Skip to main content

तुझी आठवण.........नाही येत मला आजकाल रोज-रोज तुझी आठवण,
तू बनून गेलायस माझ्या हृदयातील एक साठवण.....

पूर्वी दर मिनिटाला यायची तुझी आठवण उगाच,
आणि उडवून जायची बोजवारा कामाचा सगळाच....

आज विचार केल्यावर वाटतं किती वेडे झालेले मी,
जणू काही कृष्णाच्या प्रेमात आकंठ बुडालेली मीरा मी....

तू दूर गेल्यावरही एवढी शांत राहेन मी वाटले नव्हते कधीच,
खरे सांगायचे तर तू एवढा दूर जाशील वाटले नव्हते कधीच....

तू दूर गेल्यावरही आज रिकामे वाटत नाहीये मला,
तुझ्यासोबत जुळलेल्या सुखद आठवणींनी जणू भरून टाकलंय मला....

या आठवणींचा गंध असाच दरवळत हवाय मला आयुष्यभर,
आणि त्यासाठीच आणखी थोड्या आठवणींचे अत्तर हवेय मला ओंजळभर....

आठवण नाही येत म्हणता-म्हणता चटकन एक ठिणगी पेटते,
आणि तुझ्या आठवणींचा वणवा माझ्या मनाच्या वनभर पसरवते....

त्याक्षणी वाटते आज तू हवा होतास इथे माझ्याजवळ माझ्यासोबत,
आयुष्य माझे पूर्ण झाले असते कदाचित राहून तुझ्यासोबत....

माझ्या आतल्या तुला मग मी शोधात राहते वणवण,
तरी सांगते सगळ्यांना,
"नाही येत आजकाल मला रोज-रोज तुझी आठवण........." 

Comments

Rajaram rawool said…
वेडी आहेस तू त्याच्या प्रेमात ,
हे वाचून तो सुध्दा झाला वेडा ,
काय आठवण आहे तूझी ,
त्याच्यापाशी त्याने सुद्धा जगलेली,
हे ऐकून हि हरिणी सुद्धा,
प्रीयासाठी घायाळ झाली ,
कसे असते प्रेम कुणाचे कुणावर ,
जगता जगता हे प्रेम ,वाचकाचे होऊन बसते ,
मन शोधत असते तसेच काहीतरी आणि हे असे काही भेटत असते
मी तिच्याकडे पाहील्यावर आठवतात धुंद गाणी... आठवण तिची येता डोळ्यात येते पाणी…
Rajaram rawool said…
त्या पाण्याला साठवून ठेव,
नाहीतर आठवणी तिच्या वाहून जातील ,
मग मित्रा गर्दीतसुध्धा तुला,
त्या एकटं ठेऊन जातील
अशा या एकटेपणी निव्वळ एक साद दे मला,
प्रतिसादाची देते खात्री या क्षणी तुला......
Aditi Mahajan said…
तुझ्या आठवणींच्या गंधासोबत,
तुझे विचार असेच दरवळूदे.
दे वाट करून त्यांना,
आणि मुक्तपणे वाहू दे..
...नको साठवू इतक्या आठवणी,
कि तुझी ओंजळ भरून जाईल..
जुन्या आठवणी वाहून कदाचित,
ती अचानक रिकामी होईल..
तुझे पूर्णत्व त्याच्यात नको शोधू.
कदाचित ते मिळणार नाही..
ती आठवण ठिणगीच राहू दे,
वणवा झाली तर ती आठवण राहणार नाही..
नको होऊ राधा अन नको बनू मीरा,
तू आहेस 'स्वछंदी'
जिच्या असण्याने होतं आयुष्य आनंदी..
Rajaram rawool said…
प्रत्येकाचे मत वेगळे असते ,
माझे तुझे अन् त्याचे सुद्धा,
तुझं माहित नाही मला,
तू साद देशील ही ,
पण मी हे ऐकू कसे ,
गर्दीतल्या अनोळखी चेहऱ्यात अग ,
स्वतःचे नावही अनोळखी भासे,

उगाच ग आठवणी साठ्ल्यात ,
विचार करतो कि त्यांना,
फुलं हारासारखे वाहवीन कधीतरी ,
खात्री आहे मी सुद्धा कदाचित,
निर्माल्या बनून त्यात वाहून ,
स्वतःला शोधुही शकणार नाही

आठवणींचाच एक ऋतू असता ,
तर एकदाच काय ते रडले असते,
मग कदाचित प्रेम दाखवायला,
अश्रू सुद्धा अग कमी पडले असते ...........:)
वाऽऽ... काय सुमधूर मैफल रंगलीय इकडे!
माझ्याही तुषारांत भिजून पहा मग:

तुझ्यामते,
तुझ्यासाठी,
अगाध प्रेमाचं सुनीत गाणारा केवळ तोच,
पण माझ्यामते,
ही तू नेहमी बाळगलेली समजूतच व्यर्थ,
तू फक्त चालायचं काम कर,
केव्हा न केव्हा,
कधीकाळी,
भेटेल तुझा तो तुला,
नि होईल तुझे जीवन सार्थ.
आशा आहे मजला,
कळला असेल तुला या
तोडक्या-मोडक्या ओळींतला
सहजपणे जीवन व्यतीत करण्याचा अर्थ.
सांगायचंच झालं तर,
नाही माझा यामधे
कसल्याही प्रकारचा सो कॉल्ड स्वार्थ.
सुंदर कविता... आवडली !!

Popular posts from this blog

दुनियादारी

"ये महलो, ये तख्तो, ये ताजो की दुनिया,ये इंसान के दुश्मन समाजो की दुनिया,
ये दौलत के भूखे रवाजो की दुनिया,ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या हैं?"

 "दुनियादारी" वाचून झालं नुकतंच… मी हललेय पार आतून! म्हणजे हे असंच असतं का? कोणीच चूक आणि कोणीच बरोबर नसतं बहुतेक. शेवटी सगळं परिस्थितीच्या मनात असतं तसंच घडतं. मग ही स्वत:ची ओढाताण कशासाठी? आज इथे जिंकून मिळवायचं ते काय आणि हरायचं ते काय???

परिस्थिती आपल्याला सर्व या अशा मार्गाने का शिकवत असते? आज या क्षणी माझी जी काही स्वप्नं आहेत, ती जर उद्या पूर्ण झाली नाहीत तरी मी चालतंच राहणारेय. खरंतर, मला चालतच राहावं लागणार आहे. आज जर मला मध्ये काही सोडावं लागलं, तर ते पाठी ठेऊन मी पुढे जाणारेय…

आजचे क्षण या उद्याच्या आठवणी आहेत. ज्या क्षणांना मी आज जपत नाही, त्या उद्या नाहीशा होणारेत. हा सिद्धांत आहे आणि या सिद्धांतावर माणूस निर्माण झाला आहे. 
पण मग या आयुष्यात येणाऱ्या छोट्या छोट्या पर्वांचे काय? ती अशीच निघून जाणार वाटतं, भूतकाळात जमा होणार. हा आठवणींचा buffer-overflow झाला, तर काहीतरी garbage-collection सारखं mechanism वापरावं …

तू कोई और है

आज मी एकटी एक सिनेमा बघायला गेले. ‘मजबुरी’ म्हणून नाही तर बघायचा होता म्हणून! माझी एकटे जाऊन सिनेमा बघायची खूप वर्षे इच्छा होती, पण कधी तशी वेळ आली नाही. या वेळेस सुद्धा आली नसती, परंतु संधीची चाहूल लागताच मी ठरवलं कि यावेळेस नक्की! सिनेमा संपल्यावर समोरच्या क्यानी मध्ये मी एका अनोळखी मुलीसोबत table shareकेले. हा अनुभवदेखील पहिलाच! मी माझा सुलेमनी चहा पिता पिता तिच्याशी बऱ्याच गप्पा मारल्या. असे अनुभव खऱ्या अर्थाने माणसाला समृध्द करतात!
सिनेमा ह्या गोष्टीकडे नेहमीच एक social गोष्ट म्हणून पहिले जाते.त्यात तत्थ्य असले तरी सिनेमा हा एक वैयक्तिक अनुभव असायला हवा. निदान माझ्यासाठी तरी आहे! For me, cinema is all about what it makes you feel. Cinema is a piece of art. We should pay attention to its craft. There a quote by Rainbow Rowell from a brilliant book called ‘Eleanor and Park’. It says, “Eleanor was right. She never looked nice. She looked like art, and art wasn’t supposed to look nice; it was supposed to make you feel.” So I try to measure everything that I see against that unit. How m…

आयुष्यात पुढे जायचं असतं...!

आज लिहावंसं वाटतंय... किंवा कदाचित कॉम्प्युटर रडत-खडत चालतोय म्हणून  असेल... 
हे लिहिणं आता जमेनासं झाल्यासारखं भासतंय... स्वत:बद्दल बरंच काही बदलल्यासारखं जाणवतंय, सभोवतालचं जग देखील बदलल्यासारखं वाटतंय... असं वाटतंय की या सगळ्या बदलांत आपण कुठेच नव्हतो आणि आज अचानक यात पडलोय, एखाद्या अनभिज्ञासारखे!

सगळं नवीन! पण जुन्या जगाची आठवण करून देणारं ... तिथे परत जाण्याची आस निर्माण करणारं... कुठेतरी किंवा कधीतरी ते जग परत येईल अशी आशा निर्माण करणारं... वेगळं! पुन्हा नव्याने सुरुवात कर, असं सांगायचं असेल त्याला... पण ना काही पूर्वसूचना, ना मार्गदर्शक इशारा... विशाल महासागरात हरवलेल्या बोटीच्या खलाश्यासम... एकटं, स्वबळावर!

पण त्या खलाश्याच्या मनातील विजीगिषु वृत्ती आपण कशी जागवणार... त्याला वेड असतं... तो त्याचे स्वप्न पूर्ण करायच्या इच्छेपोटी वेडा होऊन जातो... स्वत:ला हरवून बसतो! त्या नाविन्याच्या शोधात असं स्वत: हरवून जाण्यात ते सुख तरी काय असतं?

स्वत:ला शोधण्यात वेळ व शक्ती दोन्ही खर्च होतेच, पण मग हे काम युक्तीने चालवावं तरी कसं! युक्तीने संपूर्ण जग खरंच चालू शकतं का? आणि जर ते चालत असेल, तर …