I'm not in Love, but Love is in Me!कसली भारी कन्सेप्ट आहे बघा ना... म्हणजे तुम्ही प्रेमात नाही आहे, तर प्रेम तुमच्यात आहे!!!
प्रत्येकाची सुप्त ईच्छा असतेच की त्याने आयुष्यात एकदातरी कोणाच्यातरी प्रेमात पडावं. पण जर खुद्द प्रेम तुमच्यात असेल, तर प्रेमात पडायची गरजच काय!!! ते ऑलरेडी तुमच्यात पडलंय... (आय नो दिस सौंड्स सिली , बट यु गेट द पोईंट, डोन्ट यु???) म्हणजे जसं आपण इंग्लिश मध्ये म्हणू शकू, Love is 'in' You!
जर असं असेल तर प्रेम शोधायची काय गरज, ते तुमच्यात आहे. ज्या गोष्टी आपल्याला अगदी मनापासून आवडतात, त्या गोष्टींच्या आपण प्रेमात आहोत असं आपण म्हणतो.
"मी आज अमक्या पुस्तकाच्या प्रेमात पडलेय..."
"मी निसर्गावर अगदी मनापासून प्रेम करते..."
"आय लव माय फ्रेंड्स..."
"आय'म सो इन लव विथ हिम...", वगैरे वगैरे गोष्टी आपण नेहमी बोलत असतो...
पण हे 'प्रेमात आहोत' म्हणजे नक्की काय???
आणि हे 'प्रेमात असणे ' आणि 'प्रेम करणे' म्हणजे सेमच आहे की वेगवेगळ???
Twilight Saga मधली नायिका तिच्या बेस्ट फ्रेंडला म्हणते की, "Jake, I love you, but i'm not in love with you..." हे वाचल्यावर वाटलेलं की कोडं सुटलं... पण आता, यात कोड्यात पडण्यासारखं होतं तरी काय, असं वाटतंय!!!काही गोष्टी क्लिक झाल्यावर जग किती सोप्पं झाल्यासारखं वाटतं!
'प्रेम अनुभवल्याशिवाय कळत नाही...'
'प्रेम ही एक abstract संकल्पना आहे' असं सगळे म्हणतात, मग त्याला थोडा वास्तवाचा स्पर्श द्यायला काय हरकतेय...
म्हणजे जर प्रेम तुमच्यात आहे, तर त्यासोबत काय करायचं हे सर्वस्वी तुम्ही ठरवणार; स्वत:कडे साठवून ठेवायचं की जगासोबत शेअर करायचं ते....!
थोर=मोठ्यांनी सांगून ठेवलंय 'अति तिथे माती'... आता प्रेमासारख्या पवित्र गोष्टीची माती करण्यात काय अर्थ आहे??? त्यापेक्षा SHARE IT!!!
- स्वच्छंदी
Comments
i breathe air...
so i have love in me...
i loved that love is in me thus i love me... :)
now i m in love wid this post...
spread d love...
n yes, Spread The Love!
@ श्रीराज: My Pleasure!!! :)
तुमची ती भीगी जुल्फेंवाली पोस्ट आवडली. अहो, तो कार्यक्रम पाहणे हा एक सोहळा असतो..:))शायरीची सुरुवात तिथेच होत असावी.