होते लाजरी कळी मी,   बावरे फूल केलेस मला तू.....    होते बावळी श्रोता मी,   दर्दी रसिक केलेस मला तू.....   होते बुजरा गंध मी,   दरवळता सुवास केलेस मला तू....   होते सर्वकाही थोडे थोडे मी,   तुझ्या थोड्या-थोड्याने परिपूर्ण केलेस मला तू......            तुजवीण आहे प्रवास हा शांत, तुजवीण ना उरली जगाची या भ्रांत.....   परतुनि ये आता माझ्या राजकुमारा, अश्रुत बुडूनी ढासळतोय एक शोकांत....      तुजवीण वाटे विश्व हे अधुरे, तुजवीण भासे स्वप्न हे अपूरे,   कुठे लपलासी रे राजकुमारा, तुझ्या चाहुलीने होईल जगणे साजरे....