Skip to main content

2011 तील बेस्ट आठवणी

तर आज २०११ सालचा शेवटचा दिवस आहे. २०११ माझ्यासाठी तरी बरंच झक्कास वर्ष होतं. खूप साऱ्या निरनिराळ्या आठवणी आहेत या वर्षाच्या. त्यातल्या ५ मनाच्या सर्वात जवळ असलेल्या आठवणी शेअर करतेय. खरंतर यांच्या क्रमावर जाऊ नका. आठवणींमध्ये कसली आलीये तुलना! त्या गोड तर गोड, नाहीतर वाईट तर वाईट! सोयीसाठी या घटना ज्या क्रमाने घडल्यात त्या क्रमाने सांगते. तर....
  • "वर्ल्डकप" : 
    मार्च महिना तर वर्ल्डकप च्या नशेतच गेला आणि एप्रिल मध्ये वर्ल्डकप आपल्या घरी आला. हो, "आपल्या"च! म्हणजे निदान मला तरी तो माझ्याच घरी आला आहे असं वाटतं होतं. मला खात्री आहे तुम्हालाही तसंच काहीसं वाटलं असेल! तो निव्वळ वर्ल्डकप न राहता एक उत्सव, जल्लोष होता. जसा आपण एखादा सण आपल्या कुटुंब आणि दोस्त मंडळींसोबत साजरा करतो तसा वर्ल्डकप सगळ्यांनी साजरा केला. प्रत्येक  मॅचची एक वेगळी आठवण! आणि फायनल तर कळस होता! म्हणजे धोनी ने मारलेला तो सिक्स आणि त्या क्षणी पूर्ण झालेली करोडो लोकांची स्वप्नं... :)
     
  • नऊ दिवसांचे "मौन" :
    या वर्षी मी एक खूप महत्त्वाची शिकलेली गोष्ट म्हणजे विपश्यना! आणि त्यासाठीच मी जवळ जवळ नऊ दिवस यशस्वीपणे मौन पाळलं. एखादी प्रचंड "चिवचिवाट" करणारी, माझ्यासारखी, मुलगी जेव्हा लोकांना सांगते की मी सलग आठ ते नऊ दिवस, सरासरी दिवसाला १ मिनिटाच्या वर बोललेले नाहीये, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील अविश्वास, मी काहीतरी चॅलेन्जिंग केलंय, असं फिलिंग (उगाच) देऊन जातो. त्या दहा  दिवसात मी जे काही केलं, त्याचे खरे परिणाम मला आता जाणवताहेत. काही काही गोष्टींना मी ज्या सहजतेने स्वीकारतेय किंवा काही काही गोष्टींचा मी ज्या तटस्थपणे विचार करू शकतेय, त्याचं मलाच आश्चर्य वाटतंय आणि समाधानही... :)
  • "अजय-अतुल" यांची भेट :
    येस्स, अजय-अतुल! आय मीन "दि अजय-अतुल"!!! या संगीतकार जोडीचं वेड आम्हाला बरंच पूर्वीपासून होतं आणि आहे. आणि त्या वेडापायी त्यांच्याशी बोलायला मिळावं म्हणून बरेच प्रयत्न करून झालेले. अतुलशी तर याहू, फेसबुक आणि नंतर जीमेल वर चॅट करून झालेलं आणि त्यांना निदान दहा वेळा तरी 'तुम्हाला भेटायला आवडेल' हे सांगून झालेलं. शेवटी या वर्षी हे स्वप्न पूर्ण झालं. मुंबई टाईम्स च्या 
    फॅन नंबर १ स्पर्धेत आम्ही लकी विजेते ठरलो आणि सारेगमप च्यावर त्यांना भेटायची संधी मिळाली. 
    "गेल्या काही वर्षांचं "वेड" अक्षरश: एका क्षणात आमच्या समोर!!! दातखीळ बसण्याची वेळ आली होती. आता मागे बघितल्यावर वाटत की खरच आपण हे "वेड" जगलो हे चांगलंचं झालं... समाधानाची किंमंत कळली...." हा माझा वन ऑफ द बेस्ट फेसबुक स्टेटस आहे. नो डाउट! :)
  • "लंप्या"शी झालेली ओळख :
    मी तुम्हाला आधी सांगितलेलंच आहे, मला 'लम्प्या' का आवडतो ते! त्याचं विश्व जाणून हा एक खरंच समृद्ध करणारा अनुभव होता. मला तर उगाच असं वाटायचं की मी पण त्याच्यासारखा निरागस विचार करावा आणि सगळ्यांची मने जिंकावी! :D
  • त्या दोघींशी जुळलेले "बंध" :
    तर या दोघी म्हणजे माझ्या जुन्या, शाळेतल्या मैत्रिणी... पण या वर्षी कसे-कोण-जाणे अचानक आम्ही पुन्हा एकत्र आलो. अगदी जवळ! आणि त्यांच्यासोबतच्या या वर्षीच्या आठवणी तरी मी शेवटच्या श्वासापर्यंत विसरणार नाही. मग तो स्लीपओवर असो वा अगदी 'जगणं पूर्णपणे वसूल केलेला दिवस' असो. त्यांनी माझ्यासाठी घेतलेले कष्ट असोत वा एकमेकींच्या खांद्यावर डोकं ठेवून चांदराती काढलेली शांत झोप असो.... सगळचं कसं 'भन्नाट'...!!! :)



तर अश्याप्रकारे २०११ सालचा एक मस्त रिव्ह्यू झालेला आहे... जाम मस्त वाटतंय!!! :)
सो तुमचेही अनुभव, आठवणी जरूर शेअर करा... वाचायला आवडेल मला.... :)

ता. क.: नवीन वर्षासाठी खूप साऱ्या शुभेच्छा... येत्या वर्षी खूप सारे भन्नाट क्षण येवोत, ही सदिच्छा!!!






- मनाली

Comments

Manaali happy 2012....

Mast post. Tujhyaa saglyaa aathwani mast aaheet. Mainly Ajay-Atulshi bhet. Pudhchyaa warshi pan ashich dhamal karaa. :)
Manali Satam said…
@ aparna : Happy New Year to you too!!! Ajay-Atul shi bhet tar zakkas hoti... nantar barecg divas hangover hi hotaa... :D yete varsh tulahi dhamaal jao... :)
BinaryBandya™ said…
लिहित रहा आणि
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
vikram desai said…
hey khup chhan......shabdach nahiyet....asach nirantar lihit raha....
Manali Satam said…
@BinaryBandya : नक्कीच!!! :)
@विक्रम, केतन : धन्यवाद! :)
Unique Poet ! said…
Manali ! :)

Once more for 2012 .....!

Popular posts from this blog

विपश्यना : एक चिंतन

विपश्यनेचा दहा दिवसांचा कोर्स करून आज पाच दिवस झालेत. याबद्दल लिहायचं हे नक्की होतं, पण गेले काही दिवस काय लिहू हे समजतच नव्हत. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा वेगळा असतो कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. म्हणूनच मला सर्वसमावेशक असं काहीतरी लिहायच होतं. आता बसलेय लिहायला... सर्वात आधी, विपश्यना म्हणजे काय?

आयुष्यात पुढे जायचं असतं...!

आज लिहावंसं वाटतंय... किंवा कदाचित कॉम्प्युटर रडत-खडत चालतोय म्हणून  असेल...  हे लिहिणं आता जमेनासं झाल्यासारखं भासतंय... स्वत:बद्दल बरंच काही बदलल्यासारखं जाणवतंय, सभोवतालचं जग देखील बदलल्यासारखं वाटतंय... असं वाटतंय की या सगळ्या बदलांत आपण कुठेच नव्हतो आणि आज अचानक यात पडलोय, एखाद्या अनभिज्ञासारखे! सगळं नवीन! पण जुन्या जगाची आठवण करून देणारं ... तिथे परत जाण्याची आस निर्माण करणारं... कुठेतरी किंवा कधीतरी ते जग परत येईल अशी आशा निर्माण करणारं... वेगळं! पुन्हा नव्याने सुरुवात कर, असं सांगायचं असेल त्याला... पण ना काही पूर्वसूचना, ना मार्गदर्शक इशारा... विशाल महासागरात हरवलेल्या बोटीच्या खलाश्यासम... एकटं, स्वबळावर! पण त्या खलाश्याच्या मनातील विजीगिषु वृत्ती आपण कशी जागवणार... त्याला वेड असतं... तो त्याचे स्वप्न पूर्ण करायच्या इच्छेपोटी वेडा होऊन जातो... स्वत:ला हरवून बसतो! त्या नाविन्याच्या शोधात असं स्वत: हरवून जाण्यात ते सुख तरी काय असतं? स्वत:ला शोधण्यात वेळ व शक्ती दोन्ही खर्च होतेच, पण मग हे काम युक्तीने चालवावं तरी कसं! युक्तीने संपूर्ण जग खरंच चालू शकतं का? आणि जर ते चा

शाळा = निरागसता !

" त्यादिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत , बाकं आहेत , पोरं-पोरी आहेत , सर आहेत , गणित आहे , भूगोल आहे , नागरिकशास्त्र सुध्दा ; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणार्‍या पांढर्‍या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत. त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते. खास एकट्याचीच. त्या शाळेत वर्ग नाहीत , भिंती नाहीत , फळा नाही , शिक्षक नाहीत ; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे..." :) शाळा चित्रपटाने मला काय दिलं??? तर बऱ्याच दिवसांनी काहीतरी गोड, निरागस आणि तरल गोष्ट ऐकल्याचा, पाहिल्याचा आनंद! :) आणि शाळा कादंबरीने मला काय दिलं होतं, तीच गोष्ट वाचल्याचा आनंद...! शाळा कादंबरी ही बहुतेकांच्या आवडत्या पुस्तकांतील एक आहे, अर्थात माझ्याही!!! ते पुस्तक वाचून आता दीड वर्षं झाली, पण सगळं कसं अगदी मनावर कोरलं गेल्याप्रमाणे लख्ख! क्षणात वेड लावलं कादंबरीने... आणि मग कुठेतरी ऐकिवात आलं की शाळा कादंबरीवर सिनेमा येणारेय... एवढा आनंद झाला म्हणून सांगू! म्हणजे जी पात्र, ज्या जागा आणि ज्या भावनांची आपण निव्वळ एक कल्पना केली होती, ते विश्व दृ