तर आज २०११ सालचा शेवटचा दिवस आहे. २०११ माझ्यासाठी तरी बरंच झक्कास वर्ष होतं. खूप साऱ्या निरनिराळ्या आठवणी आहेत या वर्षाच्या. त्यातल्या ५ मनाच्या सर्वात जवळ असलेल्या आठवणी शेअर करतेय. खरंतर यांच्या क्रमावर जाऊ नका. आठवणींमध्ये कसली आलीये तुलना! त्या गोड तर गोड, नाहीतर वाईट तर वाईट! सोयीसाठी या घटना ज्या क्रमाने घडल्यात त्या क्रमाने सांगते. तर....
तर अश्याप्रकारे २०११ सालचा एक मस्त रिव्ह्यू झालेला आहे... जाम मस्त वाटतंय!!! :)
- "वर्ल्डकप" :
मार्च महिना तर वर्ल्डकप च्या नशेतच गेला आणि एप्रिल मध्ये वर्ल्डकप आपल्या घरी आला. हो, "आपल्या"च! म्हणजे निदान मला तरी तो माझ्याच घरी आला आहे असं वाटतं होतं. मला खात्री आहे तुम्हालाही तसंच काहीसं वाटलं असेल! तो निव्वळ वर्ल्डकप न राहता एक उत्सव, जल्लोष होता. जसा आपण एखादा सण आपल्या कुटुंब आणि दोस्त मंडळींसोबत साजरा करतो तसा वर्ल्डकप सगळ्यांनी साजरा केला. प्रत्येक मॅचची एक वेगळी आठवण! आणि फायनल तर कळस होता! म्हणजे धोनी ने मारलेला तो सिक्स आणि त्या क्षणी पूर्ण झालेली करोडो लोकांची स्वप्नं... :)
- नऊ दिवसांचे "मौन" :
या वर्षी मी एक खूप महत्त्वाची शिकलेली गोष्ट म्हणजे विपश्यना! आणि त्यासाठीच मी जवळ जवळ नऊ दिवस यशस्वीपणे मौन पाळलं. एखादी प्रचंड "चिवचिवाट" करणारी, माझ्यासारखी, मुलगी जेव्हा लोकांना सांगते की मी सलग आठ ते नऊ दिवस, सरासरी दिवसाला १ मिनिटाच्या वर बोललेले नाहीये, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील अविश्वास, मी काहीतरी चॅलेन्जिंग केलंय, असं फिलिंग (उगाच) देऊन जातो. त्या दहा दिवसात मी जे काही केलं, त्याचे खरे परिणाम मला आता जाणवताहेत. काही काही गोष्टींना मी ज्या सहजतेने स्वीकारतेय किंवा काही काही गोष्टींचा मी ज्या तटस्थपणे विचार करू शकतेय, त्याचं मलाच आश्चर्य वाटतंय आणि समाधानही... :)
- "अजय-अतुल" यांची भेट :
येस्स, अजय-अतुल! आय मीन "दि अजय-अतुल"!!! या संगीतकार जोडीचं वेड आम्हाला बरंच पूर्वीपासून होतं आणि आहे. आणि त्या वेडापायी त्यांच्याशी बोलायला मिळावं म्हणून बरेच प्रयत्न करून झालेले. अतुलशी तर याहू, फेसबुक आणि नंतर जीमेल वर चॅट करून झालेलं आणि त्यांना निदान दहा वेळा तरी 'तुम्हाला भेटायला आवडेल' हे सांगून झालेलं. शेवटी या वर्षी हे स्वप्न पूर्ण झालं. मुंबई टाईम्स च्या फॅन नंबर १ स्पर्धेत आम्ही लकी विजेते ठरलो आणि सारेगमप च्यावर त्यांना भेटायची संधी मिळाली.
"गेल्या काही वर्षांचं "वेड" अक्षरश: एका क्षणात आमच्या समोर!!! दातखीळ बसण्याची वेळ आली होती. आता मागे बघितल्यावर वाटत की खरच आपण हे "वेड" जगलो हे चांगलंचं झालं... समाधानाची किंमंत कळली...." हा माझा वन ऑफ द बेस्ट फेसबुक स्टेटस आहे. नो डाउट! :) - "लंप्या"शी झालेली ओळख :
मी तुम्हाला आधी सांगितलेलंच आहे, मला 'लम्प्या' का आवडतो ते! त्याचं विश्व जाणून हा एक खरंच समृद्ध करणारा अनुभव होता. मला तर उगाच असं वाटायचं की मी पण त्याच्यासारखा निरागस विचार करावा आणि सगळ्यांची मने जिंकावी! :D - त्या दोघींशी जुळलेले "बंध" :
तर या दोघी म्हणजे माझ्या जुन्या, शाळेतल्या मैत्रिणी... पण या वर्षी कसे-कोण-जाणे अचानक आम्ही पुन्हा एकत्र आलो. अगदी जवळ! आणि त्यांच्यासोबतच्या या वर्षीच्या आठवणी तरी मी शेवटच्या श्वासापर्यंत विसरणार नाही. मग तो स्लीपओवर असो वा अगदी 'जगणं पूर्णपणे वसूल केलेला दिवस' असो. त्यांनी माझ्यासाठी घेतलेले कष्ट असोत वा एकमेकींच्या खांद्यावर डोकं ठेवून चांदराती काढलेली शांत झोप असो.... सगळचं कसं 'भन्नाट'...!!! :)
सो तुमचेही अनुभव, आठवणी जरूर शेअर करा... वाचायला आवडेल मला.... :)
ता. क.: नवीन वर्षासाठी खूप साऱ्या शुभेच्छा... येत्या वर्षी खूप सारे भन्नाट क्षण येवोत, ही सदिच्छा!!!
ता. क.: नवीन वर्षासाठी खूप साऱ्या शुभेच्छा... येत्या वर्षी खूप सारे भन्नाट क्षण येवोत, ही सदिच्छा!!!
- मनाली
Comments
Mast post. Tujhyaa saglyaa aathwani mast aaheet. Mainly Ajay-Atulshi bhet. Pudhchyaa warshi pan ashich dhamal karaa. :)
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@विक्रम, केतन : धन्यवाद! :)
Once more for 2012 .....!