Skip to main content

Posts

जग एक कोवळा भास...

भीती दाटली आज मनी , कसा सावरू सारा डाव , सरल्या आठवणी जणू , पाडूनी हृदयावर घाव ... वाटे भेटावे आज तिला , द्यावे नात्यास नवे नाव , समुद्री उफाळल्या लाटा , सावरावी बुडती नाव ... स्वप्न सानुले पाहिले जे , पूर्णत्त्व आहे देणे त्यास , वादळात अडकुनी या , नासे जगण्याची आस ... आरशात पाहुनी मज , मी सोडला एक नि : श्वास , लख्ख दिसले त्या डोळ्यांत , जग एक कोवळा भास ... - सात्मन   ( १९ - ०५ - २०१२ )  

शाळा = निरागसता !

" त्यादिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत , बाकं आहेत , पोरं-पोरी आहेत , सर आहेत , गणित आहे , भूगोल आहे , नागरिकशास्त्र सुध्दा ; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणार्‍या पांढर्‍या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत. त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते. खास एकट्याचीच. त्या शाळेत वर्ग नाहीत , भिंती नाहीत , फळा नाही , शिक्षक नाहीत ; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे..." :) शाळा चित्रपटाने मला काय दिलं??? तर बऱ्याच दिवसांनी काहीतरी गोड, निरागस आणि तरल गोष्ट ऐकल्याचा, पाहिल्याचा आनंद! :) आणि शाळा कादंबरीने मला काय दिलं होतं, तीच गोष्ट वाचल्याचा आनंद...! शाळा कादंबरी ही बहुतेकांच्या आवडत्या पुस्तकांतील एक आहे, अर्थात माझ्याही!!! ते पुस्तक वाचून आता दीड वर्षं झाली, पण सगळं कसं अगदी मनावर कोरलं गेल्याप्रमाणे लख्ख! क्षणात वेड लावलं कादंबरीने... आणि मग कुठेतरी ऐकिवात आलं की शाळा कादंबरीवर सिनेमा येणारेय... एवढा आनंद झाला म्हणून सांगू! म्हणजे जी पात्र, ज्या जागा आणि ज्या भावनांची आपण निव्वळ एक कल्पना केली होती, ते विश्व दृ...

2011 तील बेस्ट आठवणी

तर आज २०११ सालचा शेवटचा दिवस आहे. २०११ माझ्यासाठी तरी बरंच झक्कास वर्ष होतं. खूप साऱ्या निरनिराळ्या आठवणी आहेत या वर्षाच्या. त्यातल्या ५ मनाच्या सर्वात जवळ असलेल्या आठवणी शेअर करतेय. खरंतर यांच्या क्रमावर जाऊ नका. आठवणींमध्ये कसली आलीये तुलना! त्या गोड तर गोड, नाहीतर वाईट तर वाईट! सोयीसाठी या घटना ज्या क्रमाने घडल्यात त्या क्रमाने सांगते. तर.... "वर्ल्डकप" :  मार्च महिना तर वर्ल्डकप च्या नशेतच गेला आणि एप्रिल मध्ये वर्ल्डकप आपल्या घरी आला. हो, "आपल्या"च! म्हणजे निदान मला तरी तो माझ्याच घरी आला आहे असं वाटतं होतं. मला खात्री आहे तुम्हालाही तसंच काहीसं वाटलं असेल! तो निव्वळ वर्ल्डकप न राहता एक उत्सव, जल्लोष होता. जसा आपण एखादा सण आपल्या कुटुंब आणि दोस्त मंडळींसोबत साजरा करतो तसा वर्ल्डकप सगळ्यांनी साजरा केला. प्रत्येक  मॅचची एक वेगळी आठवण! आणि फायनल तर कळस होता! म्हणजे धोनी ने मारलेला तो सिक्स आणि त्या क्षणी पूर्ण झालेली करोडो लोकांची स्वप्नं... :)   नऊ दिवसांचे "मौन" : या वर्षी मी एक खूप महत्त्वाची शिकलेली गोष्ट म्हणजे विपश्यना ! आणि त्यासाठीच मी जव...

Love is in Me!

I'm not in Love, but Love is in Me! कसली भारी कन्सेप्ट आहे बघा ना... म्हणजे तुम्ही प्रेमात नाही आहे, तर प्रेम तुमच्यात आहे!!! प्रत्येकाची सुप्त ईच्छा असतेच की त्याने आयुष्यात एकदातरी कोणाच्यातरी प्रेमात पडावं. पण जर खुद्द प्रेम तुमच्यात असेल, तर प्रेमात पडायची गरजच काय!!! ते ऑलरेडी तुमच्यात पडलंय... (आय नो दिस सौंड्स सिली , बट यु गेट द पोईंट, डोन्ट यु???) म्हणजे जसं आपण इंग्लिश मध्ये म्हणू शकू, Love is 'in' You! जर असं असेल तर प्रेम शोधायची काय गरज, ते तुमच्यात आहे. ज्या गोष्टी आपल्याला अगदी मनापासून आवडतात, त्या गोष्टींच्या आपण प्रेमात आहोत असं आपण म्हणतो. "मी आज अमक्या पुस्तकाच्या प्रेमात पडलेय..." "मी निसर्गावर अगदी मनापासून प्रेम करते..." "आय लव माय फ्रेंड्स..." "आय'म सो इन लव विथ हिम...", वगैरे वगैरे गोष्टी आपण नेहमी बोलत असतो... पण हे 'प्रेमात आहोत' म्हणजे नक्की काय??? आणि हे 'प्रेमात असणे ' आणि 'प्रेम करणे' म्हणजे सेमच आहे की वेगवेगळ??? Twilight Saga मधली नायिका तिच्या बेस्ट फ्रेंडला ...

थोडसं 'सेव' केलेलं...!

मुली, तू खूप त्रास करून घेतेयेस. जरी तुला वाटतं की तू ठीक आहेस, सोर्टेड आहेस, तरी तसं नाहीये आणि हे तुलादेखील माहितीये. तुझ्या आत खूप साऱ्या गोष्टी आहेत, ज्या तू धड सांगत नाहीस कोणाला. I know it must be hard to accept everything, पण ते शेवटी करावंच लागतं ना. त्याला काही ऑप्शन नसतो. 'काही प्रश्न सोडून दिले कि सुटतात' हे पटतं मला. एवढं सगळं करूनही जर मनाप्रमाणे घडत नसेल, तर तू काहीच करू शकत नाहीस. अशा वेळी त्यातल्या त्यात योग्य डिसिजन घेऊन सोडून द्यावं असं आपलं माझं मत आहे. काळ जातो तशी उत्तरं सापडतात. तू खरंच खूप strong आहेस. हे पश्चात्ताप किंवा दुख: करून काहीच मिळत नाही. बोलायला खूप सोपं आहे माहितेय मला, पण accept करणं अशक्यही नाहीये. बस्स, थोडा वेळ दे. शेवटी 'लिहिणा ऱ्या चा'ही विचार करावा थोडा माणसाने... :) ता. क.: वाचून विचारात पडलेल्यांसाठी - हा खरंतर भला-मोठा SMS आहे एका मैत्रिणीला पाठवलेला... सेंट आयटम्स डिलीट करतेवेळी का माहित नाही सेव करावासा वाटला!

मला 'लंप्या' का आवडतो...

तर माझी आणि लंप्या ची ओळख काही फार जुनी नाही. नुकतीच पंधरा दिवसांपूर्वीची आहे. एका मैत्रिणीने माझी त्याच्याशी ओळख करून दिली. तसा तो आहे माझ्यापेक्षा लहान पण त्याच्यावर लगेच जीव जडला. तो आवडण्याची तशी खूप सारी कारणे आहेत, त्यातली काही आज तुम्हाला सांगायाचीयेत, बाकीची 'टॉप सिक्रेट'! १.  त्याची ओब्झर्वेशंस  : त्याला खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टींत जग दिसतं. प्रत्येक पाहिलेल्या किंवा ऐकलेल्या गोष्टींवर विचार हा त्याला करायलाच हवा. त्यातून, स्वत:चे असे, काही 'मॅड'सारखे अंदाज बांधायचे आणि मग बाकी संपूर्ण जग कसं 'मॅड' आहे, हे ठरवायचं. २.  त्याचं आपल्या लोकांवर असणारं प्रेम  : तो खरंतर राहतो आजी-आजोबांकडे, म्हणजे आई-बाबा, भाऊ-बहिणी यांच्यापासून दूर. त्याला नेहमी त्याच्या घरच्यांची आठवण सतावत असते. मधेच त्याला आपण त्या सगळ्यांपासून, विशेषत: आईपासून दूर जात आहोत अशी भीती देखील वाटत असते. मग तो त्यांच्या आठवणी जागवायला सुरुवात करतो आणि नकळत एक अदृश्य बंध दाखवतो, ज्याने तो घरच्यांशी बांधला गेलेला आहे. आणि आपल्याला अशी पक्की खात्री करून देतो कि तो कधीच त्यांच्या...

मैत्रीचे ठसे

काही नाती खरंच परिपूर्ण असतात, सर्वदूर असूनही जवळ भासतात, दररोज न बोलताही आठवण काढतात, रक्ताची नसूनही एकमेकांचं जग बनून जातात... क्वचितच भेटतात, पण भेटल्यावर धमाल उडवून देतात, जुन्या आठवणी उगाळून खिदळत बसतात, आणि पुढील भेटीसाठी आस लाऊन धरतात... एकमेकांची उणीदुणी काढतात, एकमेकांच्या जयावर पुन्हा टाळ्या पिटतात, पूर्वी ओढावलेल्या पराजयावर जरा अश्रू ढाळतात, आणि जुने बंध पुन्हा एकदा घट्ट करतात... एकमेकांकडे थोड्याश्या आश्चर्यानेच बघतात, काहीजण कसे बदलले याचा लेखाजोगा मांडतात, तर काहीजण अजूनही कसे अगदी तसेच आहेत हे ताडतात, आणि आपणच आपल्या नात्याचा तोल सांभाळतात... एकमेकांच्या आठवणीत कायम झुरत असतात, पण जेव्हा एकमेकांसोबत असतात तेव्हा एकमेकांचीच बनून जातात, खरंच काही नाती किती परिपूर्ण असतात, आणि हीच नाती परिपूर्ण मैत्रीचे ठसे पावलोपावली उमटवत असतात.... - मनाली साटम     ( ८ ऑगस्ट, २०११ )