आज आरशात बघताना काहीतरी वेगळेपणा जाणवला या चेहऱ्यात
कुठेतरी त्या डोळ्यांत अभिमान दिसला स्वत:चाच
संध्याकाळी फोन आला होता मावशीचा
म्हणत होती आठवण आली तिला माझी
जाहिरातीतल्या त्या नटीला पाहून
तिचं हसणं, तिचे डोळे....
तू सुद्धा मला हेच म्हणाला होतास ना?
तू ना अगदी "ति"च्यासारखी दिसतेस
आणि मग तिच्यासारखी hair style कर
म्हणून तगादा लावलास मागे माझ्या
तिचा चित्रपट पाहताना निव्वळ आठवण आली
म्हणून परत पाहायला गेलास तिच्यातल्या मला
फक्त एक गाणं बघून कशी रे तूला
तिच्यात मी दिसले प्रश्न सलतोय मनात माझ्या
खरंच थकले रे तेव्हा तूला नाही-नाही म्हणून
पण खरं सांगायचा तर मन आलं होतं आनंदाने भरून
वाटायचं तू पुन्हा-पुन्हा तिला पहावस
आणि पुन्हा-पुन्हा माझी आठवण काढावीस
निदान तिच्या रुपात का होईना
तू मला तुझी म्हणून पाहावीस
तेव्हापासून स्वत:च्या या चेहऱ्याने
एक प्रकारचं वेड लावलंय मला
तुझ्या मनात या चेहऱ्याने का होईना
घर केल्याचं समाधान लाभलंय मला
पण यावर आता काळ सरलाय बराच
आपल्या नात्यातही आता फरक पडलाय बराच
आणि आता तर तूही म्हणायला लागलेलास,
"लूक चेंज कर यार , तिला बघून ना तुझी आठवण येते........."
Comments
I hope you recognized me..
I went through the posts and honestly was thrilled by the fact that you in the world of blogging too.Nicely narrated & framed thoughts..
Well I don't know how to comment in Marathi;so expressing my views in English.
Look forward for more blogs :)
and to write in marathi follow link :
http://www.google.com/transliterate/Marathi
looking forward to your blog!!!!
फ़क्त " म्हणत होतो आठवण आली तिला माझी" ह्या ओळीत ’म्हणत होती ’हे करेक्शन कर..
याला कविता म्हणावं का हा प्रश्न पडला होता....
तो सोडवल्याबद्दलही आभार....
आणि तुम्हाला कविता आवडली हे वाचून आनंद झाला....