आपण जगत असतो असं समजून कि प्रवाहासोबत गेलं पाहिजे .... प्रवाहातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तरी नाही पडू शकत आपण बाहेर.... काहीतरी असतं जे आपल्याला बांधून ठेवत असतं.... खुपदा विचार करतो आपण कि हे नक्की काय आहे.... का कचरतो आपण या महाजालातून बाहेर यायला... का नाही होऊ शकत आपण स्वच्छंदी.... स्वच्छंदी आणि स्वैराचारी यातला फरक माहित असूनही .......मग अचानक कधीतरी एक message येतो.... "Be What You Are....Because Life Is To Express Yourself and Not To Impress Others....." खाडकन डोळे उघडतात आणि उत्तर सापडतं.....वाटायला लागतं खूप काही अव्यक्तच राहिलंय, कदाचित या काळजीने कि समोरच्याला काय वाटेल.... म्हणून ठरवला निदान इथेतरी स्वच्छंदी जगायचं....स्वत:ला वाटेल तसं....