Skip to main content

रिलेशनशिप स्टेटस : सिंगल

And that neither means Available nor ready to Mingle!!!!
रिलेशनशिप  स्टेटस:सिंगल एक भुवया उंचावणारं स्टेटमेंट..... (भुवया उंचावण्याची कारणे अर्थात वेग-वेगळी असतात..... ;))
आणि त्यामागून येणारा म्हणजे ओघानेच येणारा प्रश्न "का???"
आणि त्याचं त्याच सहजतेने दिलेलं उत्तर.... "अजून 'तसा ' कोणी भेटला नाही".....
आता  हे 'तसा' काय प्रकरण आहे, हा मुलांना पडलेला स्वाभाविक प्रश्न!
आणि त्याचं उत्तर शोधायचा केलेला हा लहानसा म्हणजे अगदी बारीकसा प्रयत्न...
तर एखाद्या मुलीच्या सिंगल असण्यामागे खूप काही कारणं असतात....म्हणजे बघा ना, प्रत्येक मुलीच्या मनात एक राजकुमार हा असतोच; मग भले ती मुलगी दासी होण्यालायक तरी असो वा नसो.... पण का माहित नाही हे काही मला पटत नाही....म्हणजे माणसाने expect तेव्हढंच करावं जेव्हढ त्याला बनणं शक्य आहे..... आता मला माहितेय की मी राजकुमारी वगैरे नाहीये... दिसण्याबद्दल म्हणतेय मी.... बाकी माझ्या विश्वाची मीच राजकुमारी आहे..... एक 'स्वच्छंदी' राजकुमारी.....आणि असाच एक स्वच्छंदी राजकुमार हवाय मला.... तो अगदी माझ्यासारखा असावा या गोष्टीबाबत मी अजिबात आग्रही नाहीये.... बस्स त्याने स्वच्छंदी असावं.... माझ्याकडे जे जे गुण नाहीयेत ते त्याच्याकडे असावेत.... म्हणजे एखाद्या पुर्णाकृतीचा एक भाग जर मी असेन तर त्याने दुसरा असावा.... आतापर्यंत मी जे काही आयुष्यात केलेलं नाहीये ते सर्व आजमावण्यात त्याने मला मदत करावी. आणि आता जर तुम्हाला मी स्वच्छंदी न राहता स्वार्थी वाटत असेन, तर तो गैरसमज आधी दूर करू देत. मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे जेव्हढ आपण expect करतो, तेव्हढी द्यायची तयारी हवी. जे काही मी त्याच्याकडून मागेन ती किंवा त्याने माझ्यासाठी करावं अशी इच्छा बाळगेन ते सर्व मी माझ्यासाठी करू शकते का, हे आधी मी बघेन. उदाहरणच द्यायचं झालं तर, बहुतेक करून मुलींना वाटतं की त्याच्याकडे गाडी किंवा मोठं घर असावं.... पण त्या हे कधीच लक्षात घेत नाहीत की, की ही अपेक्षा करणं योग्य आहे का....आता यावर काही लोकांचं म्हणणं हेही असेल की, जर स्वत:साठी सर्व काही तुम्ही करू शकतं तर 'त्या'ची काय गरज.....
पण काय आहे ना, एखाद्या व्यक्तीला पूर्ण करण्यातली मजा काही औरच आहे. त्याच्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करण्यात आपला लागलेला थोडासा हातभार, आणि ती ईच्छा पूर्ण झाल्यावर त्याच्या चेहऱ्यावरील समाधान.... या सर्व गोष्टींचा अनुभव मला घ्यायचाय....
आयुष्य हे क्षणांमध्ये सामावलेलं असतं.... अशाच क्षणाक्षणांनी आयुष्य पूर्ण होतं.... असेच काही क्षण आपल्या माणसाचं आयुष्य पूर्ण करण्यात वेचावे असं मला खूप मनापासून वाटतं.... आणि म्हणूनच 'त्या'ला शोधतेय मी.... जो मला compliment करेल..... आणि ज्याच्या सोबतीने मी पूर्ण होईन.....


Comments

Unknown said…
सिंगल मुलगी ओळखणे हे महाकठिण काम आहे कारण मुली (काही अपवाद वगळता) आपल्या रिलेशनशिप स्टेटस बाबतीत (उगाचच) गुढ वगैरे निर्माण करतात.. Anyways.. nice post.. आणि तुला तुझा स्टेटस नविन वर्षात चेंज करण्यासाठी शुभेच्छा.. :p
Manali Satam said…
खरंय तुझं म्हणणं, अशा खूप साऱ्या मुली असतात.... पण आनंद वाटतो सांगताना की मी अपवादात येते...पोस्ट आवडली हे ऐकून आनंद झाला आणि शुभेच्छांसाठी खूप खूप धन्यवाद!!!!
छान लिहलं आहेस ! खर तर मुलींच्या मनात काय असतं हे कुणालाच कळत नाही! असो. पण प्रत्येक पुरुषाने ते अ‍ॅटलिस्ट जाणण्याचा प्रयत्न तरी करायला हवा!
एक जोक आठवला
जगातल्या सर्वात लहान पुस्तकाचं नाव आहे What Women wants??? आणि त्यात लिहिलं आहे Everything!!
हे हे हे !! Just Kidding :)
Nice article, keep it up!
Unknown said…
Well written. All the best.
vaibhav_sadakal said…
.....असं म्हणतात की, स्त्रीच्या मनातलं ब्रम्हदेव देखील ऒळखू शकत नाही. तेथे स्त्रीच्या मनातलं ओळखणारे आपण कोण?
.....तुम्ही खरंच छान लिहीलं आहे.
Manali Satam said…
@ दीपक, vaibhav : स्त्रीच्या मनातलं कोणी ओळखू शकत नाही असं म्हणत जरी असले तरी ते तितकसं खरं आहे असं मला वाटत नाही.... कोणत्याही मनाचा जितक्या सरळपणे विचार केला जाईल,तितकं ते सरळ असतं असं मला वाटतं... प्रतिक्रिया वाचून याचा 'भाग : २ ' सुद्धा लिहावा असं वाटतंय.... :P :D
@ Maheshwar : धन्यवाद!!!
जसं, जिकडे वळवलं तसं, त्याप्रमाणे स्त्रीचं मन झुरवता येतं वा झुरवत ठेवता येतं, असं माझा मित्र मला म्हणाला होता. त्याचा सूर बहुधा—जरी स्त्रीचं मन जाणणं कधी शक्य नसलं तरी ते आपलंसं करुन घेणं सहज शक्य असतं—असं काहीसं सांगण्यात असावा, असो. या त्याच्या सूचनेत मला यत्किंचितदेखील शंका वाटली नाही, पण केवळ मौज म्हणून वा बालिशपणे वा उपहासात्मकरीत्या स्त्रीच्या मनाशी अगदी हीच पद्धती वापरून खेळणं म्हणजे तीचा विश्वासघात—याचे दूरवर आघात जाणवतात—तीला, त्याला अन् नाहक इतरांनादेखील. मुळात प्रेमासारखी स्वच्छ व परमलौकिक आनंद देणारी दुसरी कुठली गोष्ट नसावी, ज्याने-त्याने योग्य अन्वयार्थ समजून-उमगून आपल्या प्रेमाचा आदर करावा. अंततः प्रेमाचे फलित म्हणजे—वन नाइट स्टँड व/वा लग्न, ही फाजील लालसी वृत्तीच चूकीची आहे. सर्वकाही ऐच्छिक कधीच नसते. अनंत प्रेमाचे (मग ते एकेरी असो वा दोहोबाजूंकडून) फलित—त्याग, वियोग इ. निरुत्साही करणाऱ्या गोष्टींत होण्याच्या बहुतांश घटना आहेत, घडतात देखील. या निरुत्साहवर्धी(?) फलितांतच माझे व तीचे/त्याचे भले आहे, हे वास्तवदर्शी समाधान मानले, तर जीवन अधिक सुखकर होऊ शकते.

बाकी तुमचे विचार उत्तम.
Manali Satam said…
मन कोणाचही असो, स्त्री अथवा पुरुष, आस ही त्याला निस्वार्थी आणि निर्मळ प्रेमाचीच असते....
नाही, ही बाब समाजात आजूबाजूला पाहता समर्थनीय नाही. सर्वांचीच मने निःस्वार्थ व/वा निर्मळ प्रेमासाठी मुळीच आसुसलेली नसतात, बहुतांशी जणांचा असं करण्यामागे एक विशिष्ट कावा असतो. आणि असं प्रांजळ प्रेम करणाऱ्यांमध्येही न भूतो न भविष्यति असा अचानक कुठल्याश्या क्षुल्लक कारणामुळे उगवलेला मत्सर कधी-कधी जिव्हाळ्याच्या काचेला तडा पोहोचवू शकतो, तेव्हा जरा जपून. हे सांगण्यामागे मला काय अभिप्रेत आहे, हे बहुधा तुम्ही जाणले असावे.
Manali Satam said…
कितीही जग वाईट म्हटलं तरी दृष्टी महत्वाची नाही का??? आपण त्यातल्या त्यात निर्मळ शोधायचा प्रयत्न करावा आणि अर्थात त्यासाठी आपण स्वत: आधी तसा विचार करणं गरजेचं आहे.... :)
BinaryBandya™ said…
अप्रतिम लिहिले आहेस ..
"असेच काही क्षण आपल्या माणसाचं आयुष्य पूर्ण करण्यात वेचावेत"
सुंदर विचार आहेत ...
Manali Satam said…
धन्यवाद !!!! तुझी प्रत्येक पोस्ट वाचायला जाम आवडतं....
वाह !!
मस्त पोस्ट, छान लिहिलंय. आजचं हा ब्लॉग सापडला. वाचून काढतो.

बाय द वे, कोणाच्या मनातलं ओळखण इतकं कठीण नसतं. नाती संवेदनशील असतात, त्या संवेदना, भावना आपोआप मनाला कळतात देखील फक्त ती आपल्याला कळली आहे की नाही हेच आपल्याला कधी कधी कळत नाही. :(

लिखाणासाठी खुप खुप शुभेच्छा !!
Manali Satam said…
पटलं तुमचं म्हणण!!! म्हटलं तर काहीच कठीण नाहीये, फक्त म्हटल पाहिजे!!!
Anonymous said…
आवडलं आणि पटलंसुद्धा...

पु.ले.शु.
Prasad said…
मस्त ब्लॉग आहे!नाते जर परस्परांना पूरक असेल तर आयुष्य किती सोपे वाटेल ना! तुझ्या मनाला पाहिजे तसा पार्टनर मिळावा हि शुभेच्छा!
Manali Satam said…
@Prasadधन्यवाद!!!
Hey manali .. kadachit me pan tujhachsarkha vichar karte tu barach mulincha representative mhanun chan lilhilayes
superlike !!!!
Manali Satam said…
Thank You Aditi! Welcome! :)
adesh pote said…
सुंदर विचार.
Anonymous said…
kya baat hain..:-)

Popular posts from this blog

विपश्यना : एक चिंतन

विपश्यनेचा दहा दिवसांचा कोर्स करून आज पाच दिवस झालेत. याबद्दल लिहायचं हे नक्की होतं, पण गेले काही दिवस काय लिहू हे समजतच नव्हत. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा वेगळा असतो कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. म्हणूनच मला सर्वसमावेशक असं काहीतरी लिहायच होतं. आता बसलेय लिहायला... सर्वात आधी, विपश्यना म्हणजे काय?

आयुष्यात पुढे जायचं असतं...!

आज लिहावंसं वाटतंय... किंवा कदाचित कॉम्प्युटर रडत-खडत चालतोय म्हणून  असेल...  हे लिहिणं आता जमेनासं झाल्यासारखं भासतंय... स्वत:बद्दल बरंच काही बदलल्यासारखं जाणवतंय, सभोवतालचं जग देखील बदलल्यासारखं वाटतंय... असं वाटतंय की या सगळ्या बदलांत आपण कुठेच नव्हतो आणि आज अचानक यात पडलोय, एखाद्या अनभिज्ञासारखे! सगळं नवीन! पण जुन्या जगाची आठवण करून देणारं ... तिथे परत जाण्याची आस निर्माण करणारं... कुठेतरी किंवा कधीतरी ते जग परत येईल अशी आशा निर्माण करणारं... वेगळं! पुन्हा नव्याने सुरुवात कर, असं सांगायचं असेल त्याला... पण ना काही पूर्वसूचना, ना मार्गदर्शक इशारा... विशाल महासागरात हरवलेल्या बोटीच्या खलाश्यासम... एकटं, स्वबळावर! पण त्या खलाश्याच्या मनातील विजीगिषु वृत्ती आपण कशी जागवणार... त्याला वेड असतं... तो त्याचे स्वप्न पूर्ण करायच्या इच्छेपोटी वेडा होऊन जातो... स्वत:ला हरवून बसतो! त्या नाविन्याच्या शोधात असं स्वत: हरवून जाण्यात ते सुख तरी काय असतं? स्वत:ला शोधण्यात वेळ व शक्ती दोन्ही खर्च होतेच, पण मग हे काम युक्तीने चालवावं तरी कसं! युक्तीने संपूर्ण जग खरंच चालू शकतं का? आणि...

शाळा = निरागसता !

" त्यादिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत , बाकं आहेत , पोरं-पोरी आहेत , सर आहेत , गणित आहे , भूगोल आहे , नागरिकशास्त्र सुध्दा ; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणार्‍या पांढर्‍या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत. त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते. खास एकट्याचीच. त्या शाळेत वर्ग नाहीत , भिंती नाहीत , फळा नाही , शिक्षक नाहीत ; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे..." :) शाळा चित्रपटाने मला काय दिलं??? तर बऱ्याच दिवसांनी काहीतरी गोड, निरागस आणि तरल गोष्ट ऐकल्याचा, पाहिल्याचा आनंद! :) आणि शाळा कादंबरीने मला काय दिलं होतं, तीच गोष्ट वाचल्याचा आनंद...! शाळा कादंबरी ही बहुतेकांच्या आवडत्या पुस्तकांतील एक आहे, अर्थात माझ्याही!!! ते पुस्तक वाचून आता दीड वर्षं झाली, पण सगळं कसं अगदी मनावर कोरलं गेल्याप्रमाणे लख्ख! क्षणात वेड लावलं कादंबरीने... आणि मग कुठेतरी ऐकिवात आलं की शाळा कादंबरीवर सिनेमा येणारेय... एवढा आनंद झाला म्हणून सांगू! म्हणजे जी पात्र, ज्या जागा आणि ज्या भावनांची आपण निव्वळ एक कल्पना केली होती, ते विश्व दृ...