Skip to main content

Love is in Me!

I'm not in Love, but Love is in Me!
कसली भारी कन्सेप्ट आहे बघा ना... म्हणजे तुम्ही प्रेमात नाही आहे, तर प्रेम तुमच्यात आहे!!!
प्रत्येकाची सुप्त ईच्छा असतेच की त्याने आयुष्यात एकदातरी कोणाच्यातरी प्रेमात पडावं. पण जर खुद्द प्रेम तुमच्यात असेल, तर प्रेमात पडायची गरजच काय!!! ते ऑलरेडी तुमच्यात पडलंय... (आय नो दिस सौंड्स सिली , बट यु गेट द पोईंट, डोन्ट यु???) म्हणजे जसं आपण इंग्लिश मध्ये म्हणू शकू, Love is 'in' You!
जर असं असेल तर प्रेम शोधायची काय गरज, ते तुमच्यात आहे. ज्या गोष्टी आपल्याला अगदी मनापासून आवडतात, त्या गोष्टींच्या आपण प्रेमात आहोत असं आपण म्हणतो.
"मी आज अमक्या पुस्तकाच्या प्रेमात पडलेय..."
"मी निसर्गावर अगदी मनापासून प्रेम करते..."
"आय लव माय फ्रेंड्स..."
"आय'म सो इन लव विथ हिम...", वगैरे वगैरे गोष्टी आपण नेहमी बोलत असतो...
पण हे 'प्रेमात आहोत' म्हणजे नक्की काय???
आणि हे 'प्रेमात असणे ' आणि 'प्रेम करणे' म्हणजे सेमच आहे की वेगवेगळ???

Twilight Saga मधली नायिका तिच्या बेस्ट फ्रेंडला म्हणते की, "Jake, I love you, but i'm not in love with you..." हे वाचल्यावर वाटलेलं की कोडं सुटलं... पण आता, यात कोड्यात पडण्यासारखं होतं तरी काय, असं वाटतंय!!!
काही गोष्टी क्लिक झाल्यावर जग किती सोप्पं झाल्यासारखं वाटतं!
'प्रेम अनुभवल्याशिवाय कळत नाही...'
'प्रेम ही एक abstract संकल्पना आहे' असं सगळे म्हणतात, मग त्याला थोडा वास्तवाचा स्पर्श द्यायला काय हरकतेय...
म्हणजे जर प्रेम तुमच्यात आहे, तर त्यासोबत काय करायचं हे सर्वस्वी तुम्ही ठरवणार; स्वत:कडे साठवून ठेवायचं की जगासोबत शेअर करायचं ते....!
थोर=मोठ्यांनी सांगून ठेवलंय 'अति तिथे माती'... आता प्रेमासारख्या पवित्र गोष्टीची माती करण्यात काय अर्थ आहे??? त्यापेक्षा SHARE IT!!!




- स्वच्छंदी

Comments

Anonymous said…
love is in d air...
i breathe air...
so i have love in me...
i loved that love is in me thus i love me... :)

now i m in love wid this post...
spread d love...
Manali Satam said…
@davbindu : you wrote the lines??? Beautiful they are!!!
n yes, Spread The Love!
Anonymous said…
yesss ...just wrote this lines,after reading u r post ... THanks... :)
Shriraj said…
:) याची मला कधी जाणीवच नाही झाली. ती करून दिल्याबद्दल thanks!!!
Manali Satam said…
@ गीतांजली: Thank You So Much! N Welcome...!
@ श्रीराज: My Pleasure!!! :)
Unknown said…
सुंदर ! असा कधी विचारच केला नव्हता.
Manali Satam said…
@ketan : :) मी लिहिलेलं काहीतरी वाचून वेगळा विचार करताय हे वाचून जाम मस्त वाटलं!!!
Aditi Mahajan said…
hmm...patlay bara ka!! ;)
Manali Satam said…
@ Aditi : धन्यवाद मुली!!!
K P said…
नमस्कार,
तुमची ती भीगी जुल्फेंवाली पोस्ट आवडली. अहो, तो कार्यक्रम पाहणे हा एक सोहळा असतो..:))शायरीची सुरुवात तिथेच होत असावी.
Manali Satam said…
धन्यवाद केदार! :)

Popular posts from this blog

विपश्यना : एक चिंतन

विपश्यनेचा दहा दिवसांचा कोर्स करून आज पाच दिवस झालेत. याबद्दल लिहायचं हे नक्की होतं, पण गेले काही दिवस काय लिहू हे समजतच नव्हत. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा वेगळा असतो कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. म्हणूनच मला सर्वसमावेशक असं काहीतरी लिहायच होतं. आता बसलेय लिहायला... सर्वात आधी, विपश्यना म्हणजे काय?

आयुष्यात पुढे जायचं असतं...!

आज लिहावंसं वाटतंय... किंवा कदाचित कॉम्प्युटर रडत-खडत चालतोय म्हणून  असेल...  हे लिहिणं आता जमेनासं झाल्यासारखं भासतंय... स्वत:बद्दल बरंच काही बदलल्यासारखं जाणवतंय, सभोवतालचं जग देखील बदलल्यासारखं वाटतंय... असं वाटतंय की या सगळ्या बदलांत आपण कुठेच नव्हतो आणि आज अचानक यात पडलोय, एखाद्या अनभिज्ञासारखे! सगळं नवीन! पण जुन्या जगाची आठवण करून देणारं ... तिथे परत जाण्याची आस निर्माण करणारं... कुठेतरी किंवा कधीतरी ते जग परत येईल अशी आशा निर्माण करणारं... वेगळं! पुन्हा नव्याने सुरुवात कर, असं सांगायचं असेल त्याला... पण ना काही पूर्वसूचना, ना मार्गदर्शक इशारा... विशाल महासागरात हरवलेल्या बोटीच्या खलाश्यासम... एकटं, स्वबळावर! पण त्या खलाश्याच्या मनातील विजीगिषु वृत्ती आपण कशी जागवणार... त्याला वेड असतं... तो त्याचे स्वप्न पूर्ण करायच्या इच्छेपोटी वेडा होऊन जातो... स्वत:ला हरवून बसतो! त्या नाविन्याच्या शोधात असं स्वत: हरवून जाण्यात ते सुख तरी काय असतं? स्वत:ला शोधण्यात वेळ व शक्ती दोन्ही खर्च होतेच, पण मग हे काम युक्तीने चालवावं तरी कसं! युक्तीने संपूर्ण जग खरंच चालू शकतं का? आणि जर ते चा

शाळा = निरागसता !

" त्यादिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत , बाकं आहेत , पोरं-पोरी आहेत , सर आहेत , गणित आहे , भूगोल आहे , नागरिकशास्त्र सुध्दा ; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणार्‍या पांढर्‍या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत. त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते. खास एकट्याचीच. त्या शाळेत वर्ग नाहीत , भिंती नाहीत , फळा नाही , शिक्षक नाहीत ; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे..." :) शाळा चित्रपटाने मला काय दिलं??? तर बऱ्याच दिवसांनी काहीतरी गोड, निरागस आणि तरल गोष्ट ऐकल्याचा, पाहिल्याचा आनंद! :) आणि शाळा कादंबरीने मला काय दिलं होतं, तीच गोष्ट वाचल्याचा आनंद...! शाळा कादंबरी ही बहुतेकांच्या आवडत्या पुस्तकांतील एक आहे, अर्थात माझ्याही!!! ते पुस्तक वाचून आता दीड वर्षं झाली, पण सगळं कसं अगदी मनावर कोरलं गेल्याप्रमाणे लख्ख! क्षणात वेड लावलं कादंबरीने... आणि मग कुठेतरी ऐकिवात आलं की शाळा कादंबरीवर सिनेमा येणारेय... एवढा आनंद झाला म्हणून सांगू! म्हणजे जी पात्र, ज्या जागा आणि ज्या भावनांची आपण निव्वळ एक कल्पना केली होती, ते विश्व दृ