कधी कधी खरंच कळत नाही, काय होतंय ते.... पुढेही जाता येत नाही आणि आयुष्य थांबूही शकत नाही..... मग सुरु होतो या दोघांमधला एक खेळ....
विचार करून थकलो तरी थांबत नाहीत, असे विचार यायला सुरुवात होते.... कुठेतरी आपण दिशाहीनतेच्या दिशेने पाऊल टाकतोय असे वाटायला लागते आणि मग स्वत:ला आवरायची धडपड सुरु होते..... काही करून या मायाजालातून बाहेर पडायचे असा पक्का निश्चय केलेला असला तरी समोर मार्ग काहीच दिसत नाही.....
मग मार्ग शोधायची धडपड सुरु होते.....या धडपडीत स्वत:चेही भान राहत नाही..... कुठे लागले का, हे बघायचीही फुरसत राहत नाही..... जखमा राहून जातात तश्याच....
एका अत्युच्च क्षणी थांबावेसे वाटते, जरा वळून मागे बघावेसे वाटते.... थोडाफार लेखाजोगा मांडायची इच्छा होते.......
पण शेवटी येते ती निराशा, कारण आपण पाहतो स्वत:ला निव्वळ आणि निव्वळ काही थेंब ओंजळीत सामावून घेण्याच्या धडपडीत......
आणि मनात येते, " का कळेना....."
Comments
मस्त लिहिले आहेस ..
खरंय तुमचं म्हणणं हेच जीवन आहे, पण ते समजून आणि उमजून घ्यायला थोडा वेळ लागतो एवढंच....