Skip to main content

माझ्यासारखाच....!



तूही असशील का माझ्यासारखाच,
"आपल्या" अशा कोणाच्यातरी आठवणींत रमणारा....
त्या आठवणींतल्या दोन क्षणांत,
भविष्य सांधणारा....

तूही असशील का माझ्यासारखाच,
त्या डोळ्यांत "आपल्या"अशा कोणाचं तरी प्रतिबिंब पाहणारा....
आणि निव्वळ त्या प्रतिबिंबापायी,
डोळ्यांत पुन्हा पुन्हा हरवणारा...

तूही असशील का माझ्यासारखाच,
"आपल्या"अशा कोणालातरी शोधणारा...
आणि शोधता शोधता स्वत:च,
स्वत:चं भान हरपून घेणारा....

तूही असशील का माझ्यासारखाच,
"आपल्या"अशा कोणाचीतरी वाट बघणारा....
आणि वाट बघातानांच स्वत:च्या,
भावनांची शाश्वता जपणारा....

तूही असशील का माझ्यासारखाच,
शब्दांना वाट करून देण्याचा प्रयत्न करणारा....
आणि त्या प्रयत्नांतच कुठेतरी,
मी तुझ्यासारखी आहे हि जाणीव करून देणारा.....

Comments

Tushar Joshi said…
Welcome back! कविता छान आहे. तुझाच ब्लाग असला तरीही कविते खाली नाव लिहित जा. ते सही करण्यासारखे पण होते आणि सवय पण चांगली आहे नाव व तारीख लिहिण्याची.

तुषार
Anonymous said…
kavita masta aahe, keep it up!!!!!!!

Ganesh Bade
Yashwant Palkar said…
khup chan aahe kavita ajunahi asha kavita vachavayas milatil hi apekhsa
BinaryBandya™ said…
मस्तच आहे कविता ...
Aditi Mahajan said…
kya baat hai!! manali back with a bang!! loved it!!
तुही असशील का माझ्यासारखाच
आपल्या अश्या कोणाची तरी वाट बघणारा..
आणि वाट बघताना स्वतःच्या
भावनांशी शाश्वता जपणारा...

अप्रतिम... खुप छान !!
Unknown said…
Manu khup khup chhan... aahe kavita..........
Manali Satam said…
खूप खूप धन्यवाद!!! प्रतिक्रिया वाचून खूप आनंद झाला... माझ्याकडून असाच पुढेही लिहील जावं हि आशा...
@ अदिती & अलका : :)
छान आहेत कविता तुमच्या, ब~याच वाचल्या पण इथे कमेंट करतोय, ओढुन ताणुन लिहिलेल्या नाहीत फ़्लो जाणवतो लेखनातला, गॉड गिफ़्ट आहे, लिहित रहाल, शुभेच्छा......
Manali Satam said…
खूप खूप आभार!!! माझीही तीच आशा आहे!
Shriraj said…
आवडली!!! खरंच सुंदर...

ब्लॉगचा लूक ही आवडला!!!!

Popular posts from this blog

विपश्यना : एक चिंतन

विपश्यनेचा दहा दिवसांचा कोर्स करून आज पाच दिवस झालेत. याबद्दल लिहायचं हे नक्की होतं, पण गेले काही दिवस काय लिहू हे समजतच नव्हत. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा वेगळा असतो कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. म्हणूनच मला सर्वसमावेशक असं काहीतरी लिहायच होतं. आता बसलेय लिहायला... सर्वात आधी, विपश्यना म्हणजे काय?

आयुष्यात पुढे जायचं असतं...!

आज लिहावंसं वाटतंय... किंवा कदाचित कॉम्प्युटर रडत-खडत चालतोय म्हणून  असेल...  हे लिहिणं आता जमेनासं झाल्यासारखं भासतंय... स्वत:बद्दल बरंच काही बदलल्यासारखं जाणवतंय, सभोवतालचं जग देखील बदलल्यासारखं वाटतंय... असं वाटतंय की या सगळ्या बदलांत आपण कुठेच नव्हतो आणि आज अचानक यात पडलोय, एखाद्या अनभिज्ञासारखे! सगळं नवीन! पण जुन्या जगाची आठवण करून देणारं ... तिथे परत जाण्याची आस निर्माण करणारं... कुठेतरी किंवा कधीतरी ते जग परत येईल अशी आशा निर्माण करणारं... वेगळं! पुन्हा नव्याने सुरुवात कर, असं सांगायचं असेल त्याला... पण ना काही पूर्वसूचना, ना मार्गदर्शक इशारा... विशाल महासागरात हरवलेल्या बोटीच्या खलाश्यासम... एकटं, स्वबळावर! पण त्या खलाश्याच्या मनातील विजीगिषु वृत्ती आपण कशी जागवणार... त्याला वेड असतं... तो त्याचे स्वप्न पूर्ण करायच्या इच्छेपोटी वेडा होऊन जातो... स्वत:ला हरवून बसतो! त्या नाविन्याच्या शोधात असं स्वत: हरवून जाण्यात ते सुख तरी काय असतं? स्वत:ला शोधण्यात वेळ व शक्ती दोन्ही खर्च होतेच, पण मग हे काम युक्तीने चालवावं तरी कसं! युक्तीने संपूर्ण जग खरंच चालू शकतं का? आणि...

शाळा = निरागसता !

" त्यादिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत , बाकं आहेत , पोरं-पोरी आहेत , सर आहेत , गणित आहे , भूगोल आहे , नागरिकशास्त्र सुध्दा ; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणार्‍या पांढर्‍या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत. त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते. खास एकट्याचीच. त्या शाळेत वर्ग नाहीत , भिंती नाहीत , फळा नाही , शिक्षक नाहीत ; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे..." :) शाळा चित्रपटाने मला काय दिलं??? तर बऱ्याच दिवसांनी काहीतरी गोड, निरागस आणि तरल गोष्ट ऐकल्याचा, पाहिल्याचा आनंद! :) आणि शाळा कादंबरीने मला काय दिलं होतं, तीच गोष्ट वाचल्याचा आनंद...! शाळा कादंबरी ही बहुतेकांच्या आवडत्या पुस्तकांतील एक आहे, अर्थात माझ्याही!!! ते पुस्तक वाचून आता दीड वर्षं झाली, पण सगळं कसं अगदी मनावर कोरलं गेल्याप्रमाणे लख्ख! क्षणात वेड लावलं कादंबरीने... आणि मग कुठेतरी ऐकिवात आलं की शाळा कादंबरीवर सिनेमा येणारेय... एवढा आनंद झाला म्हणून सांगू! म्हणजे जी पात्र, ज्या जागा आणि ज्या भावनांची आपण निव्वळ एक कल्पना केली होती, ते विश्व दृ...