"If i could dream at all, it would be about you, and i'm not ashamed of it." - Edward Cullen खरंच हे नाव ऐकल्यावर मनात जी काही भावना येते ती जगातील कोणतीही शक्ती आणू शकणार नाही , हे मी खात्रीने सांगू शकते.... त्याच्याभोवती तयार झालेलं वलय हीच जणू त्याची शक्ती आहे... त्याची प्रत्येक कृती आपल्याला काही ना काही शिकवून जाते आणि नकळत आपल्याला त्याच्या प्रेमात पाडते..... स्वत: एक vampire असूनही त्याचं एका मुलीच्या प्रेमात पडणं , हे जेवढं रोमांचकारी आहे , त्याच्यापेक्षा त्या मुलीसाठी आपल्या प्राथमिक इच्छेवर ( तिचं रक्त चाखण्याच्या ) त्याने मिळवलेला विजय जास्त भावतो.... तो परिपूर्ण आहे , त्याच्याकडे ते सर्व काही आहे ज्याची एखादी मुलगी एका मुलाकडून अपेक्षा ठेवेल.... सर्वात महत्त्वाची गोष्ट , तो खूप handsome आहे.... तो एखाद्या देवतेच्या पुतळ्या सारखा आहे.... त्याचं स्वत:वर असलेलं नियंत्रण , त्याची प्रेम करण्याची कला वेड लावणारी आहे..... त्याने त्याच्या bella साठी केलेली प्रत्येक गोष्ट , त्याचं तिच्यावर असलेल प्रेम प्रतीत करते. तो तिच्या रक्षणासाठी सारखा झटत असतो , कारण त्य...