Skip to main content

Posts

मिजास

खुपदा असं होतं की आपण आपल्याच धुंदीत जगत असतो.... स्वत:च्या जगाचे राजे असतो आणि अचानक असा दिवस येतो की काही लोक आपल्या आयुष्यात येतात. आपले मित्र बनतात. आपल्या आयुष्यातील खूप जिव्हाळ्याचा भाग बनून जातात. ज्यांना तोडणं आपल्याला कधीच शक्य होणार नाही असे. पण ही मंडळी सतत काही ना काही कारण काढून आपल्यावर हसतात, आपल्याला कमी दाखवायचा प्रयत्न करतात, अर्थात सर्व मैत्रीच्या नात्याने, एक प्रकारची मजा म्हणून.... जी साधारणत: मित्र-मैत्रिणींमध्ये होताच असते. पण का माहित नाही ती आपल्याला टोचू लागते. उगाच राग देऊन जाते. मग ती आपल्याला म्हणतात की, “ एवढं काय त्यात, मजा-मस्तीत चालत सगळं..... ” . आपल्यालाही त्यांचा म्हणणं पटून जातं. खरंच काय चुकीच बोलत असतात ते, आपण एवढा अधिकार त्यांना दिलेला असतो. सगळेच जण आपल्या मित्र-मैत्रिणींना एवढं हक्क देतात, मग आपल्यालाच का लागते ही गोष्ट??? का उगाच अपमानित झाल्यासारखा वाटतं...??? वाटतं की हे कोण आले आपल्याला असं बोलणारे??? त्यांची लायकी तरी आहे का??? मग प्रकरण जेंव्हा “ लायकी ” या शब्दावर येऊन पोहोचतं तेंव्हा वाटतं खरंच या गोष्टीचा  आता गांभीर्याने...

आज भासे विरळाच...

का एका क्षणी वाटे अनोळखी हे विश्व सारे, जाती लपुनी सर्व खुणा, भावना का रे? काल होता  एक रस्ता, आज आहे निराळाच, काल होता सोबत माझ्या, आज भासे विरळाच... का बदलूनी गेले सर्वकाही या दोन घडीत, नव्हते एव्हढेही मजपाशी, जे न सामावे या मिठीत... काल होता एक सोबती, आज भासे विरळाच, काल होता सोबत माझ्या, आज भासे विरळाच... का राहिले अपूर्ण माझे, स्वप्न जे स्वप्नात रंगवलेले, भंगुनी गेले हृदय माझे, स्वप्नात जे दंगलेले.... काल होता एक ध्यास, आज आहे निराळाच, काल होतं सोबत माझ्या, आज भासे विरळाच... का गेलास दूर तू,वाट माझी सोडून, होते विसंबलेले तुझ्यावरी, दिलास तू हात माझा सोडून.... काल होतास एक तू, आज आहेस निराळाच, काल होतास सोबत माझ्या, आज भासे विरळाच...

आत्मसंशोधन!

काही काही वेळेला आपल्याला खरंच कळत नाही की काही गोष्टींबद्दल आपला काय 'stand' असायला हवा आणि काय आहे. It's so confusing!!! I mean, मी अमुक अमुक व्यक्तीला मदत करतेय ती नक्की का करतेय, कोणत्या नात्याने करतेय आणि कोणत्या हेतूने करतेय, हे शोधणं गरजेचं नाहीये का??? मदत करण्याबाबत शंका नाही, ती तर करायलाच हवी. परंतु आपला "stand" शोधणं आत्मसंशोधानाच्या दृष्टीने गरजेचं नाहीये का??? 'आत्मसंशोधन' शब्द खरंच जड आहे पण त्यापेक्षाही वजनदार आहे. जेवढं वजनदार तेवढंच कठीण आणि खोल.... ते करणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही एखादी कृती करून विसरून गेलात तर ती कृती 'घडवून' आणण्यामागचा उद्देश काय???म्हणतात ना, प्रत्येक गोष्ट करण्याआधी विचार करावा. गेलेली वेळ आणि गेलेला शब्द परत येत नाही. पण सध्याच्या काळात वेळ तरी कुठेय, म्हणजे सकाळी सुरु झालेला दिवस रात्री डोळे मिटेपर्यंत कसा निघून जातो कळतच नाही, भले निव्वळ टाइमपास केलेला असो... आणि तसंही सध्याच्या काळात बसून विचार करण्यापेक्षा टाइमपास करणं जास्त रास्त वाटतं. सगळ्यांचं म्हणणं एकच ," कोण एवढी झंझट करणार, आधीच डोक्याल...

रिलेशनशिप स्टेटस : सिंगल

And that neither means Available nor ready to Mingle!!!! रिलेशनशिप  स्टेटस:सिंगल एक भुवया उंचावणारं स्टेटमेंट..... (भुवया उंचावण्याची कारणे अर्थात वेग-वेगळी असतात..... ;)) आणि त्यामागून येणारा म्हणजे ओघानेच येणारा प्रश्न "का???" आणि त्याचं त्याच सहजतेने दिलेलं उत्तर.... "अजून 'तसा ' कोणी भेटला नाही"..... आता  हे 'तसा' काय प्रकरण आहे, हा मुलांना पडलेला स्वाभाविक प्रश्न! आणि त्याचं उत्तर शोधायचा केलेला हा लहानसा म्हणजे अगदी बारीकसा प्रयत्न... तर एखाद्या मुलीच्या सिंगल असण्यामागे खूप काही कारणं असतात....म्हणजे बघा ना, प्रत्येक मुलीच्या मनात एक राजकुमार हा असतोच; मग भले ती मुलगी दासी होण्यालायक तरी असो वा नसो.... पण का माहित नाही हे काही मला पटत नाही....म्हणजे माणसाने expect तेव्हढंच करावं जेव्हढ त्याला बनणं शक्य आहे..... आता मला माहितेय की मी राजकुमारी वगैरे नाहीये... दिसण्याबद्दल म्हणतेय मी.... बाकी माझ्या विश्वाची मीच राजकुमारी आहे..... एक 'स्वच्छंदी' राजकुमारी.....आणि असाच एक स्वच्छंदी राजकुमार हवाय मला.... तो अगदी माझ्यासारखा ...

परिपूर्ण केलेस मला तू......

होते लाजरी कळी मी, बावरे फूल केलेस मला तू..... होते बावळी श्रोता मी, दर्दी रसिक केलेस मला तू..... होते बुजरा गंध मी, दरवळता सुवास केलेस मला तू.... होते सर्वकाही थोडे थोडे मी, तुझ्या थोड्या-थोड्याने परिपूर्ण केलेस मला तू...... तुजवीण आहे प्रवास हा शांत, तुजवीण ना उरली जगाची या भ्रांत..... परतुनि ये आता माझ्या राजकुमारा, अश्रुत बुडूनी ढासळतोय एक शोकांत.... तुजवीण वाटे विश्व हे अधुरे, तुजवीण भासे स्वप्न हे अपूरे, कुठे लपलासी रे राजकुमारा, तुझ्या चाहुलीने होईल जगणे साजरे....

तुझी आठवण.........

नाही येत मला आजकाल रोज-रोज तुझी आठवण, तू बनून गेलायस माझ्या हृदयातील एक साठवण..... पूर्वी दर मिनिटाला यायची तुझी आठवण उगाच, आणि उडवून जायची बोजवारा कामाचा सगळाच.... आज विचार केल्यावर वाटतं किती वेडे झालेले मी, जणू काही कृष्णाच्या प्रेमात आकंठ बुडालेली मीरा मी.... तू दूर गेल्यावरही एवढी शांत राहेन मी वाटले नव्हते कधीच, खरे सांगायचे तर तू एवढा दूर जाशील वाटले नव्हते कधीच.... तू दूर गेल्यावरही आज रिकामे वाटत नाहीये मला, तुझ्यासोबत जुळलेल्या सुखद आठवणींनी जणू भरून टाकलंय मला.... या आठवणींचा गंध असाच दरवळत हवाय मला आयुष्यभर, आणि त्यासाठीच आणखी थोड्या आठवणींचे अत्तर हवेय मला ओंजळभर.... आठवण नाही येत म्हणता-म्हणता चटकन एक ठिणगी पेटते, आणि तुझ्या आठवणींचा वणवा माझ्या मनाच्या वनभर पसरवते.... त्याक्षणी वाटते आज तू हवा होतास इथे माझ्याजवळ माझ्यासोबत, आयुष्य माझे पूर्ण झाले असते कदाचित राहून तुझ्यासोबत.... माझ्या आतल्या तुला मग मी शोधात राहते वणवण, तरी सांगते सगळ्यांना, "नाही येत आजकाल मला रोज-रोज तुझी आठवण........."

"स्वच्छंदी"ची गोष्ट.....

संपूर्ण नाव : स्वच्छंदी   (आडनावाने एखाद्या व्यक्तीकडे पाहायचे संदर्भ बदलतात, त्यामुळे आडनावाचा उल्लेख टाळते आहे.....) हे माझं नाव मला खूप प्रिय आहे. असं नाव या जगात क्वचितच कोणाचं असेल आणि या नावाचा अर्थही मला प्रचंड आवडतो..... " स्वत:च्या छंदाने, स्वत:च्या आवडी-निवडीनुसार वागणारी ती स्वच्छंदी " स्वत:चे "स्व"त्त्व (मी पण नव्हे) जपायला मला खूप आवडतं. मी सगळ्यांपेक्षा वेगळी आहे आणि खूप special आहे..... तसं पाहिलं तर प्रत्येक व्यक्ती ही दुसऱ्यापेक्षा वेगळीच असते. कदाचित प्रत्येकाला आपले ओळख जपता येत नसावी. यासाठी खूप कारणं असतात आणि खूप कारणं देताही येतात.... पण अंतत: स्वत:शी प्रामाणिक राहणं महत्त्वाचं.....! मला खुपदा (नेहमी नाही) माहित असतं कि मी एखादी गोष्ट का करतेय..... त्यातून मला काय मिळणार आहे आणि समोरच्याला काय मिळणार आहे..... अशा काही गोष्टी नक्कीच असतात, ज्या त्या क्षणी का घडतात किंवा त्या क्षणी आपण त्या का करतो, याची आपल्याला काहीच कल्पना नसते.... त्या नकळत घडून जातात.....!!! अशावेळी मी स्वत:ला फक्त एवढंच सांगते..... " Everything has its own...