खुपदा असं होतं की आपण आपल्याच धुंदीत जगत असतो.... स्वत:च्या जगाचे राजे असतो आणि अचानक असा दिवस येतो की काही लोक आपल्या आयुष्यात येतात. आपले मित्र बनतात. आपल्या आयुष्यातील खूप जिव्हाळ्याचा भाग बनून जातात. ज्यांना तोडणं आपल्याला कधीच शक्य होणार नाही असे. पण ही मंडळी सतत काही ना काही कारण काढून आपल्यावर हसतात, आपल्याला कमी दाखवायचा प्रयत्न करतात, अर्थात सर्व मैत्रीच्या नात्याने, एक प्रकारची मजा म्हणून.... जी साधारणत: मित्र-मैत्रिणींमध्ये होताच असते. पण का माहित नाही ती आपल्याला टोचू लागते. उगाच राग देऊन जाते. मग ती आपल्याला म्हणतात की, “ एवढं काय त्यात, मजा-मस्तीत चालत सगळं..... ” . आपल्यालाही त्यांचा म्हणणं पटून जातं. खरंच काय चुकीच बोलत असतात ते, आपण एवढा अधिकार त्यांना दिलेला असतो. सगळेच जण आपल्या मित्र-मैत्रिणींना एवढं हक्क देतात, मग आपल्यालाच का लागते ही गोष्ट??? का उगाच अपमानित झाल्यासारखा वाटतं...??? वाटतं की हे कोण आले आपल्याला असं बोलणारे??? त्यांची लायकी तरी आहे का??? मग प्रकरण जेंव्हा “ लायकी ” या शब्दावर येऊन पोहोचतं तेंव्हा वाटतं खरंच या गोष्टीचा आता गांभीर्याने...