ना राहिली पवित्र आज ती गंगा, अन ना राहिला सुंदर तो ताज, परंतु आहे पवित्र आजही प्रेम तिचे, अन आहे सुंदर तिच्या शृंगारातील साज... ना सुगंधी आहे आज हा श्वास, अन ना राहिले आज जग ते धुंद, परंतु आहे सुगंधी आजही हि ओलेती माती, अन करतो मुग्ध आजही ह्या मोगऱ्याचा गंध.... - मनाली ( ता. क. : नवीन पोस्ट्सबद्दल अपडेटेड राहण्यासाठी फेसबुक वरील या ब्लॉगचे पेज जरूर "Like" करा.... :) )