, परंतु मी स्वच्छंदी वागत नाही. त्याला बरीच कारणे आहेत. स्वच्छंदी हा एक प्रकारचा escape होता बहुतेक! त्या वेळेस मी जशी आहे त्याबाबत comfortable नसल्याने स्वत: