Skip to main content

आयुष्यात पुढे जायचं असतं...!


आज लिहावंसं वाटतंय... किंवा कदाचित कॉम्प्युटर रडत-खडत चालतोय म्हणून  असेल... 
हे लिहिणं आता जमेनासं झाल्यासारखं भासतंय... स्वत:बद्दल बरंच काही बदलल्यासारखं जाणवतंय, सभोवतालचं जग देखील बदलल्यासारखं वाटतंय... असं वाटतंय की या सगळ्या बदलांत आपण कुठेच नव्हतो आणि आज अचानक यात पडलोय, एखाद्या अनभिज्ञासारखे!

सगळं नवीन! पण जुन्या जगाची आठवण करून देणारं ... तिथे परत जाण्याची आस निर्माण करणारं... कुठेतरी किंवा कधीतरी ते जग परत येईल अशी आशा निर्माण करणारं... वेगळं! पुन्हा नव्याने सुरुवात कर, असं सांगायचं असेल त्याला... पण ना काही पूर्वसूचना, ना मार्गदर्शक इशारा... विशाल महासागरात हरवलेल्या बोटीच्या खलाश्यासम... एकटं, स्वबळावर!

पण त्या खलाश्याच्या मनातील विजीगिषु वृत्ती आपण कशी जागवणार... त्याला वेड असतं... तो त्याचे स्वप्न पूर्ण करायच्या इच्छेपोटी वेडा होऊन जातो... स्वत:ला हरवून बसतो! त्या नाविन्याच्या शोधात असं स्वत: हरवून जाण्यात ते सुख तरी काय असतं?

स्वत:ला शोधण्यात वेळ व शक्ती दोन्ही खर्च होतेच, पण मग हे काम युक्तीने चालवावं तरी कसं! युक्तीने संपूर्ण जग खरंच चालू शकतं का? आणि जर ते चालत असेल, तर ती युक्ती शोधावी तरी कुठे! व्यक्ती तशा प्रकृती म्हणतात, त्याप्रमाणे व्यक्ती तशा युक्ती असतील ना जगात... पण त्यातली आपली ती कोणती???
ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं खरंच अस्तित्वात आहेत का? असतील तर ती मला कुठे सापडतील आणि नसतील तर हा सर्व खटाटोप तरी का करा! यातून मिळणार ते काय! बरेचसे प्रश्न अनुत्तरीत राहणार आणि या अनुत्तरीततेत लपलेलं अपूर्णत्व आणि असमाधान डोकं वर काढणार आणि चक्र पुन्हा सुरु होणार... समाधानतेकडे आणि सुखाकडे वाटचाल करायला आपण सुरुवात करणार आणि कितीही काही झाले तरी मिळवायचेच अशी ईर्षा निर्माण होणार...

आपण त्या चक्रात गोल-गोल फिरत राहणार... भूतकाळ पाठी सारून भविष्याकडे वाटचाल करत राहणार... रिकाम्या हाताने! हात धरणारे बरेच येतील, परंतु हात भरणारे फार कमी...! त्यांना जपणं शिकायला हवं... त्यासोबत समोरच्याचा हात भरणं देखील जमलं पाहिजे... एकमेकांचे हात भरून एक पूर्णत्व येईल, परंतु भरलेले हात धरू शकत नाही याचं असमाधान देखील...!


असो! 
आपण निव्वळ चक्रात गोल-गोल फिरायचं असतं आणि बस्स आयुष्यात पुढे जायचं असतं...!
- सात्मन् 

Comments

ह्म्म्म
आपण निव्वळ चक्रात गोल-गोल फ़िरायचं असतं आणि बस्स आयुष्यात पुढे जायचं असतं
सौ टका :)
Manali Satam said…
@aparna : :)
@ bharatiya : dhanyawaad!
होते असे कधी कधी... जीवनाच्या वाटेवर वाटते असे कधी तरी
थोडा जास्त विचार करण्याच्या परिणाम असेल कदाचित.

जे पण वाटतेय ते योग्यच आहे , काही गोष्टी घडतात rather त्या घडु द्यायच्या असतात. आयुष्य पुढे जाण्यासाठी त्याच गोष्टी मदत करतात
Yashodhan said…
उत्तम ब्लॉग आहे आपला. असेच लिखाण करत राहुन नवनवीन प्रकारची साहित्यिक
मेजवानी देत राहा.

माझ्या ब्लॉगला भेट द्या आणी आवडला तर फॉलो करायला विसरू नका..!!


InfoBulb : Knowledge Is Supreme

इन्फोबल्ब : ज्ञान हे सर्वोच्च आहे



टिपण्णीस परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद..!!
Yashodhan said…
This comment has been removed by the author.

Popular posts from this blog

विपश्यना : एक चिंतन

विपश्यनेचा दहा दिवसांचा कोर्स करून आज पाच दिवस झालेत. याबद्दल लिहायचं हे नक्की होतं, पण गेले काही दिवस काय लिहू हे समजतच नव्हत. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा वेगळा असतो कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. म्हणूनच मला सर्वसमावेशक असं काहीतरी लिहायच होतं. आता बसलेय लिहायला... सर्वात आधी, विपश्यना म्हणजे काय?

शाळा = निरागसता !

" त्यादिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत , बाकं आहेत , पोरं-पोरी आहेत , सर आहेत , गणित आहे , भूगोल आहे , नागरिकशास्त्र सुध्दा ; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणार्‍या पांढर्‍या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत. त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते. खास एकट्याचीच. त्या शाळेत वर्ग नाहीत , भिंती नाहीत , फळा नाही , शिक्षक नाहीत ; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे..." :) शाळा चित्रपटाने मला काय दिलं??? तर बऱ्याच दिवसांनी काहीतरी गोड, निरागस आणि तरल गोष्ट ऐकल्याचा, पाहिल्याचा आनंद! :) आणि शाळा कादंबरीने मला काय दिलं होतं, तीच गोष्ट वाचल्याचा आनंद...! शाळा कादंबरी ही बहुतेकांच्या आवडत्या पुस्तकांतील एक आहे, अर्थात माझ्याही!!! ते पुस्तक वाचून आता दीड वर्षं झाली, पण सगळं कसं अगदी मनावर कोरलं गेल्याप्रमाणे लख्ख! क्षणात वेड लावलं कादंबरीने... आणि मग कुठेतरी ऐकिवात आलं की शाळा कादंबरीवर सिनेमा येणारेय... एवढा आनंद झाला म्हणून सांगू! म्हणजे जी पात्र, ज्या जागा आणि ज्या भावनांची आपण निव्वळ एक कल्पना केली होती, ते विश्व दृ