Skip to main content

Posts

गेली १० वर्षे: ब्लॉगच्या अनुषंगाने माझा प्रवास

मी हा ब्लॉग २०१० मध्ये सुरू केला. तेव्हा त्याचं नाव स्वच्छंदी असं होतं. आणि मग २०१५ मध्ये याचं नाव सात्मन् असं बदललं. ह्या ब्लॉग वर शेवटची पोस्ट २०१६ मध्ये लिहिली आहे. आणि आज आपण २०१९ मध्ये आहोत. ह्या १० वर्षांच्या कालावधीत काय काय झाले ह्याचा हा धांडोळा! [Read this post in English: My journey through my blog ] २०१० मध्ये मला "व्यक्त" व्हायचे होते. त्यासाठी मी हा ब्लॉग स्वच्छंदी या नावाने सुरु केला. काही वर्षांनी माझ्या असं लक्षात आलं की मी काही स्वच्छंदी वगैरे नाहीये. स्वच्छंदी ही फारच युटोपियन संकल्पना आहे. स्वच्छंदी आयुष्य हे फक्त 'ठरलं आणि झालं' असं मिळवता येत नाही. जून २०१० मध्ये मी माझ्या अभियांत्रिकी कॉलेजच्या प्रवेशाची वाट बघत होते. मी बारावीमध्ये जास्त काही अभ्यास केला नाही. तेव्हा मी थोडेफार यमक जुळवून "कविता" लिहायचे. लोकं कॉमेंट्स वगैरे करायचे. त्यामुळेच कदाचित २०१०-११ मध्ये सगळ्यात जास्त पोस्ट्स लिहिले गेले.  २०१० मध्ये माझं इंजिनिअरिंगचं कॉलेज सुरू झालं खारघरला! वाढलेला प्रवास, नवीन वातावरण आणि नवीन मित्र-मैत्रिणी ह्...
Recent posts

तू कोई और है

आज मी एकटी एक सिनेमा बघायला गेले. ‘मजबुरी’ म्हणून नाही तर बघायचा होता म्हणून! माझी एकटे जाऊन सिनेमा बघायची खूप वर्षे इच्छा होती, पण कधी तशी वेळ आली नाही. या वेळेस सुद्धा आली नसती, परंतु संधीची चाहूल लागताच मी ठरवलं कि यावेळेस नक्की! सिनेमा संपल्यावर समोरच्या क्यानी मध्ये मी एका अनोळखी मुलीसोबत table share केले. हा अनुभवदेखील पहिलाच! मी माझा सुलेमनी चहा पिता पिता तिच्याशी बऱ्याच गप्पा मारल्या. असे अनुभव खऱ्या अर्थाने माणसाला समृध्द करतात! सिनेमा ह्या गोष्टीकडे नेहमीच एक social गोष्ट म्हणून पहिले जाते. त्यात तत्थ्य असले तरी सिनेमा हा एक वैयक्तिक अनुभव असायला हवा. निदान माझ्यासाठी तरी आहे! For me, cinema is all about what it makes you feel. Cinema is a piece of art. We should pay attention to its craft. There a quote by Rainbow Rowell from a brilliant book called ‘Eleanor and Park’. It says, “Eleanor was right. She never looked nice. She looked like art, and art wasn’t supposed to look nice; it was supposed to make you feel.” So I try to measure everything that I see against tha...

स्वच्छंदी ते सात्मन्

सध्या प्रश्न हा आहे की मी पुन्हा इथे का आलेय? मी २०१० मध्ये बारावीची परीक्षा झाल्यानंतर हा ब्लॉग लिहायला सुरु केलेला. आणि तेव्हाची कारणं ही खूप वेगळी होती. तेव्हा आतली घुसमट कुठेतरी व्यक्त व्हावी ही इच्छा होती. ( VERSION - 2010 ) परंतु आता विचार केल्यावर असं जाणवतंय की बरंच काही बदललंय आणि रोजच्या रोज बदलतंय. ह्या बदलांची कुठेतरी नोंद करून ठेवायला हवीये. जर तुम्ही या आधी इथे कधी आला असाल तर तुमच्या लक्षात येईल की ह्या ब्लॉगचे नाव आता ‘सात्मन्’ असे झाले आहे. पूर्वी ते ‘स्वच्छंदी’ असे होते! आणि ह्या ब्लॉग चा address meemanali.blogspot.in असा होता! आणि आता मला त्या गोष्टीची लाज वाटत होती. म्हणजे स्वतःचं नाव त्या ब्लॉग address मध्ये ठेवण्यासाठी मी (mee) केलेला अट्टाहास आता मला नकोसा वाटत होता. आता नाहीये मी तशी! मी स्वच्छंदी देखील नाहीये. होय, हे खरं आहे. आणि मला त्याचा स्वीकार करणं हे शिकायलाचं हवं. मी स्वच्छंदी विचार करत असेन, परंतु मी स्वच्छंदी वागत नाही. त्याला बरीच कारणे आहेत. स्वच्छंदी हा एक प्रकारचा escape होता बहुतेक! त्या वेळेस मी जशी आहे त्याबाबत comfortable नसल्याने स्वत:...

2013

मी  २०११ मधील आठवणी लिहिल्या होत्या. २०१२ मध्ये आळशीपणा केला. पण या वर्षी ठरवलंय मी, उशीर झाला तरी चालेल पण लिहायचं. खरं सांगायचं तर सगळं किती बदलल्या सारखं वाटतं. म्हणजे दोन वर्षांपूर्वी लिहिलेल्या गोष्टी वाचून तर मी खूप दूर आल्यासारखं वाटतं मला. आणि मला माहितेय ही चांगली गोष्ट आहे, कारण माझा प्रवासावर खूप विश्वास आहे. ३६५ दिवसांत जर तारखेशिवाय काही बदललं नसेल, तर ते दिवस वाया गेल्या सारखे आहेत. नाही का? आता मी सांगेन त्या आठवणी ह्या घटनाक्रमानुसार (order-of-occurence :P) आहेत, त्यात आवड-नावड असं काही नाही. :D १.       Canvas 2 गेल्या वर्षी जानेवारी मध्ये मला माझा पहिला वहिला smartphone मिळाला. देसी कंपनी चा स्वस्त आणि मस्त फोन! जेव्हा मी ठरवलं कि हा फोन घ्यायचा तेव्हा अर्थात बरयाच लोकांनी नाकं मुरडली. पण खरं सांगते, it’s been really good! J कॅमेरा पेक्षा फोटोग्राफर महत्त्वाचा तसेच फोन वापरणारा कितपत फोन चा वापर करतो हे महत्त्वाचं ! मी नेहमी फोन ला चिकटून असते हि एक बाब सोडली तर, सगळं किती सोपं वाटतं ह्या फोन्स मुळे. ह्या फोन मुळे अजून एक अगदी...

दुनियादारी

"ये महलो, ये तख्तो, ये ताजो की दुनिया,                ये इंसान के दुश्मन समाजो की दुनिया,     ये दौलत के भूखे रवाजो की दुनिया,                ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या हैं?"            "दुनियादारी" वाचून झालं नुकतंच… मी हललेय पार आतून! म्हणजे हे असंच असतं का? कोणीच चूक आणि कोणीच बरोबर नसतं बहुतेक. शेवटी सगळं परिस्थितीच्या मनात असतं तसंच घडतं. मग ही स्वत:ची ओढाताण कशासाठी? आज इथे जिंकून मिळवायचं ते काय आणि हरायचं ते काय??? परिस्थिती आपल्याला सर्व या अशा मार्गाने का शिकवत असते? आज या क्षणी माझी जी काही स्वप्नं आहेत, ती जर उद्या पूर्ण झाली नाहीत तरी मी चालतंच राहणारेय. खरंतर, मला चालतच राहावं लागणार आहे. आज जर मला मध्ये काही सोडावं लागलं, तर ते पाठी ठेऊन मी पुढे जाणारेय… आजचे क्षण या उद्याच्या आठवणी आहेत. ज्या क्षणांना मी आज जपत नाही, त्या उद्या नाहीशा होणारेत. हा सिद्धांत आहे आणि या सिद्धांतावर माणूस निर्माण झाला आहे.  पण मग या आयुष्यात ये...

आयुष्यात पुढे जायचं असतं...!

आज लिहावंसं वाटतंय... किंवा कदाचित कॉम्प्युटर रडत-खडत चालतोय म्हणून  असेल...  हे लिहिणं आता जमेनासं झाल्यासारखं भासतंय... स्वत:बद्दल बरंच काही बदलल्यासारखं जाणवतंय, सभोवतालचं जग देखील बदलल्यासारखं वाटतंय... असं वाटतंय की या सगळ्या बदलांत आपण कुठेच नव्हतो आणि आज अचानक यात पडलोय, एखाद्या अनभिज्ञासारखे! सगळं नवीन! पण जुन्या जगाची आठवण करून देणारं ... तिथे परत जाण्याची आस निर्माण करणारं... कुठेतरी किंवा कधीतरी ते जग परत येईल अशी आशा निर्माण करणारं... वेगळं! पुन्हा नव्याने सुरुवात कर, असं सांगायचं असेल त्याला... पण ना काही पूर्वसूचना, ना मार्गदर्शक इशारा... विशाल महासागरात हरवलेल्या बोटीच्या खलाश्यासम... एकटं, स्वबळावर! पण त्या खलाश्याच्या मनातील विजीगिषु वृत्ती आपण कशी जागवणार... त्याला वेड असतं... तो त्याचे स्वप्न पूर्ण करायच्या इच्छेपोटी वेडा होऊन जातो... स्वत:ला हरवून बसतो! त्या नाविन्याच्या शोधात असं स्वत: हरवून जाण्यात ते सुख तरी काय असतं? स्वत:ला शोधण्यात वेळ व शक्ती दोन्ही खर्च होतेच, पण मग हे काम युक्तीने चालवावं तरी कसं! युक्तीने संपूर्ण जग खरंच चालू शकतं का? आणि...

जग एक कोवळा भास...

भीती दाटली आज मनी , कसा सावरू सारा डाव , सरल्या आठवणी जणू , पाडूनी हृदयावर घाव ... वाटे भेटावे आज तिला , द्यावे नात्यास नवे नाव , समुद्री उफाळल्या लाटा , सावरावी बुडती नाव ... स्वप्न सानुले पाहिले जे , पूर्णत्त्व आहे देणे त्यास , वादळात अडकुनी या , नासे जगण्याची आस ... आरशात पाहुनी मज , मी सोडला एक नि : श्वास , लख्ख दिसले त्या डोळ्यांत , जग एक कोवळा भास ... - सात्मन   ( १९ - ०५ - २०१२ )