का एका क्षणी वाटे अनोळखी हे विश्व सारे,
जाती लपुनी सर्व खुणा, भावना का रे?
काल होता एक रस्ता, आज आहे निराळाच,
काल होता सोबत माझ्या, आज भासे विरळाच...
का बदलूनी गेले सर्वकाही या दोन घडीत,
नव्हते एव्हढेही मजपाशी, जे न सामावे या मिठीत...
काल होता एक सोबती, आज भासे विरळाच,
काल होता सोबत माझ्या, आज भासे विरळाच...
का राहिले अपूर्ण माझे, स्वप्न जे स्वप्नात रंगवलेले,
भंगुनी गेले हृदय माझे, स्वप्नात जे दंगलेले....
काल होता एक ध्यास, आज आहे निराळाच,
काल होतं सोबत माझ्या, आज भासे विरळाच...
का गेलास दूर तू,वाट माझी सोडून,
होते विसंबलेले तुझ्यावरी, दिलास तू हात माझा सोडून....
काल होतास एक तू, आज आहेस निराळाच,
काल होतास सोबत माझ्या, आज भासे विरळाच...
Comments
तुझी ही कविता सुंदर झालेय.खूप आवडली.
असेलही कदाचित भास तुझा,
खरच असेल विरळा जर तो,
सोडवूनी घे तू हात तुझा,
गुंतू नको त्या आठवणीत,
सोडूनी दे साऱ्या त्या आठवणी,
कर तू ओंजळ रिती तुझी तू,
थांबण्याआधी श्वास तुझा...