आज आरशात बघताना काहीतरी वेगळेपणा जाणवला या चेहऱ्यात कुठेतरी त्या डोळ्यांत अभिमान दिसला स्वत:चाच संध्याकाळी फोन आला होता मावशीचा म्हणत होती आठवण आली तिला माझी जाहिरातीतल्या त्या नटीला पाहून तिचं हसणं, तिचे डोळे.... तू सुद्धा मला हेच म्हणाला होतास ना? तू ना अगदी "ति"च्यासारखी दिसतेस आणि मग तिच्यासारखी hair style कर म्हणून तगादा लावलास मागे माझ्या तिचा चित्रपट पाहताना निव्वळ आठवण आली म्हणून परत पाहायला गेलास तिच्यातल्या मला फक्त एक गाणं बघून कशी रे तूला तिच्यात मी दिसले प्रश्न सलतोय मनात माझ्या खरंच थकले रे तेव्हा तूला नाही-नाही म्हणून पण खरं सांगायचा तर मन आलं होतं आनंदाने भरून वाटायचं तू पुन्हा-पुन्हा तिला पहावस आणि पुन्हा-पुन्हा माझी आठवण काढावीस निदान तिच्या रुपात का होईना तू मला तुझी म्हणून पाहावीस तेव्हापासून स्वत:च्या या चेहऱ्याने एक प्रकारचं वेड लावलंय मला तुझ्या मनात या चेहऱ्याने का होईना घर केल्याचं समाधान लाभलंय मला पण यावर आता काळ सरलाय बराच आपल्या नात्यातही आता फरक पडलाय बराच आणि आता तर तूही म्हणायला लागलेलास, " लूक चेंज कर यार , तिला बघून ना तुझी आठव...