आजपर्यंत मी कधीच तुझी मदत मागितली नाही,
तू मात्र करत राहिलास तुझे आशीर्वाद देत राहिलास...
सुदैव काय असते हे मला पाहून लोकांना कळले,
त्यांच्या नकळत ते प्रत्येक क्षणी माझ्यावर जळले...
मला नेहमी वाटत की मला तुझी गरज नाही,
परन्तु तुझ्याशिवाय जग चालते असा माझा गैरसमजही नाही...
मी फक्त कुठेतरी माझ्या पायांवर उभा रहायचा प्रयत्न करत असते,
तू नेहमी हात पकडतोस म्हणूनच पडण्यापासून वाचत असते...
मी नेहमी ठरवते की तू दिलेल्या या कर्जाचे ऋण मी फेडणार,
तू माझ्यासाठी केलेली प्रत्येक गोष्ट तुझ्या मदतीशिवाय मी पार पाडणार...
पण अजुन काही ते मला जमले नाही,
मी अशी कशी वागू शकते हेच मला कळले नाही...
पण आज कुठेतरी अपराधीपणाची भावना मनात रुजू लागलिये,
तिच्या नकळत ती माझं मन पोखरु लागलिये...
जमेल का मला कधी तुझे हे ऋण फेडणे ?
की मरतानाही राहिल द्यायचे तुझे हे देणे ?
तुला हवे तसे मी वागत नाही म्हणून तू माझ्यावर रागावाशील का?
माझ्या या आयुष्याच्या वाटेवर माझी साथ सोडून जाशील का?
आज खरी मला तुझ्या मदतीची गरज आहे,
आणि ही एक गोष्ट मी तुझ्याकडे मागणार आहे...
अजुन काही दिवस तुझे आशीर्वाद तू मला दे,
नंतर त्या मोबदल्यात तुला हवे ते घे....
मी तुला नाही म्हणणार नाही,
एवढे कृतघ्न बनणे मला आयुष्यात जमणार जमणार...
मी आजपासून कृतज्ञ बनण्याचा प्रयत्न करणार आहे,
त्यानंतर तुझे पांग फेडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे....
फक्त कही दिवस मला तुझी साथ हवीये...
फक्त कही दिवस मला तुझा वेळ हवाय...
Comments
वरील काव्यपंक्ति उत्तम.
I just loved it....
Looking forward to read more poems from you...