Skip to main content

मिजास


खुपदा असं होतं की आपण आपल्याच धुंदीत जगत असतो.... स्वत:च्या जगाचे राजे असतो आणि अचानक असा दिवस येतो की काही लोक आपल्या आयुष्यात येतात. आपले मित्र बनतात. आपल्या आयुष्यातील खूप जिव्हाळ्याचा भाग बनून जातात. ज्यांना तोडणं आपल्याला कधीच शक्य होणार नाही असे.
पण ही मंडळी सतत काही ना काही कारण काढून आपल्यावर हसतात, आपल्याला कमी दाखवायचा प्रयत्न करतात, अर्थात सर्व मैत्रीच्या नात्याने, एक प्रकारची मजा म्हणून.... जी साधारणत: मित्र-मैत्रिणींमध्ये होताच असते. पण का माहित नाही ती आपल्याला टोचू लागते. उगाच राग देऊन जाते. मग ती आपल्याला म्हणतात की, एवढं काय त्यात, मजा-मस्तीत चालत सगळं...... आपल्यालाही त्यांचा म्हणणं पटून जातं. खरंच काय चुकीच बोलत असतात ते, आपण एवढा अधिकार त्यांना दिलेला असतो. सगळेच जण आपल्या मित्र-मैत्रिणींना एवढं हक्क देतात, मग आपल्यालाच का लागते ही गोष्ट??? का उगाच अपमानित झाल्यासारखा वाटतं...??? वाटतं की हे कोण आले आपल्याला असं बोलणारे??? त्यांची लायकी तरी आहे का???
मग प्रकरण जेंव्हा लायकी या शब्दावर येऊन पोहोचतं तेंव्हा वाटतं खरंच या गोष्टीचा  आता गांभीर्याने विचार करायची गरज आहे. नंतर स्वत:ला खूप सारे प्रश्न विचारल्यावर खुपच दाक्कादायक उत्तरं सापडतात.... त्यातला सर्वात महत्त्वाचं उत्तरं असतं, मिजास, गर्व, अहंकार...
स्वत:ला राजा मानताना नकळत आपण इतर सर्वांना प्रजा किंवा आपले सरदार मानायला लागतो, असं वाटायला लागतं की बाकीचे सर्व कोण आहे, आपल्यासारखं या जगात कुणीच नाहीये. आणि आपण कुठेतरी स्वत:ला एका वरच्या स्थानावर नेऊन ठेवतो. हे लक्षात घेताच नाही की जेव्हा आपण त्या वरच्या स्थानावरून पडू तेव्हा आपल्याला खाली झेलायला उभे हेच लोक आहेत. पण मन त्या अहंकारात एव्हढं बुडून गेलं असतं की हे आपल्या लक्षातच येत नाही. आणि आपण विना कारण राग करत बसतो. म्हणजे स्वत:बद्दल चांगल्या गोष्टी ऐकायची एवढी सवय लागली असते की एक अगदी लहानशी वाईट गोष्टही खपत नाही, मग भले ती मजेत का ना म्हटली असो. किती वाईट आहे हे!!!
पण अशी आपली चूक कळल्यावर वाटतं, बरं झालं या गोष्टीवर विचार केला.... नाहीतर हे कधी लक्षातच आलं नसतं. आणि मग जे काही समाधान लाभतं, त्याला तोड नाही.
म्हणतात ना आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला काही ना काही अर्थ असतो. ही मित्रमंडळी कदाचित् आपल्याला जमिनीवर ठेवण्यासाठीच आपल्या आयुष्यात असतात... त्यांच्या त्या असण्याला एक मनापासून दाद.......
Everybody is Self-centered, it’s just the Radius that Differs…..”

Comments

Anonymous said…
अचूक धागा पकडला आहेस
A said…
One should definitely have a good sense of humour and an ability to laugh at oneself as we as at others. However, there's a difference between ego/arrogance and self/mutual-respect. When I find myself offended at something/someone's remarks, I try to put myself in the others' shoe and think whether I would have commented that way on them. If I would have, I let it pass. If I wouldn't have commented that way, I talk with then and let them know that it's offending.

Popular posts from this blog

विपश्यना : एक चिंतन

विपश्यनेचा दहा दिवसांचा कोर्स करून आज पाच दिवस झालेत. याबद्दल लिहायचं हे नक्की होतं, पण गेले काही दिवस काय लिहू हे समजतच नव्हत. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा वेगळा असतो कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. म्हणूनच मला सर्वसमावेशक असं काहीतरी लिहायच होतं. आता बसलेय लिहायला... सर्वात आधी, विपश्यना म्हणजे काय?

आयुष्यात पुढे जायचं असतं...!

आज लिहावंसं वाटतंय... किंवा कदाचित कॉम्प्युटर रडत-खडत चालतोय म्हणून  असेल...  हे लिहिणं आता जमेनासं झाल्यासारखं भासतंय... स्वत:बद्दल बरंच काही बदलल्यासारखं जाणवतंय, सभोवतालचं जग देखील बदलल्यासारखं वाटतंय... असं वाटतंय की या सगळ्या बदलांत आपण कुठेच नव्हतो आणि आज अचानक यात पडलोय, एखाद्या अनभिज्ञासारखे! सगळं नवीन! पण जुन्या जगाची आठवण करून देणारं ... तिथे परत जाण्याची आस निर्माण करणारं... कुठेतरी किंवा कधीतरी ते जग परत येईल अशी आशा निर्माण करणारं... वेगळं! पुन्हा नव्याने सुरुवात कर, असं सांगायचं असेल त्याला... पण ना काही पूर्वसूचना, ना मार्गदर्शक इशारा... विशाल महासागरात हरवलेल्या बोटीच्या खलाश्यासम... एकटं, स्वबळावर! पण त्या खलाश्याच्या मनातील विजीगिषु वृत्ती आपण कशी जागवणार... त्याला वेड असतं... तो त्याचे स्वप्न पूर्ण करायच्या इच्छेपोटी वेडा होऊन जातो... स्वत:ला हरवून बसतो! त्या नाविन्याच्या शोधात असं स्वत: हरवून जाण्यात ते सुख तरी काय असतं? स्वत:ला शोधण्यात वेळ व शक्ती दोन्ही खर्च होतेच, पण मग हे काम युक्तीने चालवावं तरी कसं! युक्तीने संपूर्ण जग खरंच चालू शकतं का? आणि...

शाळा = निरागसता !

" त्यादिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत , बाकं आहेत , पोरं-पोरी आहेत , सर आहेत , गणित आहे , भूगोल आहे , नागरिकशास्त्र सुध्दा ; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणार्‍या पांढर्‍या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत. त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते. खास एकट्याचीच. त्या शाळेत वर्ग नाहीत , भिंती नाहीत , फळा नाही , शिक्षक नाहीत ; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे..." :) शाळा चित्रपटाने मला काय दिलं??? तर बऱ्याच दिवसांनी काहीतरी गोड, निरागस आणि तरल गोष्ट ऐकल्याचा, पाहिल्याचा आनंद! :) आणि शाळा कादंबरीने मला काय दिलं होतं, तीच गोष्ट वाचल्याचा आनंद...! शाळा कादंबरी ही बहुतेकांच्या आवडत्या पुस्तकांतील एक आहे, अर्थात माझ्याही!!! ते पुस्तक वाचून आता दीड वर्षं झाली, पण सगळं कसं अगदी मनावर कोरलं गेल्याप्रमाणे लख्ख! क्षणात वेड लावलं कादंबरीने... आणि मग कुठेतरी ऐकिवात आलं की शाळा कादंबरीवर सिनेमा येणारेय... एवढा आनंद झाला म्हणून सांगू! म्हणजे जी पात्र, ज्या जागा आणि ज्या भावनांची आपण निव्वळ एक कल्पना केली होती, ते विश्व दृ...