Skip to main content

"स्वच्छंदी"ची गोष्ट.....

संपूर्ण नाव : स्वच्छंदी 

(आडनावाने एखाद्या व्यक्तीकडे पाहायचे संदर्भ बदलतात, त्यामुळे आडनावाचा उल्लेख टाळते आहे.....)
हे माझं नाव मला खूप प्रिय आहे. असं नाव या जगात क्वचितच कोणाचं असेल आणि या नावाचा अर्थही मला प्रचंड आवडतो.....


"स्वत:च्या छंदाने, स्वत:च्या आवडी-निवडीनुसार वागणारी ती स्वच्छंदी"
स्वत:चे "स्व"त्त्व (मी पण नव्हे) जपायला मला खूप आवडतं. मी सगळ्यांपेक्षा वेगळी आहे आणि खूप special आहे..... तसं पाहिलं तर प्रत्येक व्यक्ती ही दुसऱ्यापेक्षा वेगळीच असते. कदाचित प्रत्येकाला आपले ओळख जपता येत नसावी. यासाठी खूप कारणं असतात आणि खूप कारणं देताही येतात.... पण अंतत: स्वत:शी प्रामाणिक राहणं महत्त्वाचं.....! मला खुपदा (नेहमी नाही) माहित असतं कि मी एखादी गोष्ट का करतेय..... त्यातून मला काय मिळणार आहे आणि समोरच्याला काय मिळणार आहे..... अशा काही गोष्टी नक्कीच असतात, ज्या त्या क्षणी का घडतात किंवा त्या क्षणी आपण त्या का करतो, याची आपल्याला काहीच कल्पना नसते.... त्या नकळत घडून जातात.....!!!
अशावेळी मी स्वत:ला फक्त एवढंच सांगते.....

" Everything has its own significance in life and everything happens for a reason...."
हे significance आणि reasons शोधायला मला खूप आवडतात. एखादा खजिना शोधाल्यासारखं वाटतं आणि जसजसे आपण शोधाच्या अखेरीला पोहोचतो, तसतसा आपल्याला, आपल्या नकळत work out होत असलेला plan लक्षात येतो. प्रत्येक योगायोगाचा हेतू स्पष्ट होतो आणि आपण त्या क्षणी तसे का वागलो, याचं कारण कळून चुकतं......
आणि "मृत्युंजय" मधल्या "कर्णा"च्या एका वचनाच महत्त्व पटतं....
"योगायोगच मनुष्याचं आयुष्य घडवत असतात. तो निव्वळ त्याचं श्रेय घेतो........!"

Comments

Maithili said…
Ohh...Good one yaa...Really...!!! Liked it...!!! :)
Manali Satam said…
thanks a lot!!! wondering of making a series of articles related to "swachchhandi".... hope it goes well!!!
'मनाली' या शब्दाचा अर्थ होतो 'पक्षी'...and birds sybolizes freedom... स्वच्छंदी .... keep writing
Manali Satam said…
'मनाली' चा अर्थ 'पक्षी' असा होतो हे खरंच माहीत नव्हतं मला..... सांगितल्याबद्दल धन्यवाद!!! आणि माझ्या blog चं नाव 'स्वच्छंदी' असणं आणि माझ्या नावाचा अर्थ पक्षी ( which symbolises Freedom) असणं, हा निव्वळ योगायोग आहे..... :D!!!!
‘स्वच्छंदी’ हे नाव ब्लॉगसाठी फारच लोकप्रिय आहे असं दिसतं. माझ्याही ब्लॉगचं नाव तेच आहे. हे नाव ठेवताना माझ्याही मनात हेच विचार आले होते. स्वच्छंदी म्हणजे कसलंही बंधन नसलेला. तेव्हा कुठल्याही विषयाचं बंधन नसलेल्या ब्लॉगसाठी ‘स्वच्छंदी’ हे नाव योग्य वाटलं मला. पण ते नाव आधीपासूनच तुमच्या ब्लॉगचं आहे. एवढंच नव्हे तर, http://swachandi.blogspot.com/ या ब्लॉगचंही नाव ‘स्वच्छंदी’च आहे!
संकेत आपटे या स्वच्छंदीच्या ब्लॉगवरून या स्वच्छंदीच्या ब्लॉगचा पत्ता मिळाला होता, मग काय, आलो स्वच्छंद विहार करत... ჻)
स्वछंदीची गोष्ट आवडली. :)
मला आधी वाटलं संकेतचा ब्लॉग आहे की काय हा. असो, आज अजून एक स्वछंदी विहार करणारी सापडली ह्या ब्लॉगविश्वात..
खुप शुभेच्छा लिखाणासाठी !!
Manali Satam said…
धन्यवाद!!!
या शब्दात एक प्रकारची जादू आहे, जेव्हा मी स्वच्छंदी विचार करायला लागते तेव्हाच कदाचित असे शब्द सुचतात... आणि त्यासाठीच मी स्वच्छंदी बनण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करते.... :)

Popular posts from this blog

विपश्यना : एक चिंतन

विपश्यनेचा दहा दिवसांचा कोर्स करून आज पाच दिवस झालेत. याबद्दल लिहायचं हे नक्की होतं, पण गेले काही दिवस काय लिहू हे समजतच नव्हत. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा वेगळा असतो कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. म्हणूनच मला सर्वसमावेशक असं काहीतरी लिहायच होतं. आता बसलेय लिहायला... सर्वात आधी, विपश्यना म्हणजे काय?

आयुष्यात पुढे जायचं असतं...!

आज लिहावंसं वाटतंय... किंवा कदाचित कॉम्प्युटर रडत-खडत चालतोय म्हणून  असेल...  हे लिहिणं आता जमेनासं झाल्यासारखं भासतंय... स्वत:बद्दल बरंच काही बदलल्यासारखं जाणवतंय, सभोवतालचं जग देखील बदलल्यासारखं वाटतंय... असं वाटतंय की या सगळ्या बदलांत आपण कुठेच नव्हतो आणि आज अचानक यात पडलोय, एखाद्या अनभिज्ञासारखे! सगळं नवीन! पण जुन्या जगाची आठवण करून देणारं ... तिथे परत जाण्याची आस निर्माण करणारं... कुठेतरी किंवा कधीतरी ते जग परत येईल अशी आशा निर्माण करणारं... वेगळं! पुन्हा नव्याने सुरुवात कर, असं सांगायचं असेल त्याला... पण ना काही पूर्वसूचना, ना मार्गदर्शक इशारा... विशाल महासागरात हरवलेल्या बोटीच्या खलाश्यासम... एकटं, स्वबळावर! पण त्या खलाश्याच्या मनातील विजीगिषु वृत्ती आपण कशी जागवणार... त्याला वेड असतं... तो त्याचे स्वप्न पूर्ण करायच्या इच्छेपोटी वेडा होऊन जातो... स्वत:ला हरवून बसतो! त्या नाविन्याच्या शोधात असं स्वत: हरवून जाण्यात ते सुख तरी काय असतं? स्वत:ला शोधण्यात वेळ व शक्ती दोन्ही खर्च होतेच, पण मग हे काम युक्तीने चालवावं तरी कसं! युक्तीने संपूर्ण जग खरंच चालू शकतं का? आणि...

शाळा = निरागसता !

" त्यादिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत , बाकं आहेत , पोरं-पोरी आहेत , सर आहेत , गणित आहे , भूगोल आहे , नागरिकशास्त्र सुध्दा ; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणार्‍या पांढर्‍या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत. त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते. खास एकट्याचीच. त्या शाळेत वर्ग नाहीत , भिंती नाहीत , फळा नाही , शिक्षक नाहीत ; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे..." :) शाळा चित्रपटाने मला काय दिलं??? तर बऱ्याच दिवसांनी काहीतरी गोड, निरागस आणि तरल गोष्ट ऐकल्याचा, पाहिल्याचा आनंद! :) आणि शाळा कादंबरीने मला काय दिलं होतं, तीच गोष्ट वाचल्याचा आनंद...! शाळा कादंबरी ही बहुतेकांच्या आवडत्या पुस्तकांतील एक आहे, अर्थात माझ्याही!!! ते पुस्तक वाचून आता दीड वर्षं झाली, पण सगळं कसं अगदी मनावर कोरलं गेल्याप्रमाणे लख्ख! क्षणात वेड लावलं कादंबरीने... आणि मग कुठेतरी ऐकिवात आलं की शाळा कादंबरीवर सिनेमा येणारेय... एवढा आनंद झाला म्हणून सांगू! म्हणजे जी पात्र, ज्या जागा आणि ज्या भावनांची आपण निव्वळ एक कल्पना केली होती, ते विश्व दृ...