"झटककर जुल्फ जब तुम, तौलीये से बारीशे आझाद करती हो,
अच्छा लगता हैं...."
सध्या ह्या ओळी खुपदा कानांवर पडतात. या ओळींची रचना मला जाम आवडते. प्रसून जोशी ला त्या साठी सलाम! पण मला एका वेगळ्याच गोष्टीचं आश्चर्य वाटतं, ते म्हणजे समस्त पुरुष वर्गाला मुलींच्या या (केस सुकवण्याच्या), rather किचकट गोष्टीबद्दल एवढं आकर्षण का असतं??? म्हणजे हे मला मान्य आहे कि नुकतीच आंघोळ करून आलेली बाला (ऐकायला जरा विचित्र वाटत ना?) खूप फ्रेश दिसते. तसे तर पुरुष हि फ्रेश दिसतात. मग मुलीन्बाबतीतच असं का?
खरं सांगायचं तर, अजून तरी हा प्रश्न मी माझ्या समस्त "मित्र" वर्गाला विचारलेला नाहीये. त्यामुळे मला खरच माहित नाहीये, कि नॉर्मल (म्हणजे कवी आणि ही सिनेमा वाली मंडळी सोडून) मुलांना अशा केस पुसत बाल्कनी किंवा दारात उभ्या मुलींकडे बघून काही होत असावं.
Self Confession : मी गेली कित्येक वर्षे (जेंव्हापासून स्वत:चे केस स्वत: पुसायला लागले तेव्हापासून) बाल्कनीत उभी राहूनच केस पुसते. आणि अगदी सिनेमात दाखवतात तसे. म्हणजे काही ठरवून वगैरे नाही, पण तीच केस सुकवण्याची साधारणत: पद्धत असते. लहानपणी कुठे डोंबल माहित होतं, की यावर सुंदर रचना लिहिल्या जातात. खरंतर मुलींच्या जीवनातील अतिशय रुटीन अशी ही गोष्ट आहे. आणि त्या वेळी मुली (मुलांना आकर्षित करण्यापेक्षा) माझे केस किती गळायला लागलेत याची चिंता करत असतात. निदान मी तरी! आणि अर्थात जर लोकांना त्यात काही सुंदर वगैरे वाटत असेल तर माझी ना नाही!!! ;) परन्तु माझ्या बाबतीत असं फिल्मी काहीतरी अजून तरी घडलेलं नाहीये! खैर, माणसाने आशावादी असावं....
तर आपण या सिनेमांमधून खूप काही शिकत असतो. अगदी नकळत! माझ्या मते याच गोष्टीचा प्रभाव मुलांवर पडत असावा. आपल्या इथे खूप साऱ्या सिनेमांमध्ये हिरोईनीची एन्ट्री ही अशीच केस पुसताना दाखवली जाते. मग त्या हीरोचे ते शरण जाणे, वगैरे वगैरे. त्या हीरोला त्यात एवढं काय सौंदर्य दिसतंय, हे शोधण्याच्या धडपडीत अशा रचना लिहिल्या जात असाव्यात असा माझा आपला तर्क आहे. तुमच्यापैकी काही जणांना काही वर्षांपूर्वी आलेलं एक गाणं आठवत असेल, Ghar Se Nikalte Hi
"घर से निकलते ही, कुछ दूर चलते ही, रस्ते में हैं उसका घर,
कल सुबह देखा तो, बाल बनाती वो, खिड़की में आई नजर..."
बघितलं यातही ती केसांशी काहीतरी करत असते. त्या नंतर "होशवालो को" मधेही सोनाली बेंद्रे तिच्या टेरेस वर केस पुसत उभी असते. अजूनही अशी खूप सारी उदाहरणं देता येतील (म्हणजे मला अजून आठवत नाहीयेत :D). बॉलीवूड मध्ये हाही एक प्रकारचा ट्रेंड आहे, असं म्हणायला हरकत नाही. आणि कितीही ग्लोबलायझेशन झालं तरी, आपल्या इथल्या हिरोंना हिरोईन ही "टॉवेल"नेच केस पुसताना आवडते, ना की ड्रायर ने! भारतीय मुलाचं आणि त्यातही विशेषत: मराठी मुलाचं हे एक असतं, त्यांना मातीशी जुळलेल्या गोष्टी आवडतात. मुलगी ही शेवटी त्यांना साडीतच जास्त भावते. मग ते कितीही ग्लोबलाईस्द का असेनात. जाउदे, हे विषयांतर आहे. या मुद्द्यावर पुन्हा कधीतरी!
तर मूळ मुद्दा! भिगी झुल्फे!!!
मला या प्रसंगांचे चित्रीकरणही जाम आवडतं. म्हणजे एवढी क्रीएटीव्हीटी असते त्यात, की कॅमेरा सुद्धा त्या सौंदर्यावर फिदा झालाय यावर आपला विश्वास बसतो. आपणही नकळत त्या झुल्फो च्या प्रेमात पडतो आणि त्या ओल्या बटांमध्ये कुठेतरी हरवून जातो.... मग कुठेतरी गर्लफ्रेंड किंवा बायकोचे ते ओले केस पाहून मुलांना काहीतरी होत असावं आणि मुलींनाही बॉयफ्रेंड किंवा नवऱ्यासोबत मस्त पावसात भिजायला जाताना केस मोकळे सोडून, त्या हिरोईनिसारखे पुसायची ईच्छा होत असावी... फक्त आणि फक्त "त्याचा" तो "totally-surrendered-look" मिळवण्यासाठी.... :)
तर अशा प्रकारे बरचश्या काय म्हणूया आपण, दुर्लक्षित गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी प्रवृत्त केल्याबद्दल या "भिगी झुल्फे" ना डेडीकेट केलेल्या सर्व ओळी स्मरून ही पोस्ट संपवते.... जाता जाता अशीच एक वीज्यूअल ट्रीट!!!
ता. क. : पल्लवी कसली गोड दिसतेय यात! या वीडीओ खाली असलेली एक कमेंट लगेच लक्ष वेधून घेते, खुद्द पल्लवी ने ती वाचली असेल का देव जाणे!
"Thumbs up! If you watch this ad just to see her and her smile : D
This chick's smile would cause world peace if all the guys on earth would just stop for a second and admire her beauty : P "
Comments
पण ते मुलीना कळायचं नाही.. बॉलीवुडवाले म्हणतात ना "मेरी नजर से तुम देखो तो .... " :)
काही ओळी आठवल्या ही पोस्ट वाचून.. खुप जुना अल्बम आहे हा. वफा
आर से रंग पे तेरे गुलनिसार
तेरी जुल्फों पे घटा ये खुश्बंवार
हर तरफ़ है तेरी ही रंगीनिया..
छाई मौसम पे सब तेरी शोखिया..
:) :)
हेरंब म्हणतो तसं.... "मेरी नजर से तुम देखो तो.."
माझ्या ब्लॉगचा पत्ता:http://prashantredkarsobat.blogspot.com/
एक जुनी कविता ठेवतो ईथे, माझ्या मनातल्या बाल्कनीची, तुझ्यासाठी.
.
.
बाल्कनीत सतत येण्याची
सवय तुला आहे
हळूच मला न्याहळण्याची
सवय तुला आहे
.
तुझी सवय आवडते गं
मला खूप खूप
डोळ्यांना डोळ्यांचा
कळतो गं निरोप
डोळ्यात तुला साठवण्याची
सवय मला आहे
हळूच मला न्याहळण्याची
सवय तुला आहे
.
काल केस वाळवण्याचा
कहर तू गं केला
बाल्कनीत हृदय धरून
तोल माझा गेला
तुला बघून मोहरण्याची
सवय मला आहे
हळूच मला न्याहळण्याची
सवय तुला आहे
.
आज अचानक मला बघोनी
गोड हासली तू
हाय खोल खोल मनात
घुसुन बैसली तू
तुला स्मरत स्मरत जगण्याची
सवय मला आहे
हळूच मला न्याहळण्याची
सवय तुला आहे
.
तुषार जोशी, नागपुर
.
@ BinaryBandya: धन्यवाद!
@ Ketan Patil : धन्यवाद केतनसाहेब, पण "ते सुद्धा मराठीत" म्हणजे???
तूच काय कोणत्याच मुलीला नाही कळणार!
:)
Its a guy thing!
हो आणि तो मुलींना केस गळताहेत याचं टेन्शन हा मुद्दा तर चिक्कार पटला (मी ’मुलगी ’ होते तेव्हा मलाही असायचं हे टेन्शन आता ” आई आणि बाई ’ झाल्यावर टेन्शन घेउन उपयोग नाही त्याने अजून केस गळतील अशी चिंता सतावते बघ ;)) :)
@sahajach : आज तुमची कमेंट पाहून दिल खुश हुआ!!! आणि केस गळण्याच्या बाबतीत :D !