Skip to main content

Edward Cullen



"If i could dream at all, it would be about you, and i'm not ashamed of it." - Edward Cullen


खरंच हे नाव ऐकल्यावर मनात जी काही भावना येते ती जगातील कोणतीही शक्ती आणू शकणार नाही, हे मी खात्रीने सांगू शकते.... त्याच्याभोवती तयार झालेलं वलय हीच जणू त्याची शक्ती आहे... त्याची प्रत्येक कृती आपल्याला काही ना काही शिकवून जाते आणि नकळत आपल्याला त्याच्या प्रेमात पाडते..... स्वत: एक vampire असूनही त्याचं एका मुलीच्या प्रेमात पडणं, हे जेवढं रोमांचकारी आहे, त्याच्यापेक्षा त्या मुलीसाठी आपल्या प्राथमिक इच्छेवर ( तिचं रक्त चाखण्याच्या ) त्याने मिळवलेला विजय जास्त भावतो.... तो परिपूर्ण आहे, त्याच्याकडे ते सर्व काही आहे ज्याची एखादी मुलगी एका मुलाकडून अपेक्षा ठेवेल....
सर्वात महत्त्वाची गोष्ट, तो खूप handsome आहे.... तो एखाद्या देवतेच्या पुतळ्या सारखा आहे.... त्याचं स्वत:वर असलेलं नियंत्रण, त्याची प्रेम करण्याची कला वेड लावणारी आहे..... त्याने त्याच्या bella साठी केलेली प्रत्येक गोष्ट, त्याचं तिच्यावर असलेल प्रेम प्रतीत करते. तो तिच्या रक्षणासाठी सारखा झटत असतो, कारण त्याच्या मते ती आहे म्हणून तो जगतोय....
"I cannot live without my life, I cannot live without my soul"
त्याचा आत्मा तिच्यात दडलाय, म्हणूनच त्याला ज्या क्षणी असं कळत ( चुकून ), की ती या जगात नाही, तो तडक स्वत:ला संपवण्याच्या मार्गांचा विचार करायला लागतो.... जणू तिच्याशिवाय जगणं हे काय असतं हे त्याला माहीतच नाही....
     

Comments

Popular posts from this blog

विपश्यना : एक चिंतन

विपश्यनेचा दहा दिवसांचा कोर्स करून आज पाच दिवस झालेत. याबद्दल लिहायचं हे नक्की होतं, पण गेले काही दिवस काय लिहू हे समजतच नव्हत. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा वेगळा असतो कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. म्हणूनच मला सर्वसमावेशक असं काहीतरी लिहायच होतं. आता बसलेय लिहायला... सर्वात आधी, विपश्यना म्हणजे काय?

आयुष्यात पुढे जायचं असतं...!

आज लिहावंसं वाटतंय... किंवा कदाचित कॉम्प्युटर रडत-खडत चालतोय म्हणून  असेल...  हे लिहिणं आता जमेनासं झाल्यासारखं भासतंय... स्वत:बद्दल बरंच काही बदलल्यासारखं जाणवतंय, सभोवतालचं जग देखील बदलल्यासारखं वाटतंय... असं वाटतंय की या सगळ्या बदलांत आपण कुठेच नव्हतो आणि आज अचानक यात पडलोय, एखाद्या अनभिज्ञासारखे! सगळं नवीन! पण जुन्या जगाची आठवण करून देणारं ... तिथे परत जाण्याची आस निर्माण करणारं... कुठेतरी किंवा कधीतरी ते जग परत येईल अशी आशा निर्माण करणारं... वेगळं! पुन्हा नव्याने सुरुवात कर, असं सांगायचं असेल त्याला... पण ना काही पूर्वसूचना, ना मार्गदर्शक इशारा... विशाल महासागरात हरवलेल्या बोटीच्या खलाश्यासम... एकटं, स्वबळावर! पण त्या खलाश्याच्या मनातील विजीगिषु वृत्ती आपण कशी जागवणार... त्याला वेड असतं... तो त्याचे स्वप्न पूर्ण करायच्या इच्छेपोटी वेडा होऊन जातो... स्वत:ला हरवून बसतो! त्या नाविन्याच्या शोधात असं स्वत: हरवून जाण्यात ते सुख तरी काय असतं? स्वत:ला शोधण्यात वेळ व शक्ती दोन्ही खर्च होतेच, पण मग हे काम युक्तीने चालवावं तरी कसं! युक्तीने संपूर्ण जग खरंच चालू शकतं का? आणि...

शाळा = निरागसता !

" त्यादिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत , बाकं आहेत , पोरं-पोरी आहेत , सर आहेत , गणित आहे , भूगोल आहे , नागरिकशास्त्र सुध्दा ; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणार्‍या पांढर्‍या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत. त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते. खास एकट्याचीच. त्या शाळेत वर्ग नाहीत , भिंती नाहीत , फळा नाही , शिक्षक नाहीत ; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे..." :) शाळा चित्रपटाने मला काय दिलं??? तर बऱ्याच दिवसांनी काहीतरी गोड, निरागस आणि तरल गोष्ट ऐकल्याचा, पाहिल्याचा आनंद! :) आणि शाळा कादंबरीने मला काय दिलं होतं, तीच गोष्ट वाचल्याचा आनंद...! शाळा कादंबरी ही बहुतेकांच्या आवडत्या पुस्तकांतील एक आहे, अर्थात माझ्याही!!! ते पुस्तक वाचून आता दीड वर्षं झाली, पण सगळं कसं अगदी मनावर कोरलं गेल्याप्रमाणे लख्ख! क्षणात वेड लावलं कादंबरीने... आणि मग कुठेतरी ऐकिवात आलं की शाळा कादंबरीवर सिनेमा येणारेय... एवढा आनंद झाला म्हणून सांगू! म्हणजे जी पात्र, ज्या जागा आणि ज्या भावनांची आपण निव्वळ एक कल्पना केली होती, ते विश्व दृ...