नाही येत मला आजकाल रोज-रोज तुझी आठवण, तू बनून गेलायस माझ्या हृदयातील एक साठवण..... पूर्वी दर मिनिटाला यायची तुझी आठवण उगाच, आणि उडवून जायची बोजवारा कामाचा सगळाच.... आज विचार केल्यावर वाटतं किती वेडे झालेले मी, जणू काही कृष्णाच्या प्रेमात आकंठ बुडालेली मीरा मी.... तू दूर गेल्यावरही एवढी शांत राहेन मी वाटले नव्हते कधीच, खरे सांगायचे तर तू एवढा दूर जाशील वाटले नव्हते कधीच.... तू दूर गेल्यावरही आज रिकामे वाटत नाहीये मला, तुझ्यासोबत जुळलेल्या सुखद आठवणींनी जणू भरून टाकलंय मला.... या आठवणींचा गंध असाच दरवळत हवाय मला आयुष्यभर, आणि त्यासाठीच आणखी थोड्या आठवणींचे अत्तर हवेय मला ओंजळभर.... आठवण नाही येत म्हणता-म्हणता चटकन एक ठिणगी पेटते, आणि तुझ्या आठवणींचा वणवा माझ्या मनाच्या वनभर पसरवते.... त्याक्षणी वाटते आज तू हवा होतास इथे माझ्याजवळ माझ्यासोबत, आयुष्य माझे पूर्ण झाले असते कदाचित राहून तुझ्यासोबत.... माझ्या आतल्या तुला मग मी शोधात राहते वणवण, तरी सांगते सगळ्यांना, "नाही येत आजकाल मला रोज-रोज तुझी आठवण........."
विपश्यनेचा दहा दिवसांचा कोर्स करून आज पाच दिवस झालेत. याबद्दल लिहायचं हे नक्की होतं, पण गेले काही दिवस काय लिहू हे समजतच नव्हत. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा वेगळा असतो कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. म्हणूनच मला सर्वसमावेशक असं काहीतरी लिहायच होतं. आता बसलेय लिहायला... सर्वात आधी, विपश्यना म्हणजे काय?
Comments
हे वाचून तो सुध्दा झाला वेडा ,
काय आठवण आहे तूझी ,
त्याच्यापाशी त्याने सुद्धा जगलेली,
हे ऐकून हि हरिणी सुद्धा,
प्रीयासाठी घायाळ झाली ,
कसे असते प्रेम कुणाचे कुणावर ,
जगता जगता हे प्रेम ,वाचकाचे होऊन बसते ,
मन शोधत असते तसेच काहीतरी आणि हे असे काही भेटत असते
नाहीतर आठवणी तिच्या वाहून जातील ,
मग मित्रा गर्दीतसुध्धा तुला,
त्या एकटं ठेऊन जातील
प्रतिसादाची देते खात्री या क्षणी तुला......
तुझे विचार असेच दरवळूदे.
दे वाट करून त्यांना,
आणि मुक्तपणे वाहू दे..
...नको साठवू इतक्या आठवणी,
कि तुझी ओंजळ भरून जाईल..
जुन्या आठवणी वाहून कदाचित,
ती अचानक रिकामी होईल..
तुझे पूर्णत्व त्याच्यात नको शोधू.
कदाचित ते मिळणार नाही..
ती आठवण ठिणगीच राहू दे,
वणवा झाली तर ती आठवण राहणार नाही..
नको होऊ राधा अन नको बनू मीरा,
तू आहेस 'स्वछंदी'
जिच्या असण्याने होतं आयुष्य आनंदी..
माझे तुझे अन् त्याचे सुद्धा,
तुझं माहित नाही मला,
तू साद देशील ही ,
पण मी हे ऐकू कसे ,
गर्दीतल्या अनोळखी चेहऱ्यात अग ,
स्वतःचे नावही अनोळखी भासे,
उगाच ग आठवणी साठ्ल्यात ,
विचार करतो कि त्यांना,
फुलं हारासारखे वाहवीन कधीतरी ,
खात्री आहे मी सुद्धा कदाचित,
निर्माल्या बनून त्यात वाहून ,
स्वतःला शोधुही शकणार नाही
आठवणींचाच एक ऋतू असता ,
तर एकदाच काय ते रडले असते,
मग कदाचित प्रेम दाखवायला,
अश्रू सुद्धा अग कमी पडले असते ...........:)
माझ्याही तुषारांत भिजून पहा मग:
तुझ्यामते,
तुझ्यासाठी,
अगाध प्रेमाचं सुनीत गाणारा केवळ तोच,
पण माझ्यामते,
ही तू नेहमी बाळगलेली समजूतच व्यर्थ,
तू फक्त चालायचं काम कर,
केव्हा न केव्हा,
कधीकाळी,
भेटेल तुझा तो तुला,
नि होईल तुझे जीवन सार्थ.
आशा आहे मजला,
कळला असेल तुला या
तोडक्या-मोडक्या ओळींतला
सहजपणे जीवन व्यतीत करण्याचा अर्थ.
सांगायचंच झालं तर,
नाही माझा यामधे
कसल्याही प्रकारचा सो कॉल्ड स्वार्थ.