या अंधाऱ्या राती, तिच्या आठवणीने व्याकुळ तो, टक लावून बघतोय चंद्राकडे, डोळ्यांतूनच व्यक्त सर्वकाही.... तीही स्वप्नाळू डोळ्यांनी, निरखतेय त्या चंद्राला, तिच्या डोळ्यातही तेच, जे त्याच्या डोळ्यांत.... नक्कीच त्यांचं बोलणं चालुये, उगाच नाही त्याला, स्वप्नात ती दिसतेय, अन् तिला तो.....