Skip to main content

Posts

Showing posts from February, 2011

आज भासे विरळाच...

का एका क्षणी वाटे अनोळखी हे विश्व सारे, जाती लपुनी सर्व खुणा, भावना का रे? काल होता  एक रस्ता, आज आहे निराळाच, काल होता सोबत माझ्या, आज भासे विरळाच... का बदलूनी गेले सर्वकाही या दोन घडीत, नव्हते एव्हढेही मजपाशी, जे न सामावे या मिठीत... काल होता एक सोबती, आज भासे विरळाच, काल होता सोबत माझ्या, आज भासे विरळाच... का राहिले अपूर्ण माझे, स्वप्न जे स्वप्नात रंगवलेले, भंगुनी गेले हृदय माझे, स्वप्नात जे दंगलेले.... काल होता एक ध्यास, आज आहे निराळाच, काल होतं सोबत माझ्या, आज भासे विरळाच... का गेलास दूर तू,वाट माझी सोडून, होते विसंबलेले तुझ्यावरी, दिलास तू हात माझा सोडून.... काल होतास एक तू, आज आहेस निराळाच, काल होतास सोबत माझ्या, आज भासे विरळाच...