Skip to main content

तुझी आठवण.........



नाही येत मला आजकाल रोज-रोज तुझी आठवण,
तू बनून गेलायस माझ्या हृदयातील एक साठवण.....

पूर्वी दर मिनिटाला यायची तुझी आठवण उगाच,
आणि उडवून जायची बोजवारा कामाचा सगळाच....

आज विचार केल्यावर वाटतं किती वेडे झालेले मी,
जणू काही कृष्णाच्या प्रेमात आकंठ बुडालेली मीरा मी....

तू दूर गेल्यावरही एवढी शांत राहेन मी वाटले नव्हते कधीच,
खरे सांगायचे तर तू एवढा दूर जाशील वाटले नव्हते कधीच....

तू दूर गेल्यावरही आज रिकामे वाटत नाहीये मला,
तुझ्यासोबत जुळलेल्या सुखद आठवणींनी जणू भरून टाकलंय मला....

या आठवणींचा गंध असाच दरवळत हवाय मला आयुष्यभर,
आणि त्यासाठीच आणखी थोड्या आठवणींचे अत्तर हवेय मला ओंजळभर....

आठवण नाही येत म्हणता-म्हणता चटकन एक ठिणगी पेटते,
आणि तुझ्या आठवणींचा वणवा माझ्या मनाच्या वनभर पसरवते....

त्याक्षणी वाटते आज तू हवा होतास इथे माझ्याजवळ माझ्यासोबत,
आयुष्य माझे पूर्ण झाले असते कदाचित राहून तुझ्यासोबत....

माझ्या आतल्या तुला मग मी शोधात राहते वणवण,
तरी सांगते सगळ्यांना,
"नाही येत आजकाल मला रोज-रोज तुझी आठवण........." 

Comments

Rajaram rawool said…
वेडी आहेस तू त्याच्या प्रेमात ,
हे वाचून तो सुध्दा झाला वेडा ,
काय आठवण आहे तूझी ,
त्याच्यापाशी त्याने सुद्धा जगलेली,
हे ऐकून हि हरिणी सुद्धा,
प्रीयासाठी घायाळ झाली ,
कसे असते प्रेम कुणाचे कुणावर ,
जगता जगता हे प्रेम ,वाचकाचे होऊन बसते ,
मन शोधत असते तसेच काहीतरी आणि हे असे काही भेटत असते
मी तिच्याकडे पाहील्यावर आठवतात धुंद गाणी... आठवण तिची येता डोळ्यात येते पाणी…
Rajaram rawool said…
त्या पाण्याला साठवून ठेव,
नाहीतर आठवणी तिच्या वाहून जातील ,
मग मित्रा गर्दीतसुध्धा तुला,
त्या एकटं ठेऊन जातील
Manali Satam said…
अशा या एकटेपणी निव्वळ एक साद दे मला,
प्रतिसादाची देते खात्री या क्षणी तुला......
Aditi Mahajan said…
तुझ्या आठवणींच्या गंधासोबत,
तुझे विचार असेच दरवळूदे.
दे वाट करून त्यांना,
आणि मुक्तपणे वाहू दे..
...नको साठवू इतक्या आठवणी,
कि तुझी ओंजळ भरून जाईल..
जुन्या आठवणी वाहून कदाचित,
ती अचानक रिकामी होईल..
तुझे पूर्णत्व त्याच्यात नको शोधू.
कदाचित ते मिळणार नाही..
ती आठवण ठिणगीच राहू दे,
वणवा झाली तर ती आठवण राहणार नाही..
नको होऊ राधा अन नको बनू मीरा,
तू आहेस 'स्वछंदी'
जिच्या असण्याने होतं आयुष्य आनंदी..
Rajaram rawool said…
प्रत्येकाचे मत वेगळे असते ,
माझे तुझे अन् त्याचे सुद्धा,
तुझं माहित नाही मला,
तू साद देशील ही ,
पण मी हे ऐकू कसे ,
गर्दीतल्या अनोळखी चेहऱ्यात अग ,
स्वतःचे नावही अनोळखी भासे,

उगाच ग आठवणी साठ्ल्यात ,
विचार करतो कि त्यांना,
फुलं हारासारखे वाहवीन कधीतरी ,
खात्री आहे मी सुद्धा कदाचित,
निर्माल्या बनून त्यात वाहून ,
स्वतःला शोधुही शकणार नाही

आठवणींचाच एक ऋतू असता ,
तर एकदाच काय ते रडले असते,
मग कदाचित प्रेम दाखवायला,
अश्रू सुद्धा अग कमी पडले असते ...........:)
वाऽऽ... काय सुमधूर मैफल रंगलीय इकडे!
माझ्याही तुषारांत भिजून पहा मग:

तुझ्यामते,
तुझ्यासाठी,
अगाध प्रेमाचं सुनीत गाणारा केवळ तोच,
पण माझ्यामते,
ही तू नेहमी बाळगलेली समजूतच व्यर्थ,
तू फक्त चालायचं काम कर,
केव्हा न केव्हा,
कधीकाळी,
भेटेल तुझा तो तुला,
नि होईल तुझे जीवन सार्थ.
आशा आहे मजला,
कळला असेल तुला या
तोडक्या-मोडक्या ओळींतला
सहजपणे जीवन व्यतीत करण्याचा अर्थ.
सांगायचंच झालं तर,
नाही माझा यामधे
कसल्याही प्रकारचा सो कॉल्ड स्वार्थ.
सुंदर कविता... आवडली !!

Popular posts from this blog

विपश्यना : एक चिंतन

विपश्यनेचा दहा दिवसांचा कोर्स करून आज पाच दिवस झालेत. याबद्दल लिहायचं हे नक्की होतं, पण गेले काही दिवस काय लिहू हे समजतच नव्हत. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा वेगळा असतो कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. म्हणूनच मला सर्वसमावेशक असं काहीतरी लिहायच होतं. आता बसलेय लिहायला... सर्वात आधी, विपश्यना म्हणजे काय?

आयुष्यात पुढे जायचं असतं...!

आज लिहावंसं वाटतंय... किंवा कदाचित कॉम्प्युटर रडत-खडत चालतोय म्हणून  असेल...  हे लिहिणं आता जमेनासं झाल्यासारखं भासतंय... स्वत:बद्दल बरंच काही बदलल्यासारखं जाणवतंय, सभोवतालचं जग देखील बदलल्यासारखं वाटतंय... असं वाटतंय की या सगळ्या बदलांत आपण कुठेच नव्हतो आणि आज अचानक यात पडलोय, एखाद्या अनभिज्ञासारखे! सगळं नवीन! पण जुन्या जगाची आठवण करून देणारं ... तिथे परत जाण्याची आस निर्माण करणारं... कुठेतरी किंवा कधीतरी ते जग परत येईल अशी आशा निर्माण करणारं... वेगळं! पुन्हा नव्याने सुरुवात कर, असं सांगायचं असेल त्याला... पण ना काही पूर्वसूचना, ना मार्गदर्शक इशारा... विशाल महासागरात हरवलेल्या बोटीच्या खलाश्यासम... एकटं, स्वबळावर! पण त्या खलाश्याच्या मनातील विजीगिषु वृत्ती आपण कशी जागवणार... त्याला वेड असतं... तो त्याचे स्वप्न पूर्ण करायच्या इच्छेपोटी वेडा होऊन जातो... स्वत:ला हरवून बसतो! त्या नाविन्याच्या शोधात असं स्वत: हरवून जाण्यात ते सुख तरी काय असतं? स्वत:ला शोधण्यात वेळ व शक्ती दोन्ही खर्च होतेच, पण मग हे काम युक्तीने चालवावं तरी कसं! युक्तीने संपूर्ण जग खरंच चालू शकतं का? आणि जर ते चा

शाळा = निरागसता !

" त्यादिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत , बाकं आहेत , पोरं-पोरी आहेत , सर आहेत , गणित आहे , भूगोल आहे , नागरिकशास्त्र सुध्दा ; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणार्‍या पांढर्‍या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत. त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते. खास एकट्याचीच. त्या शाळेत वर्ग नाहीत , भिंती नाहीत , फळा नाही , शिक्षक नाहीत ; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे..." :) शाळा चित्रपटाने मला काय दिलं??? तर बऱ्याच दिवसांनी काहीतरी गोड, निरागस आणि तरल गोष्ट ऐकल्याचा, पाहिल्याचा आनंद! :) आणि शाळा कादंबरीने मला काय दिलं होतं, तीच गोष्ट वाचल्याचा आनंद...! शाळा कादंबरी ही बहुतेकांच्या आवडत्या पुस्तकांतील एक आहे, अर्थात माझ्याही!!! ते पुस्तक वाचून आता दीड वर्षं झाली, पण सगळं कसं अगदी मनावर कोरलं गेल्याप्रमाणे लख्ख! क्षणात वेड लावलं कादंबरीने... आणि मग कुठेतरी ऐकिवात आलं की शाळा कादंबरीवर सिनेमा येणारेय... एवढा आनंद झाला म्हणून सांगू! म्हणजे जी पात्र, ज्या जागा आणि ज्या भावनांची आपण निव्वळ एक कल्पना केली होती, ते विश्व दृ