"झटककर जुल्फ जब तुम, तौलीये से बारीशे आझाद करती हो, अच्छा लगता हैं...." सध्या ह्या ओळी खुपदा कानांवर पडतात. या ओळींची रचना मला जाम आवडते. प्रसून जोशी ला त्या साठी सलाम! पण मला एका वेगळ्याच गोष्टीचं आश्चर्य वाटतं, ते म्हणजे समस्त पुरुष वर्गाला मुलींच्या या (केस सुकवण्याच्या), rather किचकट गोष्टीबद्दल एवढं आकर्षण का असतं??? म्हणजे हे मला मान्य आहे कि नुकतीच आंघोळ करून आलेली बाला (ऐकायला जरा विचित्र वाटत ना?) खूप फ्रेश दिसते. तसे तर पुरुष हि फ्रेश दिसतात. मग मुलीन्बाबतीतच असं का? खरं सांगायचं तर, अजून तरी हा प्रश्न मी माझ्या समस्त "मित्र" वर्गाला विचारलेला नाहीये. त्यामुळे मला खरच माहित नाहीये, कि नॉर्मल (म्हणजे कवी आणि ही सिनेमा वाली मंडळी सोडून) मुलांना अशा केस पुसत बाल्कनी किंवा दारात उभ्या मुलींकडे बघून काही होत असावं. Self Confession : मी गेली कित्येक वर्षे (जेंव्हापासून स्वत:चे केस स्वत: पुसायला लागले तेव्हापासून) बाल्कनीत उभी राहूनच केस पुसते. आणि अगदी सिनेमात दाखवतात तसे. म्हणजे काही ठरवून वगैरे नाही, पण तीच केस सुकवण्याची साधारणत: पद्धत असते. ...